Tuesday, June 15, 2021

बोर्डरुम

*बोर्डरुम*
आज पुन्हा एक पुस्तक वाचून संपवले अप्रतिम लेखन, माहिती आणि तीही आपल्या मातृभाषेतून मराठीतून. अच्युत गोडबोले अतुल कहाते यांच आणखीन एक अप्रतिम पुस्तक. मॅनेजमेंट हा विषय किंवा हा शब्द आपण बऱ्याच ठिकाणी ऐकतो. परंतु ही मॅनेजमेंट मोठमोठ्या कंपन्यांची चालते कशी याची माहिती देण्याचा प्रयत्न या पुस्तकांमध्ये केला गेला आहे. परदेशातील शक्यतो अमेरिकेतील कंपन्या त्याच्या अवतीभवती की माहिती फिरते कारण त्यांच्याकडे औद्योगिक क्रांती फार मोठ्या प्रमाणावरती फार लवकर झालेले आहे. वेगळ्या मॅनेजमेंट गुरूंनी लिहिलेल्या पुस्तकांचा देखील यामध्ये उल्लेख आहे व त्यांनी काय तत्व लिहिली होती व त्याचा कसा फायदा तोटा झाला हे देखील त्यामध्ये बऱ्याच मोठ्या प्रमाणावरती कळते.  
खरंतर आजकाल बरेच निराशेचे वातावरण आहे. परंतु पूर्वीदेखील असं वातावरण किंवा अशी वेळ येऊन गेलेली आहे. बर्याच व्यक्ती या नैराश्याच्या अंधारातही न हरता वाटचाल करत राहील्या, राखेतून पुन्हा फिनिक्स पक्ष्यासारख्या उभ्या राहील्या याची अनेक उदाहरणे येथे या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतात.
फोर्ड, मॅकडोनाल्ड, बोईंग, जिलेट, केलॉग, गुडइयर टायर, कोकाकोला, पेप्सी, गुगल, मायक्रोसॉफ्ट, ॲमेझॉन, सिंगर, वॉर्नर ब्रदर्स, सोनी, कोड्याक, वॉल्ट डिस्ने या आणि यासारख्या बऱ्याच कंपन्यांची नावं आपण ऐकलेली आहेत परंतु त्या तयार कशा झाल्या त्यासाठी काय कष्ट घेतली गेली. एखादी कंपनी तयार होत असताना त्याच्या निर्मात्याने काय विचार केला किंवा एखादा प्रॉडक्ट बनवत असताना त्याची आयडिया त्या निर्मात्याला कशी सुचली हे वाचण्याजोगे आहे. एखादी कंपनी बुडत असताना त्याने त्यांचे निर्णय कसे बदलले व त्या कंपन्या कशा प्रगतीपथावर गेल्या हे वाचण्याजोगे आहे. यातून आपल्यामध्ये देखील व्यवसाय करणे, व्यवसाय मध्ये कसे निर्णय घ्यावेत, निर्णय चुकले तरी घाबरून न जाता पुन्हा कसे उभे रहावे. याचे बऱ्याच प्रकारे आपल्याला मार्गदर्शन होऊ शकते. 
ज्यांना मॅनेजमेंट मध्ये जायचं आहे जॉब करायचा आहे आणि मुख्यत्वेकरून ज्यांना व्यवसाय मध्ये यशस्वी व्हायच आहे अशा सर्वांनी हे पुस्तक आवर्जून वाचावे.
*शिवराज आरती विश्वासराव जुवेकर*.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know