WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Tuesday, June 8, 2021

#सबबी_सांगणे_सोडा....स्वयंशिस्तीची जादू भाग 3

#सबबी_सांगणे_सोडा....स्वयंशिस्तीची जादू
(No Excuse ! The Power of Self Disipline )

                            लेखक - ब्रायन ट्रेसी
                    अनुवाद - शोभन शिकणीस
                  प्रकाशक - मंजुळ पब्लिकेशन

लेखमाला - भाग तिसरा

स्वयंशिस्तीने वैयक्तिक सुधारणा

1️⃣ यशप्राप्ती
जगातील 20% लोकांकडे 80% संपत्ती आहे आणि 80% लोकांकडे फक्त 20% संपत्ती आहे याचे कारण बहुतांश लोकांकडे ज्ञान, कौशल्य ,यश मिळवण्यासाठी लागणारे कठोर परिश्रम घेत नाही त्यामुळे स्वतःला शिस्त लावा
1. आपल्याला काय पाहिजे ते ठरवा
2.जे हवयं ते मिळवण्यासाठी इच्छाशक्ती बाळगा
3.यशासाठी त्याग,पूर्ण सर्मपणाची तयारी ठेवा
4.पुस्तक, चर्चासत्रे, ध्वनीफीत, व्हिडीओ, वेबिनार, सेमिनार हया सार्या माध्यमांचा वापर करून आपल्या क्षेत्रातील ज्ञान, विज्ञान, तंत्रज्ञान, नवनवे शोध जाणून ते तंत्र योग्य सल्ला वापरून आत्मसात करा.
5.कौशल्याचे आजीवन विद्यार्थी व्हा

2️⃣ चारित्र्य
आपले चरित्र्य म्हणजे आपण आयुष्यात केलेल्या निवडी आणि घेतलेले निर्णय यांची गोळाबेरीज असते
चरित्र्य म्हणजे धैर्य, उदारता, माणुसकी, संयम,सातत्य, सोहार्दता,सचोटी आणि योग्य कृती करण्याची इच्छाशक्ती
चरित्र्य म्हणजे मोह,सोप्याची आवड ,आणि गोष्टी फक्त उरकून टाकण्याची प्रवृत्ती हयाविरूद्ध तटबंदी आणि ती तटबंदी बांधली जाते स्वयंशिस्तीने...

चांगले चरित्र्याची व्यक्ती होण्यासाठी
1.आपले चरित्र्य जगाला आदर्श वाटावे असे आहे का हा प्रश्न स्वतःला विचारा
2. भूतकाळाचे सिंहावलोकन करून आपण आपल्या मूल्यांशी तडजोड करून स्वतःचे काय नुकसान केलय ते जाणून घ्या
आणि त्या चूका भविष्यात सुधारा. 
3. ज्याचे तुम्ही प्रशंसक आहात अशा व्यक्तींचे चांगले गुण आत्मसात करा
4.गैरसोयीचे असले तरी खरे बोला
आणि विश्वासार्ह वागा.
5.आपल्या वर्तनाचे परिणाम जाणूनच कृती करा

3️⃣ जबाबदारी
आपले आनंद, आरोग्य, यश हयासाठी आपण स्वतः च जबाबदार आहोत 
1.आपल्या जबाबदारीची जाणीव ठेवून आजपर्यंत जे झालयं त्यासाठी कुणालाही दोष देणं बंद करा
कारण जबाबदार्या ढकलून माणसात फक्त विकृती निर्माण होते, माणूस असमाधानी होतो, इतरांना अपराधी समजून आपण द्वेषाच्या आगीत जळत राहतो. स्वतःच्या चरित्र्याचे अवमूल्यन करतो, त्याचा निश्चय कमकुवत होतो आणि तो माणुसकी विसरतो.
2.स्वतःला कमी,अपात्र ,अपूर्ण, निकृष्ट समजू नका
स्वयंशिस्तीने स्वतःमध्ये सुधारणा करण्यासाठी पुढाकार घ्या 
3.विधायक सकारात्मक विचारांची निवड करा आणि नकारात्मक भावना बदला किंवा रद्द करा. स्वतःच्या जबाबदारया स्वीकारून सामर्थ्यवान बना.
4.भूतकाळातील एखादा प्रसंग आपल्याला अजून त्रास देत असतील तर तो प्रसंग घडायला आपण कसे जबाबदार आहोत ते शोधा.
5.दुखःद नातेसंबंधासाठी पण आपण असेच  जबाबदार आहोत त्यामुळे कुणावर राग न धरता स्वतःला आणि इतरांना पूर्णपणे क्षमा करा.
6.भूतकाळाच्या सावलीने भविष्यकाळ झाकोळून जाऊ नये याची पूरेपूर काळजी घ्या आणि त्यासाठी आपले विचार, भावना ,कृती यावर आपले नियंत्रण ठेवा
ज्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत त्या लगेचच करण्याचा निश्चय करा.

संदर्भ निलेश शिंदे 
अपूर्ण

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know