Sunday, June 13, 2021

स्वसंवाद_एक_जादू #transformation_series#सरश्री

#स्वसंवाद_एक_जादू  
#transformation_series
#सरश्री

हया पुस्तकातून मी काय शिकलो

आईवडील, शिक्षक , मित्र, बायको हया सगळयापेक्षा
आपण सगळयात जास्त संवाद कुणाशी साधत असेल तर तो 
आपल्या स्वतः शी यालाच म्हणतात #स्वसंवाद

स्वसंवाद म्हणजेच एखादी घटना किंवा गोष्टी वर आपल्या मनात आलेला पहिला विचार

तो विचार जसा असेल तसाच सुख दुखाचा विचार आपल्या मनात स्थापित होतात आणि तसेच शरीर रिअँक्ट होते.
हा विचार आपल्या दृष्टिकोनामुळे ठरतो.

स्वसंवादाला चांगला बनवला तर तो सु-स्वसंवाद 
आणि तो जर चुकला तर कु-स्वसंवाद
सु-स्वसंवाद झाला तर माणसाची आत्मिक भौतिक प्रगती होते
आणि कु- स्वसंवाद झाला तर अधोगती होतेच पण माणूस मानसिक आजारांचा बळीही ठरतो.

चांगल्या स्वसंवादासाठी आपल्याला हवं असते
1.निरोगी शरीर 
2.न डगमगणारे मन
3.उत्तम चेतनाशक्ती
4.तल्लख बुद्धी
5.योग्य ध्येय

निरोगी शरीरासाठी योग्य आहारविहार ,व्यायाम करून आपण आपली शाररीक स्थिती सुधारू शकतो

मन खंबीर बनवायचे असेल तर आपल्या मनात येणाऱ्या वाईट विचारांना रोखावेच लागेल.
त्यासाठी सतत तक्रारी करणाऱ्या मनाच्या भागाला आराम दिला पाहिजे , लगेचच प्रतिक्रिया देण टाळायला हवं
झालेली घटना चांगली असो किंवा वाईट आणि त्यावर आपण कितीवेळ घालवायचा तेही ठरवलं पाहिजे (Deciding Match box value)
तसेच घटना घडण्यापूर्वी तिचा जास्त विचार करणं टाळावे
भूतभविष्यात न रमता वर्तमानात जगायला हवं
सकारात्मक विचारांचा पुनरूच्चार करून मनात विश्वास स्थापन करावा
मनाला कपट क्रोध भय लालच हया भावनांपासून दूर ठेवायला हवं
आपल्याला  स्वतःचे गुड न्यूज रिपोर्टर बनायचे आहे जेणेकरून आपण कधीच कशामुळेही दुखी होऊ शकणार नाही

उत्तम चेतनाशक्ती असेल तर आपण आपल्याला सहजरीत्या बदलू शकतो .आपल्या जुन्या विचारांचा ढाचा, दृष्टिकोन बदलतो

तल्लख बुद्धी किंवा common sense असेल तर आपण चुकीच्या विचारांना आणि भावनांना आवरू शकतो
स्वतःला वाईट कहाण्या सांगून स्वतःची फसवणूक करणार नाही
हीन भावना, आत्मघृणा , निगेटिव्ह विचार यांना बळी पडणार नाही
माणसाला जबाबदारीची जाणीव होईल आणि त्याचा आत्मविश्वास वाढेल.

ध्येयाविना मनुष्य म्हणजे धडाविन शरीर त्यामुळे माणसाला ध्येय असावेच तसेच ध्येयामागचा उद्देश ही ठरलेला असावा.
ईश्वराने आपल्याला या भूतलावर काही महान कार्यासाठी पाठवलं.आहे याची जाणीव सतत ठेवायची

उत्तम स्वसंवाद आपल्याला प्रगतीच्या वाटेवर पुढे जाण्यासाठी नुसतेच मदत करत नाही तर जीवनाच्या सर्व समस्यांवर तो रामबाण उपाय स्वतःला आणि परिवाराला सुखी वैभवशाली बनवायला ही मदत करतो

असे हे पुस्तक आपण नक्कीच वाचा आणि आपल्या जीवनात सकारात्मक विचारांचे वादळ आणा.

आपल्या प्रतिक्रियांचा अभिलाषी
निलेश शिंदे

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know