लेखक- प्रभाकर बागुल
श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे धाकटे बंधू चिमाजी अप्पा हे वडीलभावापेक्षा म्हणजेच बाजीरावांपेक्षा कुठल्याही बाबतीत कमी नव्हते.
शत्रूला नामोहरम करून सर्वतोपरीने लढा देत मराठा साम्राज्य वाढीसाठी व रक्षणासाठी, पावलोपावली बाजीरावांना साथ देणारे चिमाजी अप्पा हे अजिंक्य होते.
लक्ष्मणाने जशी प्रभूरामाची साथ कधीच सोडली नव्हती, तशीच साथ बाजीरावांना चिमाजी अप्पांची लाभली.
वसई किल्ल्याचा ताबा हे तर चिमाजीरावांच्या जीवनातील खूप मोठे यश होते.
पोर्तुगीज, इंग्रजांना चिमाजीरावांनी अनेक वेळा आपल्या तलवारीची धार दाखवलीय.
बाजीरावांना छत्रसालांनी ज्यावेळी नजराणा म्हणून मस्तानी बहाल केली, त्यावेळी तो नजराणा स्विकारताना साक्षीदार होते केवळ चिमाजीराव.
बाजीरावांना मस्तानीचा स्विकार करून तिच्याशी मंदिरामध्ये विवाह करताना ज्या व्यक्तीने पाहिले व साथ दिली, ते होते चिमाजी अप्पा.
बाजीरावांच्या दुसर्या यवनी पत्नीला म्हणजेच मस्तानीला स्विकारायला समाज तयार नव्हता. अशा वेळेस जग विरूद्ध गेले असता, भावाची साथ न सोडणारा जर कोणी होता तर तो चिमाजी अप्पा.
अशा रितीने चिमाजी अप्पांचा पराक्रम व बंधुप्रेम या कादंबरीत वाचायला मिळते.
फक्त काही ठिकाणी बाजीरावांचे किस्से जास्त प्रमाणात आल्यासारखे वाटतात.
बाकी कादंबरी छान.
Ref shailaja dixit
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know