*पुस्तकाचे नाव- चैतन्यवेल*
*(काव्यसंग्रह)*
*लेखक- मनोज अग्रवाल*
*लेखक व पुस्तक प्रकाशन सोहळा विषयी*
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य आयोजित,"काव्य प्रकाशन" सोहळा व "वाचनयात्री पुरस्कार" सोहळा 5 ऑक्टोबर 2021रोजी औरंगाबाद या ठिकाणी मा. डॉ.दासू वैद्य.(प्रसिद्ध कवी, गीतकार),डॉ. संतोष टेंगले (उपायुक्त,शिक्षण विभाग प्रमुख, मनपा औरंगाबाद),श्री रामनाथ थोरे( शिक्षणाधिकारी,मनपा, औरंगाबाद),
डॉ. विशाल तायडे,बालसाहित्यिक,ज्येष्ठअधिव्याख्याता,
प्रादेशिक विद्या प्राधिकरण,औरंगाबाद),श्री.संजीव सोनार (सांस्कृतिक अधिकारी,मनपा,औरंगाबाद),मा.श्री.ज्ञानदेव सांगळे (सहाय्यक कार्यक्रम अधिकारी, समग्र शिक्षा अभियान औरंगाबाद)मा.श्रीमती प्रिया सिंग(,ट्रस्टी तथा राज्य सदस्य महाराष्ट्र राज्य मनपा शिक्षक संघ),श्री.जगदीश अग्रवाल(उपाध्यक्ष,अखिल भारतीय अग्रवाल संमेलन महाराष्ट्र राज्य)मा.श्री दीपक अग्रवाल( जिल्हाध्यक्ष, अखिल भारतीय अग्रवाल संमेलन औरंगाबाद),मा.श्री.भारत तींगोटे (सचिव, शिक्षक सेना औरंगाबाद) मा.श्री.देवेंद्र सोळंके (अध्यक्ष शिक्षक सेना,औरंगाबाद) संपन्न झाला.
या कार्यक्रमाचा मी एक भाग असल्याचा मला मनोमन आनंद होत आहे. ही बाब माझ्यासाठी संस्मरणीय, अविस्मरणीय आणि प्रेरणादायी निश्चितच आहे.गेल्या 2 वर्षात वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्य हा समूह निवडक सदस्य पासून सुरू झालेला आज 8000 सदस्यांचा टप्पा पूर्ण करण्याकडे वाटचाल चालू असताना या वाचनसाखळीने या महाराष्ट्राला अनेक वाचक,लेखक, कवी तयार करून दिले आहेत, आणि देत आहेत याचे निश्चितच सर्व श्रेय संयोजिका आदरणीय प्रतिभाताई लोखंडे व प्रतिभाताई टेमकर या दोघी महिलाभगिनींना आणि आपल्या सर्वांनाच जात आहे.
100 पुस्तकांचे वाचन करून समिक्षण केल्याबद्दल मला "वाचनयात्री"या राज्यस्तरीय पुरस्काराने या ठिकाणी गौरवण्यात आले. पुरस्कार मिळाल्याचा आनंद तर होताच पण पुरस्कारापेक्षा मला माझे वाचनसाखळीतील अनेक बांधव या ठिकाणी प्रत्यक्ष भेटल्याचा खूप आनंद झाला. त्यांच्या भेटीने नवचेतना आणि ऊर्जा मिळाल्याचे प्रकर्षाने जाणवले. खूप जीवाला जीव लावणारी माणसं आहेत.
लेखकाविषयी-
लेखक /कवी मनोज अग्रवाल यांची प्रत्यक्ष भेट त्यांच्या काव्यसंग्रहाच्या प्रकाशन दिवशीच प्रत्यक्ष झाली.अगदी
सानेगुरुजींच्या विचारावर चालणारे व्यक्तिमत्व म्हटले तरी वावगे ठरणार नाही.असे म्हटलं जाते की जीवनामध्ये शांत,संयम अंगी असणे खूप गरजेचं आहे.परंतु मनोज अग्रवाल सर सारखी नम्र व्यक्ती आजपर्यंत मी कधीही अनुभवली नाही.एखादी गोष्ट करायची म्हटले तर ती ते अगदी काळजापासून करतात. आपल्याला कितीही त्रास झाला तरी चालेल परंतु आपणामुळे कोणाला त्रास होणार नाही याची काळजी घेणारे,मला भावलेले एक असामान्य व्यक्तिमत्व म्हणजे लेखक/कवी मनोज अग्रवाल सर त्यांच्या काव्यसंग्रहातील प्रत्येक शब्द,भाषा तितकीच दर्जेदार, नाविन्यपूर्ण शब्दभंडाराने भरलेली प्रेरणादायी असल्याची आपणास दिसून येते.
*"चैतन्यवेल" काव्यसंग्रह विषयी*
"चैतन्यवेल"या एकूण 70 काव्यपुष्प यांचा समावेश असलेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. या 70 पुष्परुपी काव्यानी सुंदरसा गगनचुंबी,
अमृतरुपी "चैतन्यवेल " निर्माण झाला आहे.या काव्यसंग्रहाला सुंदर अशी प्रस्तावना
वाचनसाखळी समूह महाराष्ट्र राज्याच्या संयोजिका,महाराष्ट्र राज्य शासनाचा सावित्रीबाई फुले आदर्श शिक्षिका पुरस्कार प्राप्त आदर्श व उपक्रमशील शिक्षिका, सदस्य महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक व अभ्यासक्रम संशोधन मंडळ पुणे,आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान श्रीमती प्रतिभा लोखंडे मॅडम यांनी अतिशय सुंदर अशी प्रस्तावना दिलेली आहे. एका आईने आपल्या मुलासाठी (मानसपुत्र) लिहिलेली प्रस्तावना खूप काही सांगून जाते. त्याचबरोबर मुखपृष्ठावर असणारे चित्र हे मनामध्ये सुसंस्कृत विचारांची, चांगल्या मनाची उभारणी करणारा एक चैतन्यरुपी "चैतन्यवेल" खूप प्रेरणादायी वाटतो. त्याचप्रमाणे मलपृष्ठावर प्रा.मीनल येवले मॅडम यांनी अतिशय सुंदर शब्दात या कवितांविषयी, लेखकाविषयी अभिप्राय दिलेला दिसून येतो.
"चैतन्यवेल" या काव्यसंग्रहाच्या नावानेच पहिली कविता
"चैतन्यवेल" यामध्ये कवीने आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये कशा प्रकारे आपण तेजस्वी वृत्तीने आयुष्य जगले पाहिजे याचे ज्वलंत उदाहरण याठिकाणी दिलेले आहे.
वाहतील नवस्पूर्तीचे वारे,
तेजाळतील नवतेज तारे,
निवळूनी विकार सारे,
उन्नत मार्ग उमगेल,
धरुनी धीर थोडा ,
चैतन्यवेल स्फुल्लींगेल
"सुख " या कवितेमध्ये आपण सर्वजण सुखाच्या शोधात अविरतपणे वाटचाल करत असतो.त्यावेळेस आपण तन-मन झोकून अतिशय कष्टात कार्य करत असताना एखादं सुख मिळवतो त्यावेळेस ते मिळणारे समाधान हे खूप वेगळे असते. असे अप्रतिम वर्णन या ठिकाणी केले आहे.
"प्रेम सदोदित" या कवितांमध्ये,
महती नितळ प्रेमाची
असे असीम अमर्यादित
द्वेषास जिंकावे प्रेमाने
असू द्यावे प्रेम सदोदित,
प्रेमाने जग जिंकता येते असे आपल्या वाचनात, ऐकण्यात आलेले असते याचे सुंदर आणि वास्तववादी वर्णन या ठिकाणी कवीने केले आहे. त्याचबरोबर
असे प्रेम देणगी
सृष्टीस ईश्वराची
अखंड,अनंत परिभाषा
असे अनश्वर प्रेमाची.....
प्रेम हे मानवाला ईश्वराने दिलेली एक देणगीच आहे असं या ठिकाणी कवीने म्हटले आहे.
"जिद्द" या कवितेमधून आपली स्वप्नपूर्ती झाल्यानंतर आपली जगात कीर्ती निर्माण होते. आणि मनामध्ये स्फूर्ती तयार होते या सगळ्या गोष्टी जिद्द,चिकाटी, आत्मविश्वास या जोरावर आपण निरंतर पणे घडवत असतो.असे कवीने सुंदर असे वर्णन केलेले आहे.
"हास्यामृत" या कवितेमधून आपल्या मनातील आपले दुःख विसरून प्रसन्नता स्वीकारून हास्य हा आपल्या जीवनातील महत्त्वाचा अलंकार आहे.आणि तो आपण ओळखला पाहिजे, मुक्तपणे हास्य करून आयुष्याचा आनंद आपल्याला घेता आला पाहिजे.हास्य हे देवाचे अनमोल असे देणे असून ते आपण भरभरून लुटले पाहिजे त्यासाठी कोणतेही मोल आपल्याला द्यावे लागत नाही याचे सुंदर असे वर्णन आणि जीवनातील हास्य याचे महत्त्व या ठिकाणी कवीने सुंदर वर्णन केले आहे.
"संपू नका जीवनयात्रा!"
ही अत्यंत प्रेरणादायी अशी कविता आहे. कारण ईश्वराने सुंदर अशी सृष्टी निर्माण केली आहे. काट्या सोबत फुले मिळतात. जीवन आपले सुंदर आहे चांगल्या वाईट गोष्टी घडत असतात. त्यामुळे वाईट प्रसंगात जोमानं उभे राहून वाटचाल केल्याने निश्चितच चांगले दिवस येतात. त्यामुळे आपले जीवन संपू नका यात अत्यंत सुंदरवर्णन या ठिकाणी कवीने केलेले दिसून येते. त्याच वेळेस इतिहासाची माहिती सुद्धा लेखकाने आपणास सांगितलेली आहे.
"खचू नकोस!" या कवितेमधून सुंदर असं वर्णन केलेला आहे ते म्हणजे,
सोबती तू निष्कर्ष माझा माझ्या मना,
सोडली साथ जगाने वाट्यास वंचना,
विडंबन, अवहेलना, धारणेची कुचंबणा,
किंचितही थिजू नकोस, माझ्या मना खचू नकोस!
"मृत्यू एक अटळ सत्य!" या कवितेने या काव्यसंग्रहाचा शेवट कवीने केल्याचे आपणास दिसून येते.
सरली निशा उगवते पहाटे
जीवन म्हटलं की मृत्यू हा असतोच त्यामुळे मृत्यू हे एक सत्य आहे. त्यामुळे आपण मिळालेले जीवन हे आपण भरभरून जगले पाहिजे.असे सुंदर वर्णन या ठिकाणी कवीने केलेले आहे
"चैतन्यवेल" या काव्यसंग्रहातील सर्वच कविता खूप दर्जेदार आणि वाचनीय असलेल्या आपणास दिसून येतात. चैतन्यवेल,जीवन, सुख,यश,प्रेम सदोदित, सृजन चाहूल, जिद्द, कुतूहल अशा शीर्षकाच्या कितीतरी सुंदर अशा कविता आहेत की यामध्ये आपल्याला जीवनाकडे पाहण्याचा दृष्टिकोण सांगत असतात.
"चैतन्यवेल" हा काव्यसंग्रह
अतिशय सुंदररित्या,प्रत्येक नाविन्यपूर्ण शब्द आणि त्या शब्दांचा अर्थ आपणाला खूप काही सांगून जातो. या काव्यसंग्रहातील काही कविता आपल्या मराठीच्या अभ्यासक्रमात सुद्धा घेतल्या जातील इतके दर्जेदार अशा या कविता आहेत.असा हा काव्यसंग्रह अत्यंत वाचनीय असून आपण तो अवश्य वाचावा व आपल्या संग्रही अावश्य ठेवा.
संपर्क- मनोज शोभाबाई प्रकाश अग्रवाल (औरंगाबाद)
9850678395
पृष्ठ संख्या-86
किंमत-120
अभिप्राय शब्दांकन
सिंधूसुत......🖋️
ganeshprem83@gmail.com
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know