सर्वात कठीण काम सर्वात आधी करा.
आपल्याकडे कामांची लांबलचक यादी नेहमीच तयार असते. त्यातील सगळ्याच गोष्टी पार पाडण्यासाठी आवश्यक तो वेळ आपल्यापाशी कधीच उपलब्ध नसतो. अर्थातच पुढेहि तो कधीच नसेल.
त्यामुळे आपण कामाची सुरुवात करायला नेहमीच चालढकल/दिरंगाई (Procrastination) करतो. उद्यापासून नक्की करूया , पुढच्या वेळी नक्की करूया असे स्वतःला सांगून आपण काम टाळतो.
या पुस्तकात ही चालढकल/दिरंगाई टाळून आपण सर्वात महत्वाची आणि अवघड काम हातावेगळी कशी करायची ...आज आत्ता ताबडतोब! यावर चर्चा केली आहे .
हे पुस्तक विद्यार्थी, गृहिनी, नोकरदार आणि व्यवसाय करणाऱ्या प्रत्येकालाच खूप मार्गदर्शक आहे.
आपल्या समोर असलेल्या आव्हानात्मक कामांसाठी फ्रॉग (बेडूक) हे रूपक वापरले आहे.
दोन नियम
पहिला नियम - तुमच्या पुढ्यात दोन महत्त्वाची काम असतील तर त्यापैकी अधिक आव्हानात्मक आणि किचकट असणार काम सर्वप्रथम पूर्ण करून टाका.
दुसरा नियम- महत्वाच काम एकदा निश्चित झाल्यावर जराही वेळ न घालवता ते काम हातावेगळ करण्याचा दिनक्रम अंगी बाणवा.
आपल्याला नक्की काय हवं आहे ते ठरवा.
मनातले विचार कागदावर लिहा.
उद्दिष्ट पूर्तीची कालमर्यादा Deadline ठरवा.
ध्येय प्राप्तीसाठी आवश्यक प्रत्येक गोष्टीची यादी बनवा
यादीच रूपांतर योजनेत करा.
योजनेनुसार तात्काळ कृती करा.
ध्येयाच्या दिशेनं घेऊन जाईल असा काही तरी दररोज करा.
प्रत्येक क्षणाला आपल्यासमोर कोणते महत्वाचे आव्हानात्मक काम आहे ते पूर्ण करा.
कामच पूर्वनियोजन करण्याबद्दलचा १०/९० चा नियम - कामच पूर्वनियोजन करण्यासाठी तुम्ही दिलेला १० टक्के वेळ हा काम सुरू झाल्यानंतर ते यशस्वीपणे पार पाडण्यासाठी लागणारा ९० टक्के वेळ वाचवणारा ठरतो.
तंत्रज्ञानाच्या आहारी जाऊ नका.
Pacific investment management company या अमेरिकेतील बलाढ्य गुंतवणूक कंपनी मध्ये प्रमुख असलेला आणि मुदत ठेवी , रोखे यांच्या स्वरूपातील ६०० अब्ज डॉलरची गुंतवणूक सांभाळणारा बिल ग्रॉस नियमितपणे व्यायाम आणि ध्यान धारणा करण्यासाठी प्रसिद्ध आहे.
तंत्रज्ञानाचा वापर करतानाही डोकं आणि मन स्थिर ठेवण्यासाठी तो हे करतो आणि ध्यानधारणा करताना स्वताजवळील सगळी इलेक्ट्रॉनिक यंत्र मोबाईल फोन पूर्ण बंद करून सुद्धा त्याचा एकही महत्त्वाचा निरोप किंवा काम चुकत नाही.
स्वतःला शांत , स्वस्थचित्त राखायचे असेल आणि सर्वोत्तम क्षमतेने कामगिरी करायची असेल तर नियमितपणे ठराविक वेळेसाठी तंत्रज्ञानापासून दूर जाण्याची सवय लावून घ्यायला हवी.
तंत्रज्ञान एक जबरदस्त सेवक
तंत्रज्ञानाचा सुयोग्य वापर करायला शिका.
हातातल्या कामाशी संबंधित नसलेला प्रत्येक प्रोग्राम सरळ बंद करून टाका. तुमचं लक्ष विचलित करणाऱ्या वेबसाइट ब्लॉक करून टाका.
तुमचं काम पूर्ण होण्याच्या दृष्टीने आवश्यक असलेली संवाद आणि संपर्क साधनच फक्त सुरू असतील याची दक्षता घ्या.
वाट बघत थांबू नका योग्य वेळ कधीच येत नसते. जिथे आहात तिथ आणि जी साधन हातात आहेत ती घेऊन कामाला सुरुवात करा. जसजस पुढे जाल, अधिक चांगली साधन आपोआप मिळत जातील. -नेपोलियन हिल
हरघडी, प्रत्येक मिनिटाला आपल्या पुढ्यातील सर्वात महत्त्वाचं काय आहे ते ठरवा आणि सगळ्यात पहिले ते काम पूर्ण करा. इट दॅट फ्रॉग!
Ref Vijaykumar choughule
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know