Two roads diverged in a wood and I...I took the one less travelled by, and that has made all the difference...
रॉबर्ट फ्रॉस्ट च्या या ओळी आठवण्याचं कारण म्हणजे नुकतच वाचलेलं पुस्तक.. 'वाट तुडवताना'. करियर च्या एका टप्प्यावर सरकारी नोकरी मिळत असतानाही ती नाकारून पत्रकारीता क्षेत्रातच एक नवी वाट तुडवण्याचा लेखकाने घेतला निर्णय फ्रॉस्टच्या वरील ओळींशी साधर्म्य सांगतो.उत्तम कांबळे या पत्रकारिता क्षेत्रातील नावाजलेल्या व्यक्तीने प्रामाणिकपणे मांडलेलं आत्मचित्रण.पुस्तकाने त्यांना कसं घडवलं आणि बदलवलं हे सांगणारं, विचार करायला लावणारं पुस्तक.ग्रंथांप्रती कृतज्ञताभाव व्यक्त करणारं. बालवयापासूनच त्यांना वाचनाची ओढ होती मात्र जिथे दोन वेळच्या भाकरीची भ्रांत तिथे पुस्तकासाठी कसले आले पैसे. पण सुप्त इच्छा या केव्हा तरी जाग्या होतातच. पुढे या बुद्धीच्या भुकेने भाकरीच्या भुकेवर मात केलीच आणि शाळा-कॉलेज, लेखन ,पत्रकारिता, संपादक हा प्रवास व्हाया विविधांगी वाचन कसा सुकर होतो ते वाचण्याची मजा प्रत्यक्ष पुस्तकातच मिळेल. त्यांनी वाचलेल्या पुस्तकांची यादी जरी केली तरी एक मोठी wish list तयार होईल. शेवटपर्यंत साधेपणाने व निरपेक्षपणे जीवन जगणे अजूनही शक्य आहे हे ते स्वतःच्या उदाहरणातून दाखवून देतात.एका बातमीने काय होऊ शकते याची काही उदाहरणेही पुस्तकात आहेत. ती वाचून लोकशाहीचा चौथा आधारस्तंभ म्हणजे काय ते कळते. (आज अशा खंबीर व निःपक्ष आधारस्तंभची गरज वाटते)
चांगुलपणाचा गैरफायदा घेणारे, साध्या माणसाला कसे फसवतात याचाही प्रत्यय लेखकाला आला आणि कळत नकळत झालेल्या चुकीचा पश्चात्तापही. एक साधं, प्रामाणिक आणि बरच काही शिकवणारं,नवी वाट तुडवू इच्छिणार्यांना मार्गदर्शक व प्रेरणादायी ठरणारं नक्कीच वाचावं असं पुस्तक... वाट तुडवताना...
प्रशांत सुसर
बुलडाणा
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know