Tuesday, June 15, 2021

द रेनमेकर

द रेनमेकर 
By ---जॉन ग्रिशम

मेहता पब्लिशिंग हाऊस 
अनुवादक --अनिल काळे 

   जॉन ग्रिशम यांच्या कादंबऱ्यांच वैशिष्ट्य म्हणजे.. कथानायक एक वकील...जो न्याय व्यवस्थेला जिवंत ठेवण्याच काम करतो...कधी मोठमोठ्या कंपन्यापासून, उद्योगलॉबीपासून, राजकारणी, माफियापासून तर कधी यांच्याशी हातमिळवणी करून सामान्य जनतेला न्यायापासून दूर ठेवणाऱ्या वकीलफ़र्म पासून... 

      यामध्ये.. हालाखीच्या परिस्थितीतुन.. नुकताच वकील झालेला, परंतु कोणत्याच वकीलफ़र्म मध्ये नोकरी न मिळालेला  रुडी बेलर.. त्याच्या हातामध्ये फक्त एकच केस... 
       एक बलाढ्य इन्शुरन्स कंपनी.. जी  आपल्या विमाधारक डॉट ब्लॅक या महिलेच्या आजारी मुलाचा 'मेडिकल इन्शुरन्स क्लेम ' नाकारते...  परिणामी त्या मुलाचा मृत्यू होतो... 
        डॉट ब्लॅक.. रुडी बेलर मार्फत... त्या कंपनीवर नुकसान भरपाईचा दावा करते... 
        यामध्ये... बलाढ्य इन्शुरन्स कंपन्या कशा नियमबाह्यपणे विमाधारकांचे क्लेम नाकारून गडगंज नफा कमावतात,  कदाचित कुणी कोर्टात गेल्यास त्याचबरोबर सेटलमेन्ट करतात,  यातूनही कोर्टात केस  उभी राहिल्यास...विम्यापेक्षा जास्त पैसा मोठमोठ्या वकील खर्च करतात परंतु क्लेम द्यायाच टाळतात... याच वास्तववादी चित्रण लेखक डोळ्यासमोर उभ करतो... 

         सर्व सत्य परिस्थिती माहित असूनही मोठमोठ्या वकीलफ़र्म पैशासाठी,  कायद्याच्या नावाखाली, कशी नैतिकता गुंडाळून ठेवतात...हेही लेखक कसलाही आडपडदा न ठेवता स्वछपणे मांडतो.. 

   त्याच बरोबर रुडी बेलरच समांतर आयुष्य, त्यातील चढउतार, स्वतःच्या इच्छा आकांशा याही गोष्टी छानपणे मांडल्या आहेत... तसंच यातील प्रत्येक व्यक्तीरेखेला योग्य न्याय दिल्याने त्याही मनात घर करून बसतात.. मग तो त्याचा मित्र बेकर, कोर्टकेस मध्ये जीव तोडून मदत करणारा डेक,  न्यायाधिश हार्वे हेल, किल्पर  असोत कि विरोधी वकील ड्रमंड असो... कि प्रेयसी केली रिकर.... 

   खरंतर,  इन्शुरन्स, कायदे, कोर्ट केसेस म्हणजे अगदी रटाळवाने विषय... परंतु जॉन ग्रिशम इतक्या रोमांचक पद्धतीने मांडतात की पुस्तक हातातून अर्धवट बाजूला ठेवणं जीवावर येत... इतक हे उत्कंठावर्धक  आहे.. 

तर तर... 
रुडी बेलर चमत्कार करून, 'इन्स्टंट रेनमेकर ' म्हणजे तो  ही केस जिंकणार का आणि कशी? 

त्यासाठी तुम्हाला हे पुस्तकं वाचावं लागणार... 

--#संदीपबडे#--

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know