WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Thursday, October 14, 2021

पुस्तकाचे नांव--उत्कृष्ट भाषण कला

वाचनसाखळी समूह महाराष्ट्रराज्य
 परिचयकर्ता--श्री रवींद्रकुमार लटिंगे, वाई
 पुस्तक क्रमांक-५५
 पुस्तकाचे नांव--उत्कृष्ट भाषण कला
 लेखकाचे नांव--प्रा.राजशेखर सोलापुरे
प्रकाशक-विद्याभारती प्रकाशन, लातूर
प्रकाशन वर्ष व आवृत्ती-प्रथमावृत्ती

एकूण पृष्ठ संख्या-१७६

वाङमय प्रकार --ललित

मूल्य--१००₹

📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚📖📚    

 ५५|पुस्तक परिचय
           उत्कृष्ट भाषण कला
लेखक-प्रा.राजशेखर सोलापूरे

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

नामवंत वलयांकित व्याख्यात्यांचे व्याख्यान ऐकले की,आपल्यातील वक्रता देखील आपले मनाचे कवाडं वाजवू लागतो.संवाद साधण्याची विचार मांडण्याची व बरेच काही सांगण्याची मनोमन इच्छा निर्माण होते.अनेक प्रश्न मनात कल्लोळ माजवितात.या प्रश्र्नांच्या चक्रव्यूहात अडकलेल्यांना जर उत्तर सापडले नाही तर ते प्रश्र्नांच्या परीघाभोवती फिरत राहतात.अशा सुप्तावस्थेतील अनेकांना भाषण करण्याची कला अवगत व्हावी,या हेतूने भाषण कलेच्या उपासकांना प्राध्यापक राजशेखर सोलापुरे यांनी 'उत्कृष्ट भाषण कला'प्रभावी भाषण कलेसाठी पुस्तक प्रकाशित केले आहे. हे पुस्तक त्यांनी स्वानुभव आणि स्वाध्यायातून लिहिले आहे. 

६४ कलातील एकाने अनेकांशी संवाद साधण्याची भाषण कला आहे.शिकण्याची आणि शिकवण्याची कला आहे.व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व जेव्हा अभिव्यक्तीत परिवर्तित होते तेव्हा एका अद्वितीय कलाकृतीची निर्मिती होते.'माझी वाणी रसपूर्ण,स्पष्ट व मनोरम अशी असेलतर श्रोते वाढीकडे आकर्षित होतात.

भाषण कला व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व अधिक संपन्न करणे.वक्तृत्वाची शास्त्रशुध्द मांडणी अभ्यासपूर्वक संशोधन केल्याने भाषण शास्त्राविषयी उपयुक्त दस्ताऐवज आहे. तसेच भाषण तयारीच्या सरावाच्या अनेकविध क्लृप्त्या देवून अनेक उदाहरणे व दाखले दिलेले आहेत.त्यामुळे भाषण करताना आत्मविश्वास संवर्धन होऊ शकतो.
व्यासपीठावरची बोलण्याची तयारी करून घेणारा हा ग्रंथ लोकपीठावरील अनुभवाच्या शिदोरीने समृद्ध केलेला आहे.

लेखक राजशेखर सोलापुरे व्यासंगी प्राध्यापक आहेत.अनेक दैनिक वृत्तसमूहात त्यांनी चौफेर विषयावर शब्दांकन करुन लेख लिहिलेले आहेत.त्यांचे काही लेख दिवाळी अंक आणि सवमरणिकेतही प्रकाशित झाले आहेत.त्यांनी आत्तापर्यंत विविध विषयांवर अनेक गावांत,शाळा महाविद्यालयात आणि व्याख्यानमालेत  व्याख्याने दिलेली आहेत.महाविद्यालयीन जीवनात त्यांनी वकृत्व,वादविवाद,परिसंवाद आणि निबंध आदी स्पर्धांत स्पृहणिय उज्ज्वल यश संपादन केले आहे.

अनेक पारितोषिकांनी सन्मानित करण्यात आले आहे.महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवायोजनेचा "उत्कृष्ट स्वयंसेवक"पुरस्कार तसेच 'उत्कृष्ट भाषण कला'या ग्रंथास विकासरत्न विलासराव देशमुख सार्वजनिक वाचनालय,चांडेश्वरी ता.जि.लातूरचा "साहित्यरत्न" पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.

 भाषणासाठी आवश्यक असणारा आवाका, आत्मविश्वास आणि आविष्कार या त्रिसूत्रांचा विचार सांगणारे पुस्तक आहे.भाषण कलात्मक व शास्त्रशुध्द पध्दतीवर प्रकाश टाकणारेपुस्तक आहे.या पुस्तकात प्रारंभी पहिल्या अध्यायात भाषण कलेची समृद्ध परंपरा जोपासणाऱ्या व्यासमुनी ते बुध्द,सॉक्रेटिस ते फॅराडे आणि आधुनिक काळातील नामवंत विचारवंत आचार्य प्राचार्य तत्त्वज्ञ कीर्तनकार प्रवचनकार आदी थोर व्यक्तींची परंपरा चित्रित केली आहे.भाषण म्हणजे...शब्द उत्पत्ती ते भाषण कला संवाद विवेचन दुसऱ्या अध्यायात आहे.

भाषा आणि भाषण या तृतीय अध्यायात भाषेचे ज्ञान,भाषाशैली,
भाषांतर,भाषा प्रभुत्व,भाषालंकार आणि व्यासपीठीय भाषा याची उकल केली आहे.

चौथ्या अध्यायात भाषण केलेच्या यशोगाथेचे सप्तक म्हणजेच वक्त्याच्या वाणीला आकार देण्यासाठी सदा सर्वकाळ प्रेरक व परिणामकारक 'स'कार स्पष्टीकरणासह दिलेले आहेत.
सप्तरंगातून जसे इंद्रधनुष्य,सप्त सूरातून संगीत तर सप्त 'स'कारातून भाषणाचा साज सजतो. स्वरसाधना, स्मरण,सत्यता,सोपेपणा,सप्रयोजन,

सौंदर्यस्थळे आणि समाधीटपणा या पैलूंची माहिती प्रस्तुत केली आहे.पाचव्या अध्यायात अशी करावी तयारी भाषणाची एकच ध्यासहस्तलिखित,भाषणकार्ड,माहिती संकलन व संवर्धन या घटकांची माहिती दिली आहे.

तसेच पुढील अध्यायात भाषणाची रुपरेषा,पत्रकार,भाषण स्पर्धांची माहिती, आधुनिक साधनांचा वापर आणि वक्ता कसा असावा याची माहिती परिपूर्ण दिली आहे.

सहज सुंदर सोप्या रचनेतून भाषण कलेची माहिती समजते.योग्य तिथं चारोळी,काव्य व विचार संस्मरणे दिली आहेत.एक तासाचा भाषणाचा मास्टर प्लॅन कसा असावा हे सोदाहरण स्पष्ट केले आहे.यातील स्वरसाधना भागाचे वाचन करताना नव्याने माहितीचा उलगडा होतो.

व्यायाम आणि प्राणायमाची गरज भाषण कलेसाठी का भासते याची कृतीयुक्त माहिती मिळते.हा ग्रंथ भाषण करणाऱ्यांना व शिकू इच्छिणाऱ्यांना लाभदायक ठरेल..

      परिचय कर्ता-रवींद्रकुमार  लटिंगे ओझर्डे वाई

🌿🌾🍂🍃🍀🌿🌾🍃🍂🌳🌿🌾

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know