मुंबईतील गुन्हेगारी जगात अंडरवर्ल्ड याबद्दल प्रत्येकाला एक प्रकारचं कुतूहल असतं परंतु गुन्हेगार जर एक स्त्री असेल तर हे कुतूहल कितीतरी पटीने वाढत ?
मुंबई अंडरवर्ल्ड मध्ये अख्याईका बनलेल्या काही स्त्रियांच्या जीवन कहाण्या या पुस्तकांमध्ये चित्रित केल्या आहेत. मुंबईच्या अंडरवर्ल्डची यापूर्वी कधीही उजेडात न आलेली बाजू अत्यंत चित्तवेधक शैलीत सखोल संशोधन करून या पुस्तकात मांडली आहे.
रुडयार्ड किप्लिंग यांचे एक वाक्य हे पुस्तक वाचल्यानंतर नक्की पटत - " पुरुषापेक्षा स्त्री अधिक धोकादायक असते "
जेनाबेन दारू वाली :
दाऊद इब्राहिम ज्या महिलेला आई मानतो, करीम लाला, हाजी मस्तान, वरदराजन आपल्या प्रत्येक गुप्त कारवायांमध्ये ज्या महिलेचा सल्ला घेतात तीच ही जेणाबेन. ही महिला डॉन एक प्रकारे अंडरवर्ल्डची संकटमोचक सल्लागार ठरली.
गंगुबाई कोठेवाली ( कामाठीपुरा )
अतिशय तरुण वयामध्ये लग्नाचे आमिष दाखवून केवळ ५०० रुपयांसाठी वेश्या व्यवसाय करण्यास प्रवृत्त केलेली दुर्भागी स्त्री ते
" बडी घरवाली " असा तिने केलेला प्रवास.
एकदा तिने केलेल्या भाषणात
" तुमच्यापैकी अनेकांना वेश्या म्हणजे स्त्री जातीला कलंक आहे असं वाटतं पण आमावश्या मुळीच हजारो स्त्रियांचा पावित्र्य अबाधित राखलं जातो हे तुम्ही विसरता "
वेश्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्यावेळच्या पंतप्रधानाकडे गेलेली गंगुबाई कोठेवाली. गंगुबाई एकेठिकाणी अतिशय समर्पक उदाहरण देऊन वेश्यावस्ती ला संरक्षण देण्याची मागणी करते
" प्रत्येकाच्या घरात संडास असतोच बाकीचं घर स्वच्छ राहावा हाच उद्देश त्यामागे आहे ना ? शरीरातील घाण फक्त तिथेच टाकली जाते अन्यथा सारं घर घाण झालं असतं नेमके ह्याच कारणासाठी प्रत्येक शहरामध्ये वेश्यावस्ती साठी जागा राखून ठेवावी. "
आणि ही मागणी मान्य ही केली गेली.
अश्रफ खान ( सपना) :
आपला पती मेहमूद ची बनावट चकमकीत केलेले एन्काऊंटर व यामागे असलेला दाऊद. व नंतर तिने दाऊदला संपवण्याची घेतलेली शपथ व या ध्येयाने प्रेरित होऊन तिने केलेला थक्क करणारा प्रवास. शेवट पर्यंत आपल्या धेयाशी एकनिष्ठ राहून दाऊद चे मुंबईमध्ये चालणारे तस्करी व्यवसाय, दारूचे गुत्ते, डान्सबार उधळूनलावण्याचा केलेला प्रयत्न व यातच तिचा झालेला दुर्दैवी अंत झाला.
महालक्ष्मी पापामनी:
मुंबईतील सोनापूर या मोठ्या झोपडपट्टीची अनभिषिक्त सम्राज्ञी म्हटले तर वावगे ठरणार नाही. हेरॉईन या ड्रग्स चा मोठा व्यवसाय तिने अनेक वर्ष चालवला. तिने हजारो तमिळ कुटुंबियांना मुंबईमध्ये आणून वसवले त्यांना रोजगाराला लावले. परंतु पापामनी ने ज्या दोन व्यक्ती साठी पैसा कमावला ना तेच (नवरा व मुलगी) तिच्याविरुद्ध न्यायालयात गेले हा केवढा दैवदुर्विलास.
मोनिका बेदी:
पंजाब मधील एका शीख कुटुंबात ईल सुसंस्कारित मुलगी बॉलिवूडमध्ये आपलं नशीब आजमावण्यासाठी मुंबईत आलेली व आपल्या यशाकडे व्यवस्थित वाटचाल करणारी. परंतु नंतर आबु सालेम प्रेम प्रकरणात गुंतली गेली आणि नशिबाने तिच्याकडे पाठ दाखवली.
आशा गवळी ( झुबेदा मुजावर):
दगडी चाळ आणि भायखळा मध्ये ' मम्मी ' या नावाने प्रसिद्ध असलेली स्त्री. डॉन अरुण गवळी ला ' अखिल भारतीय सेना ' हा पक्ष संघटित करण्यास प्रवृत्त करणारी स्त्री. अरुण गवळीच्या सततच्या तुरुंग वारीदरम्यान त्याचे साम्राज्य लीलया हाताळणारी मम्मी.
मुंबईच्या गुन्हेगारी विश्वावर पुरुष गुन्हेगाराला इतक्याच कारस्थानी, पाताळयंत्री आणि साहसी गुन्हेगार स्त्रिया देखील होत्या हे सत्य मांडणार वाचनीय पुस्तक.
Gopal Kathokar
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know