पुस्तकाचे नाव :- राजमाता जिजाऊसाहेब
लेखक :- डॅा. सुवर्णा नाईक निंबाळकर
प्रकाशन :- संस्कृती प्रकाशन
किंमत :- ३२५/-
पृष्ठे :- २७२
स्वराज्यसंकल्पक राजमाता जिजाऊसाहेब आहेत हे आपल्याला फार उशीरा समजले. स्वराज्य निर्मितीचे शहाजीराजांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी जिजाऊ बालशिवबाला घेऊन पुण्यात आल्या. त्या वीरकन्या, वीरपत्नी, वीरमाता झाल्या पण यामागे त्यांचे कष्ट व कर्तृत्वाचा परिचय आपल्याला अगदी अलीकडच्या काळात थोडाफार होऊ लागला. अगदी त्यांचे चित्रसुध्दा उपलब्ध नव्हते. सुमारे ३०/४० वर्षांपूर्वी त्यांच्यावर काही लेखक लिहिते झाले. त्यांच्यावर चित्रपटही निघाला. परंतु त्यांचे संशोधनपर लेखन डॅा. सुवर्णा निंबाळकर यांनी या पुस्तकात केले आहे.
हे चरित्र म्हणजे समस्त मराठेशाहीची स्वराज्याची वाटचाल आहे. जिजाऊसाहेब सक्षम, संयमी, कर्तबगार पण विनम्र, कोमल मनाच्या शत्रूच्या कर्दनकाळ ठरणाऱ्या होत्या.
स्वराज्याचे दोन छत्रपती घडवणाऱ्या त्या राष्ट्रमाता होत्या. राजांसमवेत सर्व राज्यकारभारात त्या सल्ला मसलत करत असत.
यात एकूण २९ प्रकरणे आहेत. जिजाऊंचे लहानपण, भोसल्यांचा उदय व कारकीर्द, शहाजीराजांचा उदय, विवाह, जाधव-भोसले वैर, लखुजीराजांचा वध, शहाजीराजांचे कर्तृत्व, शहाजीराजे व जिजाऊ सहजीवन, शिवरायांचा जन्म, शिवरायांचा विवाह, बालशिवाजीसह कर्नाटकात, स्वराज्य उभारणी, शहाजीराजांची कैद व सुटका, अफजलखानाची फजिती, पन्हाळ्याचा वेढा, शहाजीराजांची महाराष्ट्र भेट, शाहिस्तेखानाला शिक्षा, सुरतेची लूट, पुरंदरचा तह, आग्रातून सुटका, जिजाऊंची सुवर्णतुला, कोंढाण्याचे लगीन, राज्याभिषेक इ. इतिहासातील महत्वपूर्ण विषयाचे संशोधनपर लेखन सुवर्णा निंबाळकर यांनी केले आहे.
डॅा. सुवर्णा निंबाळकर यांनी भोसले घराण्यातील राजमाता जिजाऊसाहेब, महाराणी सईबाई, महाराणी येसूबाई व महाराणी ताराराणी अशा चार कर्तृत्ववान महिलांवर संशोधनपर चरित्रपर लेखन केले आहे. आपण ते जरूर वाचायलाच हवे..!!!
आपल्या संग्रही हवीतच ही ऐतिहासिक चरित्र..!!
*विशेष टीप :- शिवस्पर्श प्रकाशनाची आणि डॅा.आ.ह. साळुंखे व प्रा. मा.म.देशमुख तसेच पुरोगामी चळवळीच्या लोकांनी वाचायलाच हवीत अशी इतर अनेक पुस्तके आमच्याकडे उपलब्ध. जरूर मागवा*
*परस्परांना पुस्तके भेट द्या. वाचन चळवळ जोपासा*
-ॲड.शैलजा मोळक
मी वाचक-लेखक # वाचन संस्कृती
शिवस्फूर्ती मीडिया सेंटर व शिवस्पर्श प्रकाशन पुणे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know