(No Excuse ! The Power of Self Disipline )
लेखक - ब्रायन ट्रेसी
अनुवाद - शोभन शिकणीस
प्रकाशक - मंजुळ पब्लिकेशन
लेखमाला - भाग चौथा
स्वयंशिस्तीने स्वतः मध्ये सुधारणा
4️⃣ उद्दिष्टपूर्ती
उद्दिष्ट म्हणजे आपल्याला आयुष्यात जे काही साध्य करायच्या आहे अशा गोष्टी.
बर्याच वेळा माणसांना आशा आकांक्षा असतात पण त्याला जबरदस्त इच्छाशक्तीची उर्जा नसते त्यामुळे त्या गोष्टी उद्दिष्ट बनत नाही.
1. आर्थिक, कौटुंबिक, आरोग्य, नातेसंबंध हयाच्याशी संबंधित दहा उद्दिष्ट लिहून काढावीत
लिहिल्यामुळे आपल्या मन मेंदू आणि कृतीतून त्यांचा पाठपुरावा केला जातो.
2. आपल्या उद्दिष्टांना निश्चित कालमर्यादा असावी त्यामुळे एक वर्कफोर्स निर्माण होईल.
3.उद्दिष्ट पूर्तीसाठी लागणारी साधने जसे की ज्ञान,कौशल्य,सहकारी,अडथळे,
जबाबदारी यांची यादी तयार करा.
4. यादीतील कामांचा प्राधान्यक्रम ठरवा
5.प्राधान्यक्रमानुसार योजना ठरवा आणि जलद हालचाली करा.
6.योजनेचे रोज करावयाच्या छोट्या छोट्या कामात विभागणी करून रोज यशाच्या दिशेने वाटचाल करा.
5️⃣ वैयक्तिक उत्कृष्टता
आपल्या अध्ययनाने अंगभूत गुणांचा आणि क्षमतांचा विकास करुन स्वतःचे निरोगी श्रीमंत आनंदी व्हर्जन तयार करायचे म्हणजे वैयक्तिक उत्कृष्टतता.
वैयक्तिक उत्कृष्टतता गाठण्यासाठी
1.आपल्या क्षेत्रातील कुशल आणि ज्ञानी बना त्यासाठी पुस्तके, आँडिओबुक, परिसंवाद चर्चासत्र,संमेलन, वेबिनार यांचा वापर करा. घरी आल्यानंतर टीव्हीला वेळ देण्यापेक्षा दोन तास रोज ज्ञानाप्राप्तीला द्या.
2.कुठल्याही क्षेत्रात प्रभुत्व मिळवायला सात वर्षे लागतात त्यामुळे लगेचच सुरुवात करा
3.रोज आपली कामातील उत्पादनक्षमता वाढवण्यासाठी स्वयंशिस्तीने कामांचे प्राधान्य ठरवून पद्धतशीर नियोजन करावे,ठरवलेले काम एकाग्रतेने करा,काम पूर्ण झाल्यानंतर कामगिरीचे पुनरावलोकन आणि ते आणखी जलद होण्यासाठी नवनवे मार्ग कल्पना शोधा.
4.कुठलाही वेळ उपयोगी आणि कुठलाही माणूस मौल्यवान आहे समजून त्याचा सदुपयोग करा.
6️⃣ धैर्य
धैर्य म्हणजे भीतीवर ताबा मिळवणे.
वैसे डर तो सबको लगता है पर डर के आगे जीत है असे ध्यानात ठेवून सर्व प्रकारच्या भीतींनी (अपयश, गरीबी, पैसा /नोकरी/ मान गमावण्याची भीती) गलितगात्र न होता धाडसाने तोंड देणे.
धैर्य अंगी बाणण्यासाठी
1.मला जमेल,मी घाबरणार नाही असे स्वतःला सांगून भीतीची भावना मनातून काढून टाका. आत्मविश्वासाने सामोरे जा
स्वयंशिस्तीने धीर एकवटून सुप्त मनाच्या साथीने आपली स्वप्रतिमा सुधारा
2.विक्री न होण्याची भीती वाटत असेल तर जास्तीत जास्त ग्राहकापर्यंत पोहचा आणि भाषणाची भीती वाटत असेल तर आधी आरशासमोर, नंतर एखाद्या सकारात्मक शेरा देणारया व्यक्ती समोर, नंतर ग्रुपसमोर बोलण्याचा सराव करा आणि मग धाडसाने स्टेज काबीज करा.
3.भीतीच्या भावनेला कधीच वरचढ होऊ देऊ नका.त्यासाठी ज्याची भीती वाटतेय त्यावर त्वरीत काम सुरू करा
4.भीतीचे मूळ शोधण्यावर भर द्या आणि भीतीची व्याख्या, वाईटात वाईट काय होईल याचा विचार स्वीकार आणि सुधारणा हया मार्गाने वास्तविक भीतींवर मात करा.
5.माणसाला दोनदा धैर्याची गरज असते एकदा सुरुवात करायला झोकून देण्यासाठी आणि दूसर्यांदा कृती करताना टिकून राहायला
दोन्ही वेळा धैर्य दाखवा आणि पुढे जात रहा.
7️⃣ चिकाटी
चिकाटी म्हणजे तात्पुरत्या अपयशाने स्वतःची पीछेहाट न होऊ देता तग धरून राहणे.
स्वयंशिस्तीने माणूस दीर्घकाळ यशासाठी वाटेत आलेल्या सर्व अडथळयांवर मात करण्यासाठी
1.मनात नेहमी दुर्दम्य आशावाद जिवंत ठेवा
2.स्वतःच्या विचारांना नियंत्रित करा
3.स्वतःच्या आत्मसन्मानाला जपत,स्वतःच्या चुकांची जबाबदारी स्वीकारत आत्मविश्वासाने अनिरुद्ध बना.
4.प्रत्येक प्रसंगात आणि आलेल्या सर्व संकटातून धडा घेत त्यामागे लपलेली दैवी देणगीचा फायदा घेत पूर्ण ताकदीनिशी निश्चयपूर्वक पीछेहाटीतून पुन्हा उसळी घेतो आणि यशस्वी होतो.
संदर्भ निलेश शिंदे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know