WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Tuesday, June 15, 2021

स्वामी.....📖

स्वामी.....📖 🚩📖

रणजित देसाई ह्यांची लोकमान्यता पावलेली ऐतिहासिक कादंबरी. ह्या कादंबरीला रणजित देसाईंची "मानसकन्या" म्हटलं तर वावग ठरणार नाही. लिखाणाच्या क्षेत्रात देसाईंना स्वतःच अस्तित्व निर्माण करून देणारी ही  "साहित्य अकादमी पुरस्कार" प्राप्त कादंबरी...!!!

"पेशवे" हे नाव ऐकल्यावर अपल्याला फक्त श्रीमंत बाजीराव पेशवे व्यतिरिक्त अन्य कोणी पेशवे फार कमी माहिती आहेत . अशाच एका इतिहासाला विसर पडलेल्या योध्याची कथा. पानिपतच्या लढाई नंतर अवघे १६ वर्षाचे असताना पेशवाईची जबाबदारी अंगी येऊन पडलेल्या माधवराव पेशव्यानी स्वतःचा गृहकलह सोडवत मराठी दौलतीची जी जपवणूक केलीये ती वाचताना विस्मयकारक वाटते...

आपल्या अल्प आयुष्यात त्यांनी मराठी सत्तेचा दरारा पुन्हा एकदा बसवला. अशा माधवराव पेशव्यांचे राजकीय आणि वैयक्तिक जीवन खूप जवळून पाहायला मिळत ते ह्या कादंबरीतून...

ऐतिहासिक कादंबरी एवढ्या सोप्या पण प्रभावी शब्दांत मांडणे ही कला रणजित देसाईंकडेच आहे. प्रत्येक पात्र मग ते रमाबाई असो किंवा राघोबादादा किंवा गोपिकाबाई, खूप सुंदर रेखाटलंय. आयुष्याच्या शेवटी रमा-माधव ह्यांच्यात होणारी संभाषणे तर जीवाला वेगळाच चटका लावून जातात...

सती जाण्याइतपत रमेच प्रेम, तिला तिच्या आयुष्यात काही देऊ न शकल्याची माधवरावांची खंत, जीवघेण्या आजारातूनही कर्नाटकच्या मोहिमेवर जाण्याची माधवरावांची जिद्द आणि शेवट पर्यंत मराठी दौलतीचा सांभाळ करण्याबद्दलचा त्यांचा विचार हे सारं मांडताना लेखकाची मेहनत पदोपदी दिसून येते...

रमेला हरिहरेश्वरला पाठवताना, सागराचं वर्णन लेखकाने जे सुरेख रंगवलं आहे त्याला तोडच नाही...

शेवटी मात्र, मृत्यूची चाहूल लागल्यावरचे माधवरावांचे बोलणे, हे वाचताना देसाईंच्या लेखणीठायी असलेल्या अलौकिक प्रतिभेचे दर्शन होते...

वाचकाला खिळवून ठेवणारी ही रणजित देसाईंची अप्रतिम कलाकृती नक्की वाचा....!!!

#स्वामी 📖

#रणजितदेसाई  🙏

~ हितेश...✒️😊❤️

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know