WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Tuesday, June 8, 2021

गावकुसातिल जितराब

पुस्तक परीचय:- 
पुस्तकाचे नाव:- गावकुसातिल जितराब
लेखकाचे नाव:- भरत आंधळे  (I.R.S)
प्रकाशन:- श्री शिवसमर्थ सेवा प्रकाशन,नाशिक
पृष्ठ:- १०७
किंमत:- 100 (सर्वत्र ऊपलब्ध)

लेखकाने स्वतःहून अनुभवलेली जवळुन बघितलेली सर्व लहान,मोठ्या माणसांच वर्णन या पुस्तकाच्या माध्यमातून केलेल आहे.
खेड्यातील अठरापगड जातीची ही माणसं, त्यांच जीवन, त्यांच जगण, त्यांचे स्वभाव आणी सामाजीक एकोपा याच्यातुनच भावी पिडीला शिक्षण मिळत होत/मिळत असत.
"1990" ला झालेल्या जागतिकीकरणाने बलुतेदार पद्धतीने चालणारे गाव देवाण-घेवाण करू लागले.
यामुळे 
यामुळे गावातिल परंपरा बदलत चालली होती.
लेखकाला कर्डिले सरांनी दिलेली शिकवण.
चंदु फरारी हे स्वतःहा लेखकाचे वडीलच होत.
ठाकराच्या महादुच छोटस जग व साधारण जगण लेखक सांगतात.
नाम्या जापानी हा अट्टल दारूडा.
तो दारूसाठी काय करत होता ते लेखकाने सांगितल आहे.
यमुनाबाई ही गावातील सगळ्या कामात सर्वाच्या पुढ आसायची ति स्वतःहाच्या हिमतीवर आपल जीवन कस जगली ही लेखक सांगतात.तिने गावातील भरपुर दारूड्यांची दारू बंद केली होती.
ढोर मेहनत काय आसते हे पुंजा बाबाला बघुन समजत.
पुजा बाबा हा वडार समाजाचा.
लग्नसराईत सनई वाजवन हा त्याचा व्यवसाय.
त्याचे सर्वाना आदराणे बोलण वागण लेखकाने मांडल आहे.
सदा बामण ही व्यक्ती लेखकाच्या कायम ध्यानात राहणारी.
बाबा गुरव हा गावातीव श्रीमंत व्यक्तींपैकी एक. किराणा दुकानदार तो गावात माल घेऊन तालुक्याला नेऊन विकायचा. कालांतराने बाबा गुरवावर व्यसनाधीन होऊन खुप वाईट वेळ आली होती.
कुंभाराची जिजा ही आठवनीत राहणारी व्यक्ती.
दवंडीवाल्या गणपतची हालगी, सुरेश नानाच श्रीमंतीत पैशाची ऊधळपट्टी करून गरीब  आणि गरीबीतुन परत वर येण.
बाहेरगावाहून येऊन दुसर्‍या गावात कस ठाण मांडाव हे चमु वाण्याकडुन शिकाव.
मटक्यावाल्याची हौसा ही बघुदा लेखकाची आई असावी हे त्यांच्या लिखाणावरून दिसुन येत.
बायकांच्या अंगात आलेल विवीध देवदेवता, खंडोबा, म्हसोबा, देवी, मरी आई भुत ऊतरवणे हा दादा भगत यांचा व्यवसाय होता.
कालांतराने त्यांनी हा व्यवसाय बंद केला व ते शहरात रहायला गेले.
तुकाराम पाटील यांच्या सारखे समाजसेवक प्रत्येक गावात असायला हवेत.
भास्कर बाबा यांची कष्टाळू वृत्ती व शिस्तप्रिय,कडक स्वभाव ध्यानात राहण्याजोगे आहे.
कर्नल सुतार (मच्छिंद्र सिरसाट) हा लेखकाचा गरीब पन कष्टाळु मित्र.
पुढ तो स्वतःच्या मेहनतिने भारतीय सैन्यात लेफ्टनंट म्हणुन रूजु झाला.
पावतीवाला तातु (पोस्टमन), तमाशावाला मधु चर्हाटे, गारेगारवाला नार्या गोसावी आणी अशे बरेचजण लेखकाने प्रत्येकाच्या छान वर्णन केलेल आहे.
प्रत्येकाच्या जिवनात आजुबाजुला अशी जितराब आसतातच हे मात्र खर.
प्रत्येकाने आवश्य वाचन कराव अस पुस्तक आहे.
👍🙏🙏📚📚📖📒📗📘
Namdev Gutte

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know