WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Wednesday, June 9, 2021

रिच डँड पुअर डँड

#पुस्तकपरिचय
रिच डँड पुअर डँड 
लेखक : रॉबर्ट कियोसाकी
अनुवाद : अभिजित थिटे

1997 ला बाजारात आलेले सर्वाधिक खपाचे जागतिक कीर्तीचे आर्थिक साक्षरतेबाबत जनजागृती करणारे पुस्तकं
वरकरणी हे राँबर्ट कियोसाकी  हया जपानी अमेरिकेन व्यक्तीचे जीवनचरित्र वाटते पण छोट्या छोट्या प्रसंगातून समृद्ध संपन्न श्रीमंत आयुष्य कसं जगायचे आणि त्यासाठी काय करायचे याचा परिपाठ हया पुस्तकात  घालून दिला आहे.

 राँबर्ट कियोसाकी यांना त्यांच्या मित्राच्या वडीलांनी रिचर्ड किम अर्थात रिच डँड यांनी वयाच्या नवव्या वर्षापासून आर्थिक साक्षर कसं बनवलं हयाचं सुंदर वर्णन पुस्तकात आलं आहे.

आपण कुठलेही काम करत असू आणि कितीही कमवत असू 
पण जर अर्थसाक्षर नसू तर आपण त्या पैश्याचे गुलाम होऊ 
आणि जर आपण अर्थसाक्षर झालो तर पैश्यालाच पैसे कमावण्यासाठी कामाला लावू आणि  आपण खर्या अर्थाने आपण  श्रीमंत होऊ.

माणसं कामाला जातात पैसे कमावतात त्यातून गरजा भागवतात ..कर भरतात आणि मोठं घर , गाडी यासाठी कर्ज घेऊन वर्षानुवर्षे त्या विळख्यात अडकून पडतात हयालाच लेखक RAT RACE म्हणतात.
वास्तविक हया गोष्टी त्यांच्या मालमत्ता (Assets) होत नाहीत तर बोजा (Liability) बनतात कारण त्यातून कुठलेही उत्पन्न मिळत नाही.त्यामुळे  सर्वप्रथम बचतीला प्राधान्य द्यावे
बचतीनंतर घरखर्च आणि इतर खर्चाला...

बचत केलेली रक्कम फक्त सुरक्षित गुंतवणूक (Saving Account, FD , Bond, Mutual Fund ,etc ) करत राहिलात तर पैसा वाढेल पण तो महागाईच्या दराला मात मात्र करू शकणार नाही त्यासाठी ती रक्कम सूज्ञपणे शेअर बाजारात स्टाँकमध्ये गुंतवणूक करा आणि त्यासाठी तांत्रिक ज्ञान घ्या , बाजाराचा अभ्यास करा जेणेकरून जोखीम असली तरी ती कमी होईल आणि परतावा जास्त मिळेल आणि पर्यायाने आपल्या छोट्या रकमेचे रूपांतर मोठ्या रक्मेत होईल.

लेखकाला सुचवायचे आहे की आर्थिक ज्ञान मिळवण्यासाठी आधी स्वतः मधे गुंतवणूक करा त्यासाठी पुस्तके वाचा,
सेमिनार अटेंड करा, सीडीज ऐका
आवडीच्या कामाव्यतिरीक्त अन्य कौशल्य आत्मसात करा 
(Master of one But Jack of All Trade बना)

अर्थसाक्षर झाल्यानंतरही आपण यशस्वी तेव्हाच होऊ 
जेव्हा आपण भीती, स्वसाशंकता, आळशीपणा, उद्धटपणा, 
वाईट सवयी यावर मात करू.
पैसे कमावण्याचे नवनवीन सूत्र शिकू,
योग्य व्यक्ती कडून आर्थिक सल्ला घेऊ,
आदर्श व्यक्तींची कार्यपद्धती समजून घेऊन ती अमलात आणण्यासाठी खुल्या मनाने प्रयत्नशील राहू.
देण्यातून मिळण्याचे सामर्थ्य समजून घेऊन 
स्वतःच्या ज्ञान आणि संपत्तीत वृद्धी करत राहू
वेळोवेळी आपल्या निर्णयांचे परीक्षण करत राहू 
नवनव्या कल्पना राबवत राहू...
आणि विचारांना चालना देऊन मेंदूला सतत कार्यक्षम ठेऊ

शेवटी गरीबी आणि श्रीमंती हया दोन्ही मानसिकता आपल्या विचारांवर अवलंबून आहे त्यामुळे विचार करा आणि श्रीमंत व्हा.
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know