परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
पुस्तक क्रमांक-४०
पुस्तकाचे नांव--दीपमाळ
लेखिकेचे नांव--सुचित्रा घोगरे-काटकर
प्रकाशक-मधुराज पब्लिकेशन प्रा.लि.शनिवार पेठ, पुणे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती- ऑगस्ट २००८/प्रथमावृत्ती
एकूण पृष्ठ संख्या-३२२
वाङमय प्रकार ---ललित
मूल्य--३००₹
📚📖📚📖📚📖📚📖📚📖
📚 ३६|पुस्तक परिचय
दीपमाळ
लेखिका-सुचित्रा घोगरे-काटकर
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
आधुनिक महाराष्ट्राच्या जडणघडणीत सामाजिक कार्याची मोठी परंपरा असणाऱ्या महाराष्ट्राच्या इतिहासात अनेक नामवंत व्यक्ती होऊन गेल्या आहेत.
त्यांच्या संपूर्ण जीवनकार्याचा आपणास परिचय नसतो.अशा व्यक्तींचे व्यक्तिमत्त्व आणि अलौकिक कार्य संक्षेपाने चरित्र रुपात दाखविण्याचा प्रयत्न ''दीपमाळ''या पुस्तकात सुचित्रा घोगरे-काटकर यांनी केला आहे.हा चरित्रचित्रपट मनोवेधक आणि उद् बोधक असून यास मराठी सारस्वतांच्या दरबारातील थोर तत्त्वचिंतक,राष्ट्रपुरुष व संतमहात्म्यांचे भाष्यकार आणि थोर महापुरुषांची जीवनकार्ये व विचार घराघरांत पोहचविणारे प्रभावी व्याख्याते 'प्राचार्य शिवाजीराव भोसले यांची प्रस्तावना लाभली आहे.ते म्हणतात,'ज्यांच्यामुळे इतिहास घडत जातो आणि संस्कृती वाढत राहते,अशा चरित्रांचे मुलांना वेळीच अक्षरदर्शन घडले तर ती लवकर जाणती होतील.'जाणत्या व जबाबदार अभ्यासकांनी सत्य शोधावे,जाणावे आणि त्यांचे दर्शन इतरांना घडवावे.
सौ.सुचित्रा घोगरे-काटकर पेशाने वकील असूनही त्यांना लेखन,वाचन आणि चित्रकला यांची आवड आहे.आजपर्यत त्यांच्या विविध दैनिकांमधून शैक्षणिक, सामाजिक व कायदे विषयक लेखमालिका प्रसिद्ध झाल्या आहेत.तसेच आपल्या अमोघ वाणीने महिला सबलीकरण, मूल्यशिक्षण,थोरांची चरित्रे, कायदा आणि करियरच्या संधी आदी विषयांवर प्रभावी व्याख्याने दिली आहेत.
थोर समाज सुधारकांच्या कार्यातून सामाजिक कार्याची प्रेरणा घेतली.
सार्वजनिक व सामाजिक क्षेत्रात काम करताना या समाजधुरिणांच्या कार्याचा अभ्यास करून त्यांचे महनिय अलौकिक कार्य घराघरांतून ते शाळा महाविद्यालयातून पोहोचावे या उद्देशाने दीपमाळ सदरासाठी लेखन केले होते.
ते दैनिक 'लोकसत्ता' या वर्तमानपत्रात ,दर शनिवारच्या पुरवणीत ४८लेख सन २००५ मध्ये प्रसिद्ध झाले होते. त्यास वाचकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता.
लेखातून चांगली माहिती मिळत आहे.अशी वाचकांची अनेक पत्रे त्यांना आली. त्यामुळे माझा लिहितं राहण्याचा आत्मविश्वास वाढला.मग अधिक अभ्यासपूर्ण लेखन केले.
तदनंतर अनेकांनी ही लेखमाला विद्यार्थ्यांना अतिशय उपयुक्त आहे.त्याचे पुस्तक रुपाने प्रकाशित करण्याची अनेकांनी सुचविले.त्याचं लेखांचे वाचकांना पुस्तक रुपात समाज सुधारकांची 'दीपमाळ' संग्रहित केली आहे.
'महापुरुषांचा भुतकाळ वर्तमानाला समृद्ध करतो आणि भविष्याला सुंदर स्वप्ने देतो'किती सार्थ विचारजेष्ठ साहित्यिक विचारवंत डॉक्टर यशवंत पाटणे यांचे आहेत.काळाच्या ओघात स्मृतींच्या पडद्याआड गेलेल्या महनीय व्यक्तींच्या जीवन कार्याची ओळख करून दिली आहे.या व्यक्तींच्या जीवन कार्यातील नाट्यमय घटना प्रसंग, संघर्ष आणि प्रखर ध्येयनिष्ठ लेखणीतून साकारली आहे.
काहींना समाजाने वाळीत टाकले तरी सुद्धा ते आपल्या कर्तव्य पूर्तीपासून परावृत्त झाले नाहीत.
अहंकार आणि स्वार्थाचा लवलेशही या व्यक्तींच्या थाऱ्यालाही उभा नव्हता.अशा ४८ व्यक्तींची 'दीपमाळ' या पुस्तकात लेखिकेने सहजसुंदर शब्दात मांडली आहे. विश्र्वकोश,भारतीय संस्कृती कोश, समाजविज्ञानकोश , आत्मचरित्र,
चरित्र स्मृतिग्रंथ,गौरवग्रंथ आणि लेखसंग्रह यांचा अभ्यास करून लेखन केले आहे.व्यक्तींच्या या लेखात त्यांच्या आयुष्याला कलाटणी देणारे प्रसंग सामाजिक आणि जीवनकार्याची ओळख करून दिली आहे.
विद्यार्थीवर्गाला,तसेच उज्ज्वल भारताचे भवितव्य ज्याच्या हातात आहे,त्या युवावर्गाला थोरांच्या कारल्याची माहिती मिळावी,प्रेरणा मिळावी या उद्देशाने हे लेखन केले आहे.या लेखनातूनप्रेरणा-प्रोत्साहन तर मिळेलच शिवाय संकटावर मात करून पुढे जाण्यासाठी आत्मविश्वास मिळेल.
सर्वच वयोगटातील वाचकांना एकाच पुस्तकात माहिती उपलब्ध केली आहे.शिक्षणज्योत सावित्रीबाई फुले, महात्मा जोतीराव फुले,राजर्षी शाहू महाराज, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर,स्वामी विवेकानंद, न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे, महात्मा गांधी,मुंबईचे शिल्पकार जगन्नाथ शंकरशेट,
संत गाडगेबाबा,गोपाळ कृष्ण गोखले, स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर,महर्षी धोंडो केशव कर्वे, क्रांतिसिंह नाना पाटील, तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी,
पंडिता रमाबाई, यशवंतराव चव्हाण, हमीद दलवाई, विनोबा भावे,गोपाळ गणेश आगरकर आणि साने गुरुजी अशा ४८ महनिय थोरव्यक्तींची जीवनकार्य लिहिली आहेत.
समाजकार्य करणाऱ्या सुधारकांची दीपमाळ अत्यंत सहज सुंदर शब्दात ओघवत्या शैलीत साकारली आहेत.थोर पुरुषांचे समाजकार्य एकाच अक्षर- शिल्पाच्या साहित्य कृतीत वाचायला उपलब्ध करून दिले आहे. संक्षेपाने चरित्रकार्य रुपात वाचन होते.छानच संग्राह्य पुस्तक आहे.
# श्री रवींद्रकुमार लटिंगे ओझर्डे वाई
🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know