(No Excuse ! The Power of Self Disipline )
लेखक - ब्रायन ट्रेसी
अनुवाद - शोभन शिकणीस
प्रकाशक - मंजुळ पब्लिकेशन
लेखमाला - भाग सहावा (अंतिम भाग)
स्वयंशिस्तीने दर्जेदार आयुष्य जगण्यासाठी
1️⃣ आनंद
माणसाचे खरे यश त्याचे स्वतः चे सुख मिळवण्याची क्षमता आणि आनंदी असण्याची इच्छा यावर अवलंबून आहे
माणसाचे स्वतःवर नियंत्रण असेल तर आनंदी होऊ शकतो.
1.स्वतःच्या आयुष्याला स्वतः जबाबदार रहा
2.स्वतः चे निर्णय स्वतः घ्या आणि निर्णयाच्या परिणाम जे काही असतील त्यासाठी जबाबदारी घ्या.
3.वाईट नातेसंबंध, शारिरिक आजार, शिक्षणाचा अभाव, वाईट भूतकाळ हया सार्या गोष्टींना तुमचे नियंत्रण घेण्यापासून रोखा.
4.आनंद हे समाधानाचे बायप्राँडक्ट आहे त्यामुळे सतत समाधानी राहण्यासाठी योग्य आदर्शवादी जीवन जगा
➡️उत्तम आरोग्य म्हणजे उर्जावान आणि आजार नसलेले शरीर बनवा
➡️ आनंदी नातेसंबंध होण्यासाठी सर्वांबरोबर उच्च गुणवत्तेचे संबंध प्रस्थापित करा.कुणालाही गृहीत धरू नका
अगदी स्वतः शी ही उत्तम संबंध ठेवून स्व-आदर जपा
➡️ परिपूर्ती चा आनंद देणारे ,कार्यमग्न ठेवणारे, आपल्याला 100% योगदान द्यायला लावणारे अर्थपूर्ण काम करा.
➡️ आर्थिक बाबतीत स्वयंपूर्ण बनून आर्थिक स्वातंत्र्य अनुभवा
➡️ जे व्हायला समर्थ आहात त्या सार्याच क्षेत्रात आपल्या अंगभूत गुण,कलाकौशल्य विकसित करून प्रकटा
➡️ अन्न वस्त्र निवारा सुरक्षितता याबरोबरच स्विकारार्हता मिळवून कशाचाही अभाव न राहावा.
➡️ आपली सारी स्वप्ने अडथळयांवर मात करून पूर्ण करत आपला आत्मसन्मान मिळवणे आणि तो टिकवणे
2️⃣ वैयक्तिक आरोग्य
आरोग्य हे देखील आनंदाचे मुख्य कारण आहे त्यामुळे स्वयंशिस्तीने आरोग्याच्या उत्तम सात सवयी लावा आणि जपा
➡️ Daily Healthy Food intake
दोन जेवणात चार तासाचे अंतर तसेच जेवण आणि झोप यात तीन तासाचा गँप
➡️ सुस्ती न आणणारा हलका फुलका आहार
➡️ रोज किमान 30 मिनिटे नियमित पळणे/चालणे/स्विमिंग इत्यादी
➡️ रस्त्यावर वाहतुकीच्या नियमांचे पालन
➡️धूम्रपान व इतर व्यसने टाळा
➡️ पचनशक्ती सुधारण्यासाठी प्रयत्न
➡️आरोग्याचे योग्य मापदंड पाळणे
1.योग्य वजन गाठणे आणि राखणे
2.योग्य आहार (olympic diet)
3.योग्य व्यायामाने हार्मोन संतुलन ,ह्दय फिट ठेवणे
3️⃣ शारीरिक तंदुरुस्ती
व्यायाम आणि शारीरिक शिक्षण यांनी जीवनशैलीत सुधारणा करून माणूस तंदुरुस्त बनू शकतो
स्वयंशिस्तीने स्वतःला सवयी लावा
➡️ रोज 30 मिनिटे व्यायाम
➡️ सकाळी व्यायाम केल्याने हार्मोन्स संतुलित होतात माणूस आधिक उत्साही,सर्जनशील, बुद्धिमान, निरोगी बनतो
➡️ व्यायामाशी बांधिलकी स्वीकारा
त्यासाठी कोचचे मार्गदर्शन घ्या ,व्यायामासाठी लागणारी साधने आणा
➡️ संघटित खेळात भाग घ्या म्हणजे शिस्तबद्धता आणि वेळव्यवस्थापन जमेल
➡️नियमित व्यायामाची सवय ठेवा
➡️ आधी दोन महिने चाला मग जाँगिंग मग धावणे आणि त्यानंतर मँरेथाँन मध्ये सहभाग असे ध्येय ठेवून सवयी विकसित करा
4️⃣ वैवाहिक नातेसंबंध
माणसाचे चरित्र्य आणि व्यक्तीमत्व हयाच मोजमाप म्हणजे दीर्घकाळ प्रेमळ नातेसंबंधात राहण्याची क्षमता
दोघांचे स्वभाव भिन्न असले तरी सुखी वैवाहिक जीवनासाठी एकमेकांशी अनुरूप होणे.दुसऱ्याला सुखी बनवण्यासाठी झटताना स्वतः सुखी होणे
स्वयंशिस्तीने वैवाहिक नातेसंबंध दीर्घकाळ टिकणारे बनवण्यासाठी
1.श्रोते व्हा
2. कुठलीही प्रतिक्रिया देण्यापूर्वी बोलण्याचा रोख आणि शब्दांचा अर्थ समजून घ्या,समजले नसेल तर विचारा पण मुद्दे स्पष्टपणे समजून घ्या
3.बोलायला सुरुवात करताना सर्वात आधी अभिप्राय द्या म्हणजे आपण दुसरा जे बोललाय तेच आपण ऐकलयं हे त्याला कळेल
4.आयुष्यभरासाठी जोडीदाराशी पूर्णपणे बांधिलकी जपा,मोहापासून दूर राहा
5. जोडीदाराशी अनुरूप होण्यासाठी स्वतः मध्ये बदल करण्यासाठी तयार राहा.
6.जोडीदाराला प्रियकरापेक्षा मित्र समजा
5️⃣ मुलांचे संगोपन
तुम्ही मुलांचे संगोपन कसे करता हयावर पुढच्या अनेक पिढ्या कसे वागतील ते ठरते
म्हणून स्वयंशिस्तीने उत्तम पालक होण्यासाठी
1.आपले शब्द ,कृती ,वर्तन यांनीच मुलांवर संस्कार होतात याचे कायम भान ठेवा
2.मुलांना विनाअट प्रेम द्या .ते कसेही असले तरी त्यांचा स्वीकार करा
3.मुले सोबत असताना रागावर नियंत्रण ठेवा
4.मुलांच्या मनात असुरक्षिततेची, कमीपणाची भावना निर्माण होणार नाही याची काळजी घ्या.
5.मुलांच्या चुकांना कनवाळूपणे समजून घेऊन त्यांना अडचणीवर मात करायचे धडे द्या
6.मुले एक प्रयोग म्हणून आधी खोटे बोलतात नंतर तो प्रयोग यशस्वी होत गेला की कायम खोटे बोलतात त्यामुळे पालकांनी आधी स्वतः खरे बोलावे
7.पालकांनी सतत स्वतःच्या आचरणातून मूल्यशिक्षण आणि सदवर्तनाचे धडे द्यावेत
6️⃣ मैत्री
आपल्या आयुष्यातील 85% आनंद हा इतर माणसांकडून येतो त्यामुळे इतरांशी आणि स्वतः शी सुसंवाद अत्यंत महत्वपूर्ण आहे
माणसाने सर्वप्रथम स्वप्रतिमा सुधारून आनंदी व्हावे
तो स्वतःला कसे बघतो,इतर लोक कसे बघतात असे त्याला वाटते आणि लोक नक्की कसे बघतात ,वागतात हया तिन्ही गोष्टीत ताळमेळ आणि उत्कृष्टता आणली की माणूस आनंदी होतो.
मित्रत्वाचे स्वयंशिस्तीने स्थापित करण्यासाठी
1. इतरांचा आत्मसन्मान जपा
2.ते जसे आहेत तसे स्वीकारा
3.इतरांच्या चांगल्या गुणांचे कौतुक करा,
चांगल्या पेहराव,चांगल्या कृतीची प्रशंसा करा
4.इतरांशी जुळवून घ्या
5.इतरांच्या चुकांसाठी त्यांच्यावर टीका टाळा.
6.ते बोलत असताना उत्तम श्रोते व्हा
7.सौजन्याने ,सोहार्दतेने सहानभूती पूर्वक व्यवहार ठेवा.
8.त्यांच्या समस्यांवर जिव्हाळ्याने चर्चा करा ,त्यांना योग्य मार्ग दाखवा,
9.त्यांची नेहमी आपुलकीने चौकशी करत राहा, त्यांची जाणीव ठेवा.
7️⃣ मनशांती
माणसाच्या मनाची श्रीमंती दिसणारया श्रीमंती पेक्षा खूप महत्त्वाची आहे. स्वयंशिस्तीने मनशांती मिळवण्यासाठी
1.बाहय गोष्टीत इतकेही गुंतून जाऊ नये की आपले शरीर, आरोग्य हयाकडे दुर्लक्ष होईल.
2. कोणत्याही परिस्थितीत आपण किती बरोबर की चूक हे पाहण्यापेक्षा किती आनंदी आहोत हे पाहा
3.कोणावरही कोणत्याही प्रकारचे दोषारोप करणे टाळा.
4.दुसऱ्याने वाईट वागवले म्हणून त्रागा करून मनशांती ढळू देऊ नका
5.इतरांच्या आणि स्वतः च्या अपराधांना अंतकरणातून क्षमा करा
6.नकारात्मक गोष्टीचे चिंतन नको
7.भूतकाळातील वाईट गोष्टी विसरून जा
समाप्त
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know