WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Monday, June 7, 2021

द इंटेलिजंट इन्व्हेस्टर भाग 2

द इंटेलिजंट इन्व्हेस्टर
लेखक - बेंजामिन ग्रँहम
अनुवाद - अतुल कहाते

भाग 2

म्युच्युअल फंड
सामान्य गुतवणूकदारांना शेअर बाजार, बाँड यातील माहितीच्या अभावातून पैसे गमावू नये म्हणून सुरक्षित आणि किंचित जोखमीचा पर्याय
Stock Fund , Bond Fund हे शेअर्स आणि बाँड मध्ये आपले पैसे गुंतवतात
Balanced Fund - 1/3 bond +2/3 Equity अशी गुंतवणूक करतात
ETF चा पर्याय विखुरलेल्या गुंतवणुकीसाठी उपलब्ध आहे
यात दिवसाच्या NAV नुसार गुंतवणूक खरेदी विक्री चालते तसेच मिळालेल्या उत्पन्नातून खर्च वजा करून डिव्हिडंड / वाढीव रक्कम गुंतवणूकदाराला देतात

म्युच्युअल फंडाला काही करांच्या आणि कायदेविषयक अडचणींमुळे गुंतवणूक मर्यादा असतात त्यामुळे सरस कामगिरी ची प्रत्येक वेळी अपेक्षा पूर्ण होत नाही
त्यामुळे प्रत्येक योजनेची रेटींग, आकार,व्यवस्थापन, इतर खर्च हया बाबींचा विचार करूनच गुंतवणूक करावी
योग्य वेळी खरेदी विक्री केली तर म्युच्युअल फंडातून उत्तम परतावा मिळतो

गुंतवणूक सल्लागार
शेअरबाजारात गुंतवणूक करताना दलालाला, नातेवाईकाला, मित्राला ,
इन्व्हेस्टमेंट बँकर, बँक अधिकारी यांना
कधीच तुमचा सल्लागार बनवू नका.
त्याच्याकडून टीप्स घ्या, माहिती घ्या पण  गुंतवणूक करताना मात्र योग्य प्रशिक्षित अनुभवी,मान्यताप्राप्त सल्लागार हवा
आपल्या गरजा,ध्येय, निकड त्यांना समजवावी आणि त्यांच्या विश्लेषणात्मक सल्ल्यानुसार आणि स्वतःच्या बुद्धीनुसार योग्य गुंतवणूक करावी

आर्थिक विश्लेषक
शेअर्स बाँडची सुरक्षितता, गुंतवणूक करण्यायोग्य शेअर्स चे मूल्य आकलन 
तसेच भविष्यातील परतावा यांचे आडाखे
 ते बांधतात ,ग्राहक योग्य प्रश्न विचारून रास्त उपयुक्त माहिती यांच्याकडून मिळवू शकतात

शेअर्स ची गुंतवणूक योग्य किंमत ठरवण्यासाठी फाँर्म्युला
V= EPSx (8.5+2G)x 8.5/Y

EPS - प्रतिशेअर नफा
G - Future  Growth (7-10 year)
Y- intrest rate of AAA corporate Bond

कंपनीचे दीर्घकालीन भविष्य, व्यवस्थापन, आर्थिक ताकद , Cash Flow, Dividend History या सार्यांचा विचार करता गूंतवणूक योग्य मूल्य ठरवले जाते
हे अचूक तंत्र नसले तरीही नुकसान टाळणारे मात्र आहे.

गुंतवणूक विश्लेषण
गेल्या पाच वर्षाचे कंपनीचे आर्थिक अहवाल तपासल्यावर नफा,
कर्ज (दीर्घकालीन, अल्पकालीन )आणि त्यावरील व्याज किती?
छुपे खर्च ,Cash Flow, Expenditure
यांचे आकडे तपासावेत ,
तळटीपांमध्ये लिहिलेले खर्च कोणते ?
आपातकालीन निधी किती ? 
तसेच कंपनीचे MOAT, USP, Sector Monopoly ,नवे तंत्रज्ञान, संशोधन खर्च
जाणून घ्यावी.
नफ्याचे व्यवसायात पुनर्गुंतवणुकीकरण होते का?
शेअर Buyback , Split होतात का ???

कंपनी व्यवस्थापन हा सुद्धा विश्लेषणाचा कळीचा मुद्दा आहे. कंपनी चालवणारे कंपनीच्या हितासाठी गंभीर आहेत का
कंपनीची आर्थिक परिस्थिती खुलेपणाने मांडतात की माहिती दडवली जाते.
सर्वांना योग्य पगार दिले जातात का?
कर्मचाऱ्यांना स्वस्तात शेअर/ Stock Option दिले जातात का?
सतत Events आणि मिडीयावर बातम्यांमध्ये कंपनीचे नाव झळकलेले असते का?

तुलनात्मक अभ्यासातून आलेले 8 निकष
1.कंपनीचे पुरेसे आकारमान
2.मजबूत किंवा चांगली आर्थिक स्थिती
3.गेली 20 वर्षे सातत्याने डिव्हिडंड वाटप
4.गेल्या दहा वर्षांत तोटा नाही
5.गेल्या दहा वर्षात EPS मध्ये 1/3 वाढ
6.सध्याची शेअरची किंमत प्रतीशेअर मालमत्तेपेक्षा 1.5 पट जास्त नसणे
7.मध्यम P/E Ratio 
गेल्या तीन वर्षाच्या नफ्याच्या मानाने  P/E रेशो 15 पेक्षा जास्त नसणे
तसेच P/E x P/B = 22.5 पेक्षा जास्त नसावा
8. अल्पकालीन मालमत्ता ही अल्पकालीन कर्जाच्या दुप्पट असावी
आणि दीर्घ मुदतीच्या कर्जाचा आकडा  अल्पकालीन मालमत्तेपेक्षा कमी असावा
9.एकूण कर्ज अल्पकालीन मालमत्तेच्या 110% पेक्षा कमी असावे
ROCE जर 6-7 असेल तर गुंतवणूक आकर्षक आणि 10 असेल तर लाभदायी ठरते
10.मार्गिन आँफ सेफ्टी - शेअरच्या गुंतवणूक योग्य मूल्याच्या 60% जर शेअर्स चा सध्याचा बाजारभाव असेल उत्तम

कोणत्या शेअर्स मध्ये गुंतवणूक करु नये

1.कंपनीचे फायनान्शियल स्टेटमेंट जाणूनबुजून क्लिष्ट बनवले असेल 
2.वारंवार अचानक उद्भवलेले खर्च होत असतील ,
3.Stock option warrent द्वारे
एकूण शेअर्सपैकी 3% शेअर्स कर्मचाऱ्यांना दिले असतील
4.वारंवार अधिकारी बदलत असतील किंवा सोडून जात असतील
5.कंपनी विस्तारासाठी घेतलेल्याकर्जाचे प्रमाण जास्त झाले तर
6.एखादी कंपनी तिच्याहून मोठ्या कंपनीला विकत घेण्याचा प्रयत्न करत असेल तर
7.योग्य डिव्हिडंड गुंतवणूक दारांना वाटून उर्वरित नफा  त्याच व्यवसायात कंपनी गुंतवत नसेल किंवा भांडवल नियोजन योग्य नसेल तर
संदर्भ निलेश शिंदे 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know