Sunday, June 13, 2021

धन आकर्षित कसे - डॉ. जोसेफ मर्फी

#TransformationSeries
#booksummary

धन आकर्षित कसे 
        -    डॉ. जोसेफ मर्फी

प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्या इच्छा आकांक्षा आणि स्वप्ने असतात पण त्या पैशाच्या अभावाने अपूर्ण राहतात
त्यामुळे आपल्याकडे पैशाचा अभाव नसावा यासाठी आपल्याला श्रीमंत असणं गरजेचे आहे.
मग श्रीमंत होण्यासाठी माणसाने काय करावे हे या पुस्तकात लेखक जोसेफ मर्फी 
यांनी नमूद केलं आहे

स्टेप1: 
सर्वप्रथम पैसा वाईट ही संकल्पना मनातून हद्दपार करा
पैशाला श्रीमंतीला आणि श्रीमंत व्यक्तीला नावे ठेवणं बंद करा
तुम्ही सुखी समृध्द वैभवशाली जीवन जगावे हयासाठी माणसाला देवाकडून मिळालेली देणगी म्हणजे पैसा 
मग पैसा वाईट कसा असेल?

स्टेप2: 
ध्यानधारणेद्वारे आपल्याला स्वतःला प्रश्न विचारून स्वतःचा शोध घेतला पाहिजे
आपल्याला नक्की काय हवयं याची मनाला विचारले पाहिजे

स्टेप3: 
ज्या गोष्टी हव्या आहेत त्या प्रार्थनेद्वारे ईश्वराकडे मागितल्या पाहिजे
प्रार्थना आदरपूर्वक सकारात्मक असावी जेणेकरून तीचा पुनरुच्चार करून आपल्या अंतर्मनापर्यंत त्या मागण्या पोहचल्या पाहिजे.
त्या उद्दिष्टांची पूर्तता झाल्याचे चित्र रोज मनःचक्षूसमोर रेखाटायचे.
ही प्रार्थना करत असताना इतरांच्या ही कल्याणाचा विचार आपल्या मनात असावा तसेच कुठल्याही नकारात्मक विचारांना हेवेदावे मत्सर यांना मनात थारा देता कामा नये.
त्याऐवजी शांतता प्रेम इमानदारी दयाळूपणा नम्रता यांनी मन भरून टाकावे
आपल्या चांगुलपणाद्वारे ईश्वराच्या जवळ पोहचायचे कारण आपले स्वच्छ मन आणि  शुद्ध आत्मा हीच खजिन्याची चावी आहे.
हया दरम्यान नकारात्मक विचार आपल्या विश्वास आणि संयमाची परीक्षा पाहतील पण आपण आपली ईश्वरावरची श्रद्धा विश्वास ढळून न येता प्रार्थना करत राहावी

स्टेप 4:
प्रार्थना करत राहिल्याने आपल्या अंतकरणात निर्माण झालेली सकारात्मकता आपल्याला मनाने श्रीमंत बनवेल आणि ते सकारात्मक विचार आपल्याला उत्तम व्यक्ती तर बनवेलच पण त्याचबरोबर विचारांचे रूपांतर कृतीत होऊन आपली पाऊले स्वप्नपूर्तीच्या योग्य दिशेने पडतील आणि या मार्गावर आपल्या वाटचालीत ईश्वराची साथ मिळेल.
कुठल्याही अडचणींवर मात करण्याची आपल्यात आंतरउर्जा निर्माण होईल आणि   शेवटी इच्छित उद्दिष्टे पूर्ण होतील.
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know