लेखक : डॉ.विजया फडणीस
प्रकाशन : रोहन प्रकाशन
लेखमाला : भाग चौथा
#आत्मप्रतिमा
आत्मप्रतिमा ही माणसाच्या व्यक्तिमत्वाचा गाभा असते
माणसाच्या मनात जर न्यूनगंड असेल तर त्याची बुद्धी उत्तम असूनही माणसाचा आत्मविश्वास आणि महत्वाकांक्षा कमी राहते परिणामी चिंता भीती, अपराधभावना,वैफल्य, नैराश्य हया नकारात्मक भावनांनी माणूस ग्रासला जातो.
कारण मुळात माणसाची स्वतः विषयीची जाणीवच अस्पष्ट आणि नकारात्मक असते.
पालकांकडून होणारी सततची जहरी टीका, दोषारोप ,कठोर शिक्षा, नकारात्मक भाषा मुलांच्या व्यक्तिमत्वावर वाईट परिणाम करतात आणि पुढे जाऊन त्याला वागणुकीच्या समस्या उद्भवतात.
कधीकधी पालकांत भांडणे होतात तेव्हा वडयाचे तेल वांग्यावर निघते तर कधी पालकापैकी कुणाचा अहंकार शिरजोर होतो पण मधल्यामधे मुलांचे नुकसान होते.
त्यामुळे पालकांनी स्वतःच्या वागण्या बोलण्यात सकारात्मक बदल करत मुलांच्या भावनिक विकासाला पोषक वातावरण तयार करावे कारण माणसाची आत्मप्रतिमा उजळण्यासाठी पालकांचा भावनिक आधार , प्रेम ,प्रोत्साहन खूप गरजेचे आहे.
#आयुष्याचा_रिमोट
प्रत्येक माणसाचे भावविश्व वेगळे असते, प्रत्येकाच्या गरजा, प्राधान्यक्रम वेगळे असतात त्यामुळे कुणीही इतरांच्या आयुष्याचा रिमोट आपल्या हाती असल्यासारखे वागू नये (विशेषतः नवरा बायकोच्या नात्यात /बालक- पालक संबंधात) कारण त्यामुळे आपण दुसऱ्या माणसाची नकळत भावनिक कुचंबणा करत असतो.
त्याऐवजी उत्तम सहजीवनासाठी इतरांशी तडजोड करत, तोडगे काढत माणसाशी जुळवून घेणं इष्ट होईल.
उत्तम आयुष्य जगण्यासाठी जे आहे ते स्वीकारत आणि जे नाही त्यासाठी खंत न करत जगणे महत्त्वाचे आहे।
एखादी गोष्ट मनावर घेतली की तिच्या अट्टाहासापायी स्वतःला त्रास करून घेण्याचा काही लोकांना सवय असते त्यासाठी आपले विचार मुलांवर लादण्याची सवय तर त्याहून वाईट...
काही लोकांना सतत दुसऱ्या च्या चुका शोधायचा स्वभाव असतो त्यामुळे ते एकटे असतात आणि असमाधानी राहतात.....
जोडीदारांमधील भिन्न आवडीनिवडी, वैचारिक मतभेद, टोकाचे आग्रह, तारतम्याचा आणि भावनिक परिपक्वतेचा अभाव संसारात एकतर वादंग निर्माण करतो किंवा कुणा एकालाच जास्त सोसावे लागते...गोष्टी तुटेपर्यंत ताणल्या जातात
त्यासाठी काही हट्ट, अहंकार, आग्रह सोडावे लागतात तसेच बदलासाठी मानसिक तयारी दाखवावी म्हणजे एकमेकांच्या मनाच्या तारा जुळतील आणि नातेसंबंध मधुर बनतील.
#स्वभाव
माणूस परिस्थिती नुसार वेळोवेळी बदलत असतो कधी विचारपूर्वक, कधी बालिश, कधी कळसूत्री बाहुलीप्रमाणे,कधी प्रेमळपणे काळजी घेतो तर कधी हुकुमशाहाप्रमाणे वागतो हया सार्यामागे त्याची " इगो स्टेट " (अहम् अवस्था) कारणीभूत असतात
माणसाच्या आंतरक्रियेत तीन प्रकारच्या अहम् अवस्था असतात
1. बालक अहम्
2. पालक अहम्
3. प्रौढ अहम्
1.बालक अहम् :
या अवस्थेत व्यक्तीचे वर्तन किंवा प्रतिक्रिया
तिच्या बालपणीच्या वागणुकीची पुनरावृत्ती असते
जेव्हा माणूस भुकेला थकेला दुखावलेला काळजीवाहू आणि आजारी असतो तेव्हा बाल अहम् जास्त प्रबळ असतो.तसेच जोरजोरात हसणे,रडणे, आरडाओरडा, वस्तूंची फेकाफेक, नाटकीपणा ही बाल अहम् ची लक्षणे आहेत.
बालपणातील अनुभवांवरून माणसात इच्छा, उर्मी,कुतूहल, जिज्ञासा उपक्रमशीलता असे आयुष्यात रंग भरणारे भाव येतात.
त्यातही आणखी दोन प्रकार असतात
A.मुक्त बालक अहम् : खेळकर मोकळा कूतूहल स्वभाव,निरंकुश, बेजबाबदार, विध्वंसक
B. प्रतियोजित बालक अहम् : निमूटपणे आज्ञापालन करणारे, नमते घेणारे
2.पालक अहम्
आईवडील, वडिलधारे ज्येष्ठ, नातेवाईक, शिक्षक ,शेजारीपाजारी हया सार्यांच्या मार्फत होणारे संस्कार पालक अहम् मध्ये प्रतिरूपित होतात. धधमोठ्या माणसांसारखे हावभाव ,शब्दफेक, परंपरा पालन ,हसणे यातून ते परावर्तित होतात
पालक अहम् दोन प्रकारचे असतात
1. संगोपक पालक अहम् :
जो प्रेम करतो,काळजी घेतो,धीर देतो,प्रोत्साहन देतो,आपल्या भावना समजून घेतो
2.नियंत्रक पालक अहम् :
हुकुमशाहाप्रमाणे वागणारा,आपले दोष दाखवणारा, आपलेच खरे करणारा, आपली मते दुसऱ्यांवर लादणारा
महत्त्वाचे म्हण़जे संगोपक पालक अहम् मुलांच्या विकासात मोठा हातभार लावतो आणि नियंत्रक पालक अहम् मुलांना दुबळे, अनिर्णयक्षम,
बनवतो
3.प्रौढ अहम्
तर्कसंगत ,विवेकी ,वास्तववादी, भावनेच्या आहारी न जाणारा, वस्तुस्थिती चे आणि वर्तमानाचे भान असणारा,जपून प्रतिक्रिया देणारा.चांगल्या वाईटातील फरक जाणणारा, व्यावहारिक विचार करणारा ,आत्मभान असणारा, सगळयांशी जुळवून घेणारा, स्वतः मध्ये बदल घडवण्यासाठी आणि स्वतः वर नियंत्रण राखण्यासाठी प्रयत्न करणारा उत्तम प्रौढ अहम् ची लक्षणे आहे
तसेच हा प्रौढ अहम् वयाबरोबर आणि ज्ञानाबरोबर विकसित होणारा असतो पण याचा अतिरेक झाला तर माणूस रूक्ष बनतो
एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीशी संवाद साधताना त्या व्यक्तीचा आणि आपली अहम् अवस्था एकच असेल तर विसंवाद घडत नाही.
आपला स्वभाव बदलण्यासाठी
1. सद्यपरिस्थितीनुरूप वागणे
2.स्वतःच्या अहमची ओळख आणि जाणीव
3.मनातील भावनांची प्रौढ अहमशी सांगड
4. दुसऱ्याच्या व्यक्तीमधला अहम ओळखून संवाद साधा,
5. मनात गोंधळ असेल तर निर्णय घेऊ नये
अपूर्ण
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know