Friday, June 11, 2021

अति परिणामकारक लोकांच्या सात सवयी.(Seven Habits of Highly Effective People) -Stephen. R Covey

व्यक्तिमत्व विकासासाठी,माणसाला परिपुर्ण बनवणारे, ऊत्कृष्ट पुस्तक-
 अति परिणामकारक लोकांच्या सात सवयी.(Seven Habits of Highly Effective People) -Stephen. R Covey
लेखक-स्टीफन आर. कोवे... मराठी अनुवाद विदुला टोकेकर.
जिवनाच्या प्रत्येक टप्प्यावर स्वत:ला बदलण्याची ईच्छा असणार्या समाजातील प्रत्येक घटकातील व्यक्तीसाठी ऊपयुक्त असे हे पुस्तक नक्कीच प्रत्येकाने वाचलेच पाहिजे. 
वैयक्तिक,राजकीय,सामाजिक,धार्मिक,व्यवसायिक,औद्योगिक मग क्षेत्र कोणतही असो प्रत्येक बाबतील यशाची अपेक्षा ठेऊण माणुस काम करत असतो.... जिवनाबाबत,प्रत्येक क्षेत्राबाबत एक विशिष्ट धारणा घेऊन आपण जगतो.... ति धारणा, ति जगण्याची चौकट आपल्या घरातील वातावरण, पारंपारिक संस्कार किंवा आपण ज्या परिघात वावरतो त्यानुसार बनते किंवा त्याचा विपरित परिणाम म्हणुन बनत असते.... परंतु यातील सगळ्याच धारणा योग्य असतीलच असे नाही आणि त्यांची योग्यताही  आपण तपासत नाही... कारण काळ, वेळ, परिस्थितीनुरूप बदल अपेक्षित असतो तो आपण स्विकारत नाही त्याचा परिणाम दैनंदिन घटना वर, जिवनावर होतो.... त्या चुकीच्या सवयीमुळे किंवा धारणेतुन नव्या समस्या जन्म घेतात आपण केवळ त्या समस्यांवर केंद्रीत होऊन अधिकच गुरफटत जातो व अपेक्षित, इच्छित परिणामापासुन दुरावतो. यासाठी मुळ धारणा कारणीभुत असते एकदा ति बदलली की सर्वकाही मनासारखं घडतानां अनुभवता येऊ शकण्याची दृष्टी देण्याचं काम हे पुस्तक करतं. 
     होय मि असाच आहे, सगळा संघर्ष माझ्याच वाट्याला आहे, माझा स्वभावच असा आहे, कुणाला काय वाटायचं ते वाटु देत, ते माझ्याविषयी असेच का वागत असतील, मला नेहमीच अपयश का येतं, मि सर्वांसाठी झटतो परंतु माझ्यासाठी कुणीच नाही.... दैनंदिन कौटुंबिक असो कि राजकीय, सामाजिक असो कि व्यवसायिक हे वैफल्यग्रस्त विचार प्रत्येकालाच भेडसावत असतात.याचं कारण असतं आपल्यातील चुकीच्या धारणा म्हणजेच त्यातुन निर्माण झालेल्या चुकीच्या सवयी...स्वत:तील बदल अशक्यप्राय वाटतात पण ते बदलच खरे आत्मिक आनंदाचे स्त्रोत आहेत याची प्रचिती या सात सवयी दिल्याशिवाय राहत नाही.
अग्रकर्मी होऊन जबाबदारी घेतल्याशिवाय काहीच प्राप्त होत नाही. 
हेकरा,हारु-हारु,जिंकु-हारु,हारु-जिंकु पद्धत सोडुन सदैव जिंकु-जिंकु विचार आव्हानात्मक वाटतो परंतु अंगिकारला तर सगळे आंतरिक द्वेष, मतभेद दुर करायाला लावतो.... केवळ स्वावलंबन सर्वार्थाने माणसाला स्वार्थी, धूर्त, लबाड, अहंकारी, अहंभाव निर्माण करणार ठरत... बाहेरुन जरी आलबेल वाटत असलं तरी आतुन मात्र असहनीय वेदनादायी कृत्रिम जगण्यापेक्षा कुणाच्या तरी आधाराने, परावलंबाने  जगण्याचा विचार येतो तेव्हा परावलंबी माणसं याऊलट पुर्णतः:शंभर टक्के समर्पित होऊन लाचार होऊन, स्वत्व हरवुन जगतात.... तिथही वेदनादायीच अनुभव येतो... या एका धारणेवरचा जीवनक्रम कधीच समाधानांन  जगु देत नाही याऊलट पुस्तकातील लेखकाची परस्परावलंबनाची संकल्पना आपल्याला निश्चित दिशा दायी  ठरेल अशी आहे.आपल्या प्रभावाचं वर्तुळ विस्तृत करण्यात वेळ दिला तर नक्कीच अपेक्षीत बदल अनुभवता येतात.... त्यासाठीच्या लेखकानं सुचवलेल्या कामाच्या, नियोजनाच्या चौकटीचं तंतोतंत पालन केलं तर प्रभावाच्या वर्तुळाबरोबरच परस्परावलंबन जे मग व्यवहारीक असो कि नातेसंबंधातील असो नक्कीच दृढता निर्माण करते हा विचार खरोखर अनुकरणीय आहे. कोणतीही कृती शेवट लक्षात घेऊन केली तर मध्येच निर्माण होणार्या समस्या उद्भवत नाहीत त्याचप्रमाणे आपल्याला कोणीतरी समजुन घेण्याची अपेक्षा ठेवण्यापेक्षा त्या अपेक्षाच्या पातळीवर जाऊन आपण दुसर्याच्या जागी ठेऊन आपल्यात दुसर्याला कितपत समजुन घेण्याची क्षमता आहे का याचा शोध आणि बोध करुन देणारी सवय आपण शिकतो.... आपल्या आयुष्यातील प्रत्येक घटनेला आपणच जबाबदार असतो... आपण एखादा अपराध केला नसतानां आपण जेव्हा नाहक आरोपी म्हणुन समाजाच्या नजरेतुन पाहतो तिथेच चुक करुन वैयक्तिक दुःखात, अपयशात भर घालतो.... घटना, प्रसंग कोणताही असो आपला प्रतिसादच आपल्यावर, समाजावर त्याचे पडसाद पाडत असतो... म्हणुन आपण का प्रतिसाद द्यायचा हा प्रश्न स्वत:ला विचारला तर समस्या आपल्या जवळही येऊ शकत नाही... कारण त्या बाहेरील गोष्टी आत किती आणि कशा स्वरुपात घ्यायच्या हे आपण निश्चित करु शकतो हे शिकवणारे हे पुस्तक आहे. जेव्हा आपण समस्या आहे असा विचार करतो तो विचार हिच समस्या असते.... तिथे जे काही असतं त्याला आपण आपलं नियंत्रण करु देतो धारणा बदल हा बाहेरुन आत असतो...आपण बदलण्यापुर्वी ते बाहेरच बदलायला हवं असतं. 
एकीकडे सर्वोच्च नकारात्मकतेचं टोक किंवा दुसरीकडे फाजिल आत्मविश्वासाची धारणा आपली भुमिका व त्याचे परिणाम ठरवते....
अतिशय सोप्या शब्दात, ऊदाहरणाद्वारे,अनुभवातुन लेखकाने सात सवयी मांडलेल्या आहे.... पुस्तकातील प्रत्येकबाबीचं विश्लेषण करायच म्हटल तर स्वतंत्र पुस्तक तयार होईल..... या सवयी जगातील प्रत्येकाने अंगिकारल्या  तर जगातील सगळ्या समस्या 100%संपतील असे मला वाटते..... या सवयी अंगीकारण, स्वीकारण वाटतं तेवढ सहज आणि सोप नाही(हाही एक नकारात्मक विचार)..... याला पुन्हा-पुन्हा वाचुन एक एक सवय जरी आपण स्वीकारली तरी सुखदायी परिणाम मिळतात हा माझा अनुभव आहे... नक्कीच या सवयी आत्मसात करण्याचा माझाही प्रयत्न असेल.... कारण माझ्यातला मि जगाच्या बदलाची अपेक्षा करतो.... ज्या दिवशी स्वत:चा शोध स्वत:ला लागतो तेव्हा जगाच्या बदलाचा प्रश्नच उरत नाही........! 

S.P

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know