WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Tuesday, June 15, 2021

* समिधा * ------- साधना आमटे

*  समिधा *
  ------- साधना आमटे

बाबा आमटे यांच्या लोकविलक्षण जीवनाला साथ देत असताना साधनाबाईंनी अपार  कष्ट केले, अग्निदिव्ये म्हणावीत अशा प्रसंगांतून आमटे निर्भयपणे वाटचाल केली आणि हे सारे सहजतेने व आनंदाने सोसताना त्यांनी स्वतःच्या स्वतंत्र व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्यही टिकविले. बाबा आमटे यांचे कार्य किती महान आहे याचे अधिक वर्णन करण्याची आवश्यकता नाही. पण त्याचबरोबर त्यांच्या स्वभावात अद्वितीय सहानुभूती आणि जबरदस्त तापटपणा, असामान्य सहृदयता आणि तत्त्वांचा आग्रह धरताना पत्नीच्या होरपळीकडे त्यांनी काही वेळा केलेली डोळेझाक अशी एक विलक्षण विसंगती आहे. बाबांच्या वादळी जीवनात त्यांना साधनाताईंनी जी आयुष्यभर साथ दिली तिची अद्भुतरम्य कहाणी असे या आत्मकथेचे स्वरूप आहे.

आत्मकथेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे साधनाताईंनी कोठेही तात्त्विक विवेचन केलेले नाही. परंतु त्या ज्या रीतीने जगल्या ते वाचताना म. गांधी आणि आचार्य विनोबा भावे यांची शिकवण त्यांना सतत मार्गदर्शक होत होती याचा प्रत्यय वाचकाला येतो. उदात्त विचारांच्या या अंतःप्रवाहामुळे ही केवळ अनुभवांची गाथा न राहता तिला व्यापक अधिष्ठान प्राप्त होते.

त्यांच्या आठवणी मांडताना त्या म्हणतात----

हिमालयाची सावली

नागपुरातील जुन्या वेदशास्त्रसंपन्न घराण्यातील सोवळे वळण असलेली एक तरुण व सुंदर मुलगी एके दिवशी दाढीजटा, कफनी व दंडधारी अशा व्रतस्थ तापसाला पाहते, दृष्टादृष्टीच्या त्या एका क्षणात त्याचा आजन्म ब्रह्मचर्य पाळण्याचा निर्धार गळून पडतो व तिच्या मनावरील परंपरेची सर्व बंधनेही निखळून पडतात. तसे त्या दोघांमध्ये बऱ्याच बाबतींत अंतर असते. पण वयाचे, रंगरूपाचे, स्वभावाचे व जीवनदृष्टीचेही अंतर परिवर्तनाच्या त्या एका क्षणाने दोघांच्याही नकळत कसे भरून निघाले, ते दोघांनाही कळले नाही. सौंदय हे स्त्रीचे सामर्थ्य, तर सामर्थ्य हे पुरुषाचे सौंदर्य मानले जाते. दोघेही एकमेकांच्या अशा सौंदर्यावर लुब्ध होतात. यातील नायिका असामान्य रूपवती, तर नायक लोकोत्तर कर्तृत्वाचा. त्याने तिच्याजवळील मानसिक लावण्य तिच्या आचारगौरवावरून हेरले होते; तर त्याच्या वृत्तीची काव्यात्मता, भव्य स्वप्ने पाहण्याचे वेड, व ती कार्यान्वित करण्याचा आत्मविश्वास तिला आवडला होता. गांधीजी व रवीन्द्रनाथ यांचे त्याच्या व्यक्तित्वावरील संस्कार व विदेशी अभिनेत्रींशी पत्रव्यवहारातून सूचित होणारी रसिकता, त्याच्या आंतरिक सौंदर्यावर प्रकाश टाकत होती. पैकी त्याच्या साहसप्रियतेची व निर्भय विक्रमशीलतेची ओळख एका प्राणघातक आपत्तीच्या निमित्ताने तिला लग्नापूर्वीच पटली होती व आपला निर्णय अचूक असल्याचा दिलासाही मिळाला होता.

इंदू घुले व मुरली आमटे यांच्या वादळी पण उन्मादक सहजीवनाची कहाणी-- 

त्या वादळातल्या स्मृतिच्या हिंदोळ्यावरील समिधा त्या अक्षरं रूपाने मांडतात.
हे पुस्तकं म्हणजे
मराठी साहित्यातील " स्त्री आत्मचरित्रा " तील हा एक मैलाचा दगड होय.

                                 .......ममता मुनगीलवार

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know