WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Monday, June 14, 2021

छत्रपती थोरले शाहूमहाराज (सातारा)

छत्रपती थोरले शाहूमहाराज (सातारा)

छत्रपती शिवरायांच्या स्वप्नातील राज्याचा विस्तार खऱ्या अर्थाने छत्रपती थोरले शाहू महाराजांच्या नेतृत्वात झाला.ज्यांनी कील्यांचे दरवाजे दिल्लीकडे ठेऊन भविष्यातील योजना केली होती ती प्रत्यक्ष आकारात छत्रपती शाहू महाराजांनी आनली!

९ मे १७०३ रोजी औरंगजेबाने शाहू महाराजांना धर्मांतरण करण्यास सांगितले.शाहू महाराजांनी औरंगजेबाला निर्धाराने नकार दिला.हा निर्धार इतिहासातील फार मोठी गोष्ट आहे.ही केवळ महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील अतिशय प्रभावी आणि महत्वाची घटना आहे.

औरंगजेबाने शाहू महाराजांना धर्मांतरण करण्यास सांगितले.' तू मुसलमान हो ' असे औरंगजेबाने म्हटल्याचा लेखी पुरावा 'अखबार' मध्ये मिळतो.

शाहू महाराजांनी औरंगजेबाला निर्धाराने नकार दिला....धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचे ते चिरंजीव! कैदेत असूनही नकार दिला.कोणत्याही प्रलोभनाला बळी नाही पडले.....

वयाच्या १८ वर्षापर्यंत शाहू महाराज आई सह औरंगजेबाच्या ताब्यात होते.स्वातंत्र्य नव्हते. शाहू महाराजांना एवढा ठाम निर्धार आणि निर्णय घेण्याची शक्ती कुठून आली असावी? याचे उत्तर शोधताना आपल्याला येसूबाई आठवतात.त्यांनीच धर्म रक्षणासाठी शाहू महराजांचे हे मनोबल निर्माण केले होते.त्या त्यासाठी शाहू महाराजांच्या सोबत सावलीसारख्या राहत होत्या.

पण शाहू महाराजांनी धर्मांतरण केले असते तर काय घडले असते?इतिहास जर तर वर ठरत नाही हे जरी खरे असले तरीही इतिहासात ही घटना किती महत्वाची आहे हे समजण्यासाठी हा विचार!स्वराज्याचा विस्तार ,चिमाजी बाजीरावांचा पराक्रम, शिंदे ,होळकर यांचा उदय,मराठ्यांचा जगभर निर्माण झालेला दरारा या पैकी काहीही घडले नसते....या देशाच्या इतिहासाला कसे वळण लागले असते? समाजावर काय परिमाण झाला असता हे सांगणे कठीण आहे.म्हणून छत्रपती शाहू महाराजांच्या चरित्राची ओळख आवश्यक आहे.

छ्त्रपती शाहू महाराज थोरले यांचे चरित्र!

पुस्तक: छत्रपती थोरले शाहू महाराज (सातारा)

लेखक: आसाराम सैंदाणे

प्रकाशन:प्रतिमा 
Yash Maske

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know