अनेक पुस्तकं समूहांमुळे नवनवीन पुस्तकाचा, वाचकांना जणूं शोध लागतोय असे झाले आहे, असंख्य वाचक आणि त्यांचे पुस्तकं अभिप्राय वाचून पुस्तकाबद्दल उत्सुकता निर्माण होते आहे,पण त्यातही तोच तोचपणाही नको वाटतो, काही तरी नाविन्यपूर्ण लेखन हाती पडावे ही सगळ्यांचीच इच्छा असते, अश्याच आगळ्या वेगळ्या पुस्तकावर आजचा अभिप्राय 👍👍
समूहातले अभिप्राय वाचत असताना सहजच एका लक्षवेधी पुस्तकावर नजर खिळली..काही तरी वेगळे आहे हे जाणवले,वाचण्याची तीव्र ओढ निर्माण झाली..आणि काय चमत्कार काहीच दिवसांनी ते पुस्तकं हातात पडलेच🤗...उत्सुकता होती त्याचं प्रमाणे पुस्तकाची दमदार सुरवात झाली,एखादा चित्रपट पहावा असे लिखाण,जणू त्या दुनियेत घेऊन जाते आहे असे जाणवले👍
फार वेळ न घेता थोडक्यात पुस्तकाची ओळख करून देते,तर "औदुंबरावत" ही कहानी काल्पनिक असली तरी,काही अंशी सत्याची जोडही आहे, त्यामुळे वाचताना तो काळ तसाच असेल याची प्रचिती येते...कोणे एकेकाळी अमरावती शहराला औदुंबरावत म्हणून संबोधले जात असे..त्याचं आटपाट नगरीची ही कहाणी आहे 🤗ज्याचे लेखक आहेत "प्रेम धांडे'आणि प्रकाशक आहेत "श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन"...
तर या नगरीत राजा आहे, राणी आहे, राजकुमार आणि त्याची प्रेयसी सुद्धा आहे 🤗जीवाला जीवं देणारे मित्र सखे आप्तजन आहेत तर, घरभेदी, दुष्ट शत्रूही आहेत...ही कहाणी काही एक व्यथा तर कोणाची साहसकथा आहे...
प्रचंड शक्तिशाली राजकुमार वीरबाहू औदुंबर साम्राज्याचा खरा राजकुमार असूनही त्याच्या नशिबात दुर्दैवाने वनवास...सम्राट भद्रायुने त्यांची प्रथम पत्नी राणी पद्मिनी (वीरबाहूची माता )यांची हत्या घडवून आणली या आरोपाखाली त्यांना झालेली कडेलोटाची शिक्षा, त्यानंतर सावत्र पुत्र,वीरभद्रचे अवघ्या पाचव्या वर्षी सम्राट होणें, पुढे हा क्रूर शासक म्हणून ओळखला जातो, साम्राज्याचा सगळा कारभार रुद्रभट्ट या दुष्ट अमात्याच्या मार्गदर्शनाने... वीरबाहूचे मेळघाटच्या जंगलातले कबिल्यातील वास्तव्य,जीवापाड प्रेम करणारे स्वजन, त्यातलीच भौरी, वीरबाहूची सुंदर प्रेयसी, घनदाट जंगल तेथील जनता त्यांचे राहणीमान, नियम,त्यांच्या शिकारीची पद्धत, याचे सुरेख वर्णन लेखकाने केले आहे, भाषा फार ऐतिहासिक टाईप नसली, तरीही आपलीशी वाटते.. जंगलाच्या बाहेरचे जग कबिल्यातल्या लोकांनी पाहिलेलेचं नसते, कोणी पाहण्याचे धारिष्ट्यही करूं शकणार नाही असे नियमचं होते कबिल्याचे... मात्र शूर वीरबाहूला, बाहेरच्या जगाची ओढ आणि माता पद्मिनीवर झालेल्या अन्यायाचा प्रतिशोध घेण्याची तीव्रता, स्वस्थ बसू देत नाही आणि तो कबिल्यातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो... इथून पुढे खरी कथा चालू होते, रंजक बनत जाते,खिळवून ठेवते👍
वीरबाहूचा प्रतिशोध पूर्ण होतो कां?त्याच्या वनवासी आयुष्याचे रहस्य काय? भौरी आणि कबिल्यातल्या प्रेमळ लोकांना सोडून वीरबाहू कायमचा जाऊ शकतो कां? रुद्रभट्ट, वीरभद्र यांच्या छळाचा अंत कसा होतो? महाराणी पद्मिनी आणि सम्राट भद्रायु यांचे रहस्यमयी जाणे कसे उलगडते? या सगळ्यां प्रश्नांची उत्तरे पुस्तकं वाचूनचं मिळतील 👍..
खुप दिवसांनी अश्या काल्पनिक पुस्तकात रमले, कधी तरी वास्तवापेक्षाही काल्पनिक जग सुंदर वाटते,निखळ मनोरंजन करते हेच खरे 👍 चित्रपट किंव्हा मालिका पाहताना जसे,अरे हे असे नको व्हायला हवे होते, हे असेच व्हायला हवे होते, असे म्हणून आपण त्यात गुंतून पडतो, तसेच कुठे तरी वाचताना वाटते..या पुस्तकावर एखादा मस्त भव्यदिव्य चित्रपट येऊ शकतो... लेखकानेही तसा काही नक्कीच विचार केला असणार, कारण लिखाण शैली अगदी त्याचं पद्धतीची आहे 👍युवा लेखक प्रेम धांडे हे कलर्स मराठीवर, सध्या दोन मालिकांचे संवाद लिहीत आहेत..ते सिनेमा क्षेत्रात कित्येक वर्षांपासून संवाद लेखनाचे काम करतात त्यामुळे हे त्यांचे पाहिलेच पुस्तकं असले तरी लिखाणात अजिबात नवखेपणा जाणवत नाही, पुस्तकं आपलेसे वाटते.. काही तरी हटके, टेंशनमुक्त वाचण्याची इच्छा असल्यास हे पुस्तकं नक्की वाचा... 👍👍👍
©Manisha Sanndip...
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know