Sunday, June 13, 2021

नवल

नवल
प्रशान्त बागड
पपायरस प्रकाशन
पहिली आवृत्ती एप्रिल २१
किंमतः रू. ४७५.

नवल ! 
         'नवल' कादंबरी वाचली. 'न' आणि 'व' एकत्र आहेत म्हणजे 'नव'. 'न' चा दांडा 'व' च्या डोक्यावर आहे. 'व' आणि 'ल' एकत्र असून वेगळे दिसतात. 'ल' कडून 'व' कडे बघितले 'लव' वगैरे वाटते मात्र तसे काहीही नाही.उलट वाचले तर 'लवन'. मीठ. 'ल' वेगळाच आहे. 'ल' चं लंचाड खरंगळत गेलंय पार खाली.
केशरी रंगाचा पट्टा आणि पिवळ्या रंगाचा वरचा पट्टा. पट्ट्यांचा रट्टा त्यावर पडतो अन् त्याचा पदर ढळतो अन् त्यातून पिवळा रंग दिसतो. थोडक्यात काय तर केशरी रंगाच्या खाली पिवळा रंग आहे. अनेक अर्थ, संदर्भ यातून प्रकट होऊ शकतात. व्यवस्थेमागील खरी परिस्थिती.
हे माझं आख्यान आहे, मुखपृष्ठाविषयी. 
डोक्यावरून गेलंय का ? असंच काहीसं माझं या कादंबरी वाचनाविषयी झालं आहे.
    पुस्तक आकर्षक आहे. आखीव- रेखीव आहे. फाँट जर छोटा ठेवला असता तर कदाचित पुस्तक अजून छोटं झालं असतं किंमत कमी झाली असती. 
असो.

काही काही वाक्ये/ओळी अंतर्मुख करतात. 
नुसताच पसारा आहे. शब्दाशब्दाशी खेळत बागडत कथानक लंपास होतं, दिसतं-फुटतं.. धुसर, फिकट.

या पुस्तकाच्या पहिल्या पानावर दोन इंग्रजी सुंदर वाक्ये आहेत, ते सर्वांना आवडतील अशी आहेत.

१) 
I will open my mouth in parables; I will utter things kept secret from the foundation of the world.

  The King James Bible, Matthew, 13.35

२)
I must be found.

  William Shakespeare, Othello, 1.2.31

ही कादंबरी होस्टेलमध्ये राहणाऱ्या विद्यार्थ्यांच्या जीवनाचा परिचय देते. विद्यार्थी एकत्र असून स्व'तंत्र' आहेत. हे तसं अनेक कादंबऱ्यांमध्ये येऊन गेलं आहे. उदाहरणार्थ कोसला वगैरे. मग या कादंबरीत वेगळं आणि नवीन काय आहे ? असा प्रश्न पडतो. काळ बदलतोय. तसं माणसाचं राहणीमान, त्याची विचारसरणी बदलतेय. 

एक गोष्ट नमूद करतो अन् थांबतो.. या कादंबरीची भाषाशैली वेगळी आहे. सरळ काहीच सांगत नाही. बागडत बागडत ( प्रशान्त बागड) या वेलीवरून त्या वेलीवर जाते. वाचकाचे हाल होतात. मात्र  शब्दांची मोडतोड मला विशेष आवडली. (ही कादंबरी पुढील काळातील मराठी कादंबरीच्या घाटाची नविन चाहूल असावी का ?) त्यामुळे मी संपूर्ण कादंबरी वाचू शकलो. ही कादंबरी भविष्यातील कादंबरीच्या नव्या घाटाची चाहूल वाटते का ?  कदाचित परत वाचेल. एखाद्या वाचणाऱ्या मित्राला वाचायला देईन. त्याची प्रतिक्रिया घेईल.
असो.

पपायरस प्रकाशन चे दोन्हीही प्रकाशने रूबाबदार अन् देखणे आहेत.
१) पासोडी
२) नवल

                  |र| |वीं| |द्र|

Bhushan Kolte 
Prashant Bagad

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know