परिचय कर्ता नाव - दिपाली जोशी
पुस्तक क्रमांक - ४६
पुस्तक नाव - तप्तपदी
लेखक नाव - व. पु . काळे
प्रकाशन वर्ष व आवृत्ती - १९९१ (पु. २०१९)
एकूण पृष्ठ संख्या - १६४
वाङमय प्रकार ( कथा, कादंबरी, ललित ई. )- कथासंग्रह
एकूण ७ कथा असणारे हे पतीपत्नीच्या नाजूक नात्यांवर व्यक्त होणारे आणि खूप सारे आत्मचिंतन करण्यासाठी प्रवृत्त करणारे, अप्रतिम कथांनी सजलेले हे पुस्तक.
तशी वपुंची सर्वच पुस्तक हलकी फुलकी, दररोजच्या व्यवहारातील घटनांना धरून असतात त्यामुळे अधिकच जवळची वाटतात. वाचताना आपण शोधत राहतो की हा व्यक्ती असा की तसा.
पहिलीच कथा आहे ," तू येत राहा..." महाविद्यालयीन जीवनात लेखकाला एक मुलगी आवडते ,हिच्यासोबतच लग्न कराचे यासाठी जीवाचे रान केले ,कष्ट करून स्वतः च्या पायावर उभे राहिले.पण जेव्हा परत भेटले तेव्हा तीच लग्न होऊन एक बाळ ही होत..पण ती खरच सुखी होती का? या विचारामागे लेखकाचे धावणे. आणि आपल्या आत्मविश्वास हरवलेल्या पत्नीला पुन्हा उभे करण्या साठी तिच्याच पतिने लेखकाला भेटण्याचे निमंत्रण देणे हे वाचताना सर्वांचेच स्वभाव , अहंकार, अभिरुची, परिस्थिती कशी पालटते हे वाचता वाचता आपणच पुढचे एपिसोड तयार करू लागतो.
" तिशी" ही दुसरी कथा ..ज्या गोष्टी आवडत नाहीत त्याच आपण जास्त जपतो.प्रत्येक क्षणी नवा जन्म घेण्याची ताकद मनामध्ये असते आणि ती कोणाला जाणवून न देता आपण स्वच्छंद जगणे, छंद आणि स्वच्छंद यातील फरक समजावून सांगणारी ही कथा.
"आसावरी" ..पती पत्नीत श्रेष्ठ कोण? जो काम करून घर चालवतो तो की स्वतः च्या इच्छा आकांक्षा सोडून, आहे त्यात घर चालवते ती ?
कितो मोठा प्रश्न. काळ कितीही पुढे गेला तरी नाती राहणारच आणि प्रश्नही. अस्तित्वाला हादरे बसतच राहणार.
यातील शेवटचं वाक्य चटका लावणारे आहे, " हत्या अनेक प्रकारच्या असतात सगळेच मारेकरी सापडत नाहितानी जे सापडतात त्यांना शिक्षा ही होऊ शकत नाही."
संसार यशस्वी करण्याचे सामर्थ्य फक्त संयम आणि निर्भय होण्यात आहे हे सांगणारी गोष्ट म्हणजे " प्रतीक" आपल्या संसारात शेंदूर लावलेले असे अनेक दगड असतात कोणाला कधी , केव्हा, केवढे महत्व द्यायचे हे वेळोवेळी समजले पाहिजे.इतरांबद्दल प्रत्येकाच्या मनात अनेक तेढ असतात ते मोडले की त्या व्यक्तीपेक्षा तेढ धरणाऱ्यालाच स्वतः च्या अस्तितत्वाची काळजी वाटू लागते.
प्रेम, विश्वास, वासल्य यात माणूस फुलतो तर शिस्त आणि शिक्षेच्या बडग्यात तो कोमेजतो यावर उत्तम विवेचन म्हणजे " मँरेज इज अ डील " ही कथा. पैशाच्या बळावर व्यापार उभा राहतो पण घर नाही तिथे मन जपावच लागतं.
अशाच सर्वगुणसंपन्न कथा तप्तपदी शिर्षकाचा अर्थ सांगतात..पत्नीने स्वतः सोबत सगळंच सांभाळायचं असत.प्रत्येकाचे आचार विचार वेगळे पण एकत्र येऊन विचारांची देवाण घेवाण झाली पाहिजे.कथा नुसत्याच गोष्टी न राहता आपण यात कोठे हे शोधून त्याची मरम्मत केली पाहिजे..तरच या पुस्तकांचे उत्तम विवेचन होईल.
"आयुष्यात जो अत्यंत महत्वाचा निर्णय असतो,की ज्या निर्णयामुळे सगळ्या भवितव्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे,अशा क्षणी कुणावरही विसंबुन रहायचं नाही.आपला बेत फ़सला किंवा कुणीतरी उधळुन लावेल अशी परिस्थिती निर्माण होऊ द्यायची नाही.निर्णयाच्या क्षणी आपण स्वतंत्र असलं पाहीजे."
वपुंचेच एक वाक्य आहे दुसऱ्या एका पुस्तकामधील , " शिक्षण ,पदव्या या गोष्टी चलखतासारख्या वागवायच्या व्यावहारिक युद्ध जिंकण्यासाठी, संसारात मन माणुसकी हेच महत्वाचे तिथे मोठेपणाचे चिलखत कशासाठी."
स्वतः तर्क वितर्क न करता ,वाचून ठरवा काळानुरूप बदला फक्त स्वतः नाही आजूबाजूच्या लोकांनाही घडण्याचा सन्मान द्या.
@दिपाली जोशी
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know