WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Friday, October 15, 2021

मनं उलगडताना भाग 5

मनं उलगडताना
लेखक : डॉ. विजया फडणीस
प्रकाशन : रोहन प्रकाशन

लेखमाला : भाग पाचवा

#डिप्रेशन (औदासीन्य)

डिप्रेशन म्हणजे व्यक्तीची टोकाची मानसिक औदासीन्य अवस्था
डिप्रेशन हे फ्रस्ट्रेशन(नैराश्य) पासून वेगळे आहे कारण त्या दोघांची तीव्रता वेगळी आहे.वेगळ्या भाषेत सांगायचे झाल्यास नैराश्य ही डिप्रेशन ची पहिली पायरी आहे.
पण डिप्रेशनच्या शेवटच्या अवस्थेत मात्र बर्याचशा आत्महत्या झालेल्या आपल्याला पाहावयास मिळतात.

डिप्रेशनची कारणे
1.मानसिक क्लेश
2. कामात असमर्थतता
3. कमी कार्यक्षमता
4.कमी स्वनियंत्रण
5.अनुवंशिकता
6.मेंदूतील जैवरासायनिक असमतोल
खरेतर कोणत्याही भावनाशील लहानमोठ्या व्यक्तीच्या मनात भावनांचे ,आशानिराशेचे चढ उतार परिस्थितीनुरूप सुरू असतात पण सततच्या काळजी, नैराश्य, भीती ,अस्वस्थतता यामुळे व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडते. औदासिन्य येते
मेंदूतील जैवरासायनिक समतोल बिघडण्यास स्पर्धा, आपत्ती, अभाव, नुकसान, फसवणूक, अपघात, अपमान, आघात, व्यसनाधीनता ,औषधांचा दुष्परिणाम हया गोष्टी कारणीभूत ठरतात.
स्त्रियांमध्ये हार्मोनल चेंजेस आणि व्यक्तिगत  दृष्टिकोन हे कारणीभूत ठरतात.
मुलांच्या बाबतीत अत्याचार, शोषण, स्पर्धा परीक्षा, पालकांच्या वाढत्या अपेक्षा, कठिण अभ्यासक्रम हे कारणीभूत ठरतात.

डिप्रेशनची लक्षणे

#शारीरिक_लक्षणे
▪️झोप लवकर न लागणे
▪️झोपमोड होणे
▪️स्वप्न पडत राहणे
▪️झोपेतून उठल्यावर थकवा वाटणे
▪️भूक न लागणे / जास्त लागणे
▪️अकारण पोट/डोक दुखी
▪️वजन वाढ/घट
#वर्तननिगडीत_लक्षणे
▪️लैंगिक इच्छा कमी होणे
▪️कशातही मन न राहणे
▪️कामात मंदपणा
▪️कुटुंबीय/मित्रांबद्दल आस्था न वाटणे
▪️कपडे /जबाबदारी कडे दुर्लक्ष
#भावनिक_निगडीत_लक्षणे
▪️एकाग्रतेचा अभाव
▪️चिडचिड/विसरभोळेपणा
▪️स्वप्रतिमा खालावली जाणे
▪️स्वतःला तुच्छ समजणे (होपलेस,हेल्पलेस,वर्थलेस)
▪️मनात टोकाची नकारात्मकता
▪️ सातत्याने आत्महत्येचा विचार

#डिप्रेशनचे_प्रकार
1.डिस्थायमिया (सौम्य औदासीन्य)
2.मेजर डिप्रेशन(तीव्र औदासीन्य)
3.मिक्स एन्झायटी डिप्रेशन (चिंतामिश्रित औदासीन्य)
4.बायपोलर डिप्रेशन (द्विमनावस्था)

सौम्य औदासीन्य दोन वर्षापर्यंत  टिकू शकते तसेच माणसाच्या मनावर दडपण असले तरी नित्यव्यवहार नीटपणे पार पडतात. 
मेजर डिप्रेशन दीर्घकाळ टिकते,दैनंदिन कार्य बाधित होते,अधूनमधून औदासीन्याचे झटके येतात
मिक्सड एन्झायटी मध्ये हातापायाची थरथर ,बैचेनी,चिंता काळजी वाढते.
बायपोलर डिप्रेशन मध्ये आलटून पालटून उन्माद ,उदासीनता अवस्था जाणवतात

#उपचार
अचूक निदानासाठी मानसशास्त्रीय चाचण्या आणि त्यानंतर समुपदेशन, भावनिक आधार, मानसोपचार, वर्तनोपचार, ध्यानधारणा, योगासने, सातत्याने योग्य औषधोपचार घेत राहावे लागतात.
जे आत्महत्येस प्रवृत्त झालेले असतात किंवा वर्तनातून धोका जाणवतो अशासाठी शाँक ट्रीटमेंट उपयुक्त पडते.

औदासीन्याला प्रतिबंध करण्याचा महत्त्वाचा उपाय म्हणजे स्वतःची भावनिक बुद्धिमत्ता वाढवणे म्हणजेच स्वतःच्या आणि इतरांच्या भावना ओळखणे, हाताळणे आणि व्यवस्थापन तसेच लहानपणापासून मुलांना भावनानियमन शिकवणे गरजेचं आहे

प्रत्येकाने आवर्जून लक्षात ठेवायच्या गोष्टी
▪️वास्तववादी ध्येय ठेवावे
▪️जबाबदारीचे भान व प्राधान्यक्रम ठेवावे
▪️विश्वासू व्यक्तीशी सुसंवाद चालू ठेवा
▪️छंद, आवडीनिवडींसाठी वेळ देणे
▪️मित्रांबरोबर सहल,सिनेमा यांना वेळ द्या
▪️निराश असताना मोठे निर्णय टाळणे
▪️हलका व्यायाम/ध्यानधारणा चालू ठेवा
▪️समस्येतून बाहेर पडण्याचा ठाम निर्धार ठेवा
▪️परिस्थितीवर मात करण्याची जिद्द ठेवा
▪️मानसिक आजार झाले तर न लपवता आणि सातत्याने उपचार

अपूर्ण
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know