Friday, June 11, 2021

#सबबी_सांगणे_सोडा....स्वयंशिस्तीची जादू(No Excuse ! The Power of Self Disipline ) भाग 5

#सबबी_सांगणे_सोडा....स्वयंशिस्तीची जादू
(No Excuse ! The Power of Self Disipline )

                            लेखक - ब्रायन ट्रेसी
                    अनुवाद - शोभन शिकणीस
                  प्रकाशक - मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग पाचवा

स्वयंशिस्तीने नोकरी/व्यवसाय यात प्रगती साधण्यासाठी

1️⃣ काम
 यशस्वी माणसे वेगळे काम करत नाही तर काम वेगळया पद्धतीने करतात त्यामुळे स्वयंशिस्तीने काम उत्कृष्ट करण्यासाठी
1.कामाचे प्राधान्यक्रम ठरवून आधिक  मोलाची महत्त्वाची तीन काम रोज परिश्रमपूर्वक एकाग्रतेने करण्यावर भर द्या
2.आपल्या कामातील प्रत्येक तासाचा पगारातील अथवा नफ्यातील हिशोब पाहून आपली कामगिरी आधिक चांगली होण्यावर भर द्या.
3.आधिक परिश्रम करणारी व्यक्ती म्हणून तुम्हाला ओळखले जावे ...टंगळमंगळ करणारी नाही
4.थोडे लवकर येऊन एक तास उशिरापर्यंत काम करा
5.बाँसकडून आधिक कामाची अपेक्षा करा
आणि ते जलदगतीने चुका न करता पूर्ण करा
6.कामाची गती मंदावतेय तर स्वतःला म्हणा "Back to work..Focus"

2️⃣ नेतृत्व
अनुयायी सहज भेटतात पण नेते कमवावे लागतात आणि नेत्याला स्वयंशिस्तीची सर्वात जास्त गरज असते कारण तो एक जबाबदार व्यक्ती असतोच आणि त्याचेच अनुकरण लोकांकडून नकळत घडत असते.
1.नेत्याने प्रत्येकाला त्याच्या अस्तित्वाची जाणीव करून प्रत्येक कामामागची भूमिका स्पष्टपणे समजावून सांगायला हवी.
2. स्वतः उत्तम कामगिरी करणारा चांगला माणूस व्हावे जेणेकरुन उत्तमोत्तम सेवा पुरवता येईल.
3.नेत्याने कायम बांधिलकीने काम करावे
आणि इतरांना प्रेरणा द्यावी
4.नेत्यांनी काम करताना येणार्या अडचणी शोधून त्या दूर करण्यासाठी झटावे.
5.नेत्यांनी सर्जनशीलतेने नवनवीन कल्पनांच्या वापराने सेवा सुधारावी त्यासाठी कायम ज्ञानार्जन करत राहावं
6.नेत्याचे वर्तन सुसंगत आणि विश्वासार्ह असावे, संकटसमयी तो शांत सकारात्मक संयमी आत्मविश्वासपूर्वक आणि तर्कशुद्ध विचार करणारा असावा.
7.नेत्याने सहकारयांची उपस्थितीत आणि अपरोक्ष स्तुतीच करायला हवी,त्यांना प्रोत्साहन द्यायला हवे.तसेच नकारात्मक न बोलता प्रश्न असतील तर ते चर्चेने सोडवायला हवे 

3️⃣ व्यवसाय वृद्धी
व्यवसायात टिकून राहायचे असेल स्पर्धेला तोंड देत जोमाने वाढ करावी लागते आणि नफाही कमवावा लागतो.
स्वयंशिस्तीने आपण व्यवसायाला आधिक फायदेशीर बनवू शकतो
1.आपली उत्पादन आधिक उत्तम, गुणवत्तापूर्ण आणि पुरेशा संख्येत ग्राहकांकडे पोहचतील अशी योजना बनवून त्यावर टिकून राहून 
2.प्रतिस्पर्ध्यावर मात करण्यासाठी सखोल, अभ्यासपूर्ण काळानुरूप व्यावसायिक योजना बनवून नियोजन सुधारणा करण्यासाठी
3.संभाव्य ग्राहकाचे निश्चित ग्राहकात रुपांतर करण्यासाठी तसेच आधीच्या ग्राहकांना समाधानी ठेवण्यासाठी
4.गुणवत्तेत तडजोड न करता उत्तम सेवा सर्वदूर पोहचवण्यासाठी प्रत्येक विभागाची कामगिरी चांगली ठेवण्यासाठी.
5.लक्ष्यावर केंद्रीत राहून दूरदृष्टी आणि सातत्याने विकास करण्याचा सर्वांगीण दृष्टिकोन ठेवण्यासाठी

4️⃣. विक्री
विक्री हे व्यवसायाचे मुख्य अंग आहे कारण विक्री झाली तरच इतर सगळे विभाग आणि पर्यायाने व्यवसाय टिकतो
त्यामुळे स्वयंशिस्तीने विक्रीत सातत्याने वाढ व्हायला प्रयत्न करावे लागतात
1. विक्रेत्यांनी जास्तीत जास्त वेळ ग्राहकांसोबत घालवावा तसेच जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहचावे
2.विक्रेत्याने सकारात्मक आशावादी आनंदी असावे जेणेकरुन तो ग्राहकांच्या समस्या सोडवू शकेल.
3.विक्रेत्याने कामाचे आगाऊ नियोजन करावे
4.विक्रेत्याने कौशल्यपूर्ण सादरीकरण करुन ग्राहकसंख्या वाढवावी.
5.सतत शिकत राहून आपली कौशल्ये तसेच कामाचा दर्जा उंचवत ठेवावा.

5️⃣ पैसा
आर्थिक अडचणींमागे मुख्य कारण स्वयंशिस्तीचा अभाव हेच असते
त्यामुळे स्वनियंत्रण आणि स्वयंशिस्तीने
1. खर्चावर नियंत्रण ठेवावे
2.पैश्याबद्दल कडिंशन्ड प्रतिसाद असावा
3.खर्च करून आनंद मिळवण्यापेक्षा बचतीत आनंद शोधावा..दरमहा उत्पन्नाच्या कमीत कमी 10% रक्कम बचत करावी
आणि खर्चापूर्वी बचतीचे पैसे वेगळे करणे.
4.कर्जाचे हफ्ते भरून कर्ज कायमचे मिटवणं 
5.उत्पन्न अपुरे असेल तर उत्पन्नाचे नवनवे मार्ग शोधणे.

6️⃣ वेळेचे व्यवस्थापन
ज्याला वेळेचे व्यवस्थापन जमत नाही ते आयुष्याचे व्यवस्थापन करू शकत नाही
कारण वेळ वाचवता,साठवता येत नाही
तो स्वयंशिस्तीने वापरून महत्त्वाची कामे करायची असतात त्यामुळे
1. कुठलेही काम हाती घेण्यापूर्वी ते महत्त्वाचे आणि प्राधान्याने करण्याचे आहे का हे तपासून पाहा.तसेच त्या कामाचा आपल्या आयुष्यावर काय परिणाम होणार आहे आणि आपल्याला कशाचा त्याग करावा लागणार आहे हेही जाणून घ्यावे.
2.रोज सकाळी आज करावयच्या कामाची यादी बनवायची आणि मग प्राधान्यक्रम ठरवून ती कामे उरकायची
3.प्राधान्यक्रम ठरवण्यासाठी ABCDE पद्धत वापरा
A- must do (Top Priority)
B - should do (medium Priority)
C - nice to do (zero Priority)
D - Delegate (Transfer to other)
E - Eliminate (Remove from list)
समजा A,B,C प्रकारची एकापेक्षा जास्त कामे असतील तर A1,A2,A3 असे अनुक्रमांक द्यावे 
A प्रकारची सर्व कामे संपल्यानंतरच B प्रकारची कामे करावीत
समजा सारी कामे आजच पूर्ण नाही होऊ शकली नाही तर उद्या ती उर्वरित कामे त्या दिवशीच्या कामाबरोबरच प्राधान्याने करायची असतात.
4. एका वेळी एकच काम 100% समर्पणाने आत्मविश्वासपूर्वक करायचे
त्यात सर्वोत्कृष्टता आणावी.

7️⃣ प्रश्नांची उकल
आयुष्य म्हणजे सततची प्रश्नमालिकाच असते ,एक प्रश्न सोडवला की दुसरा उभाच असतो त्यामुळे स्वयंशिस्तीने प्रश्नांची सोडवणूक करून व्यक्तीची गुणवत्ता आणि चरित्र्याची ताकद ठरते.
1.प्रश्न व्यवस्थित समजून घ्या
2.प्रश्न सहज सुटणारा आहे की आपल्याला काय करावे लागेल ते पाहा
3. प्रश्नासोबत काही उपप्रश्न आहेत का तेही शोधा
4.प्रश्नांची मूळ शोधा
5.शक्य तेवढी उत्तर लिहून काढा
6.सर्वात चांगले उत्तर निवडा
7.उत्तर निवडीनंतर योग्य कृती करा
8 उत्तराचे पडसाद काय उमटतात त्याचे मूल्यमापन करा.
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know