Tuesday, June 8, 2021

पुस्तकाचे नाव:- एक एकर

पुस्तक परीचय:- 
पुस्तकाचे नाव:- एक एकर 
कथासंग्रह)

लेखक:- व्यंकटेश माडगूळकर 
जन्म:- 5 एप्रिल, 1927
मृत्यु:- 28 आॅगस्ट, 2001

प्रकाशन:- मेहता पब्लिशिंग हाऊस,पुणे

पृष्ठ:- 66

किंमत:- 80 (सर्वत्र ऊपलब्ध)

व्यंकटेश माडगूळकर  यांच लिखाण ग्रामिण भागावर जास्त प्रमाणात आढळून येत कारण त्यांचे बालपण  ग्रामीण भागातच गेलेल आहे.
या पुस्तकामध्ये त्यांनी 7 वेगवेगळ्या कथा मांडल्या आहेत.
या मध्ये त्यांनी स्वत:हा अनुभवलेले प्रसंग मांडले आहेत.
*1) एक एकर:- लेखकाने पहील्या कथेत स्वतःहाच्या फार्महाऊस व परस बागेबद्दल माहिती दिली आहे.
*2) वनविध्या :-दुसर्‍या कथेत जंगलातील वेगवेगळ्या प्राण्यांबद्दल माहीती सांगितली आहे.
*3) रानातली रेखाटन:- तिसर्‍या कथेत ते स्वतःहाच्या जंगल सफरीत काढलेल्या रेखाटनांबद्दल(चित्रांबद्दल) माहीती दिली देतात.
*4) अन्नासाठी दाही दिशा:- चौथ्या कथेत जंगलातील म्हणा किंवा सर्वच पशू-पक्ष्यांची जगण्यासाठीची/अन्नासाठीची कशी धडपड चालु असते हे सांगतात.
*5) शंभर वर्ष वयाच मासिक :- पाचव्या कथेत त्यांनी "1888" सालच्या निघालेले "NATIONAL GEOGRAPHY" या मासीकाचा पहीला अंकाबद्दल माहीती दिलेली आहे.
*6) गोष्ट मैत्रीची आणि वैराची:- सहाव्या कथेत मैत्रीतुन मुंगुस आणि साप यांच वैर कस सुरू झाल याच्याबद्दल लिहीतात.
*7) अतिथी अभ्यागत:- सातव्या कथेत त्यांनी स्वतःहाच्या  घरात मुंग्या,चिमण्या,कोळी,वटवाघुळ यांनी घर कशी बनवली याची माहिती दिली आहे.
ते  कश्या प्रकारे लेखकाचे अतिथी झाले त्याबद्दल छान माहीती दिलेली आहे.
व्यंकटेश माडगूळकर यांची सर्वच पुस्तक वाचायला छान आहेत. 
🙏🙏📒📖📚📓📔
Namdev Gutte

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know