Friday, June 18, 2021

चिकन सूप फॉर द सोल

*चिकन सूप फॉर द सोल*
       ( मानवी मनोगुणांचा वेध घेणाऱ्या कथा)
    *लेखन व संकलन*
        जॅक कॅनफिल्ड
        मार्क व्हीकटर हॅन्सन
       
        *अनुवाद*
        उषा महाजन

जॅक कॅनफिल्ड आणि मार्क हॅन्सन या अमेरिकेतल्या. सर्वप्रिय, सुप्रसिद्ध अशा दोन वक्त्यांनी मिळून संकलित केलेल्या या कथा जगाच्या कानाकोपऱ्यातल्या जनमानसाच्या मनाला जाऊन भिडल्या आहेत, भावल्या आहेत.

या कथांमधील आशावाद, बुद्धीवाद तुम्हाला येणारं नैराश्य झटकून टाकायला मदत करेल. अतिशय विचारपूर्वक निवडलेल्या या कथा म्हणजे 'अशक्य' शब्दप्रयोगाला झुगारून देऊन आपल्या

आयुष्याचा मार्ग उजळून टाकणाऱ्या आहेत. जेव्हा कधी तुम्हाला तुमचा मुद्दा ठामपणे मांडावासा वाटेल, एखाद्या मित्र-मैत्रिणीला स्फूर्ती द्यावीशी वाटेल किंवा लहान मुलाला शिकवण द्यावीशी वाटेल, तेव्हा या पुस्तकातील अनेक हृदयस्पर्शी कथांचा हा ठेवा नक्कीच उपयोगी पडेल..

   "लोकं फार वाईट वागतात...!” “जिकडे बघावं तिकडे निराशाजनक चित्र दिसत असतं.” “चांगलं असं काही घडतच नाही का?” “सगळीकडेच परिस्थिती कशी खराब झाली आहे नाही?" इ.इ. असे उद्गार वेळोवेळी आपल्याला ऐकायला मिळतात. कधी कधी आपणही त्याच सुरांत सूर मिळवतो. हे उद्गार अगदीच निरर्थक असतात असं नाही, पण वाईटाबरोबरच जगात थोडं का होईना चांगलंही घडतं आहेच की! चांगलंही वागणारी, विधायक कामं करणारी माणसंही आहेतच की!

आपल्याला अनेक वेळा माणुसकीचे सुखद अनुभव येत असतात. आशादायक असं काहीतरी घडतंय असं जाणवतं. कधी कधी एखादी अगदी सामान्य व्यक्ती देखील अशी काहीतरी असामान्य, अद्भुत कृति करून दाखवते की जी आदर्श ठरावी. जिच्यापासून सर्वांनी बोध घ्यावा- शिकावं असं तीव्रतेनं वाटतं!

आजच्या ताणतणावाच्या, हिंसेच्या, दहशतवाद-द्वेषानी भरलेल्या जगात गरज कशाची आहे तर- प्रेमाची, परोपकाराच्या भावनेचं पुनरूत्थान करण्याची! पाश्चिमात्य व पौर्वात्य देशातील अनेक सामान्य (क्वचित सुप्रसिद्ध) व्यक्तींनी असंच काहीतरी जगावेगळं करून दाखवलंय जे सगळ्यांच्याच मनाला भावण्यासारखं आहे. अशा या सत्यकथा 'Chicken Soup for the Soul' ह्या Best Sellers च्या यादीतील इंग्रजी पुस्तकांतून १९९२ साली प्रसिद्ध झाल्या आहेत. ह्याचे पुढील भाग Second, Third, Fourth Serving of Chicken Soup for the soul या शीर्षकाखाली..

मराठी भाषांतर पण खूप सुंदर रित्या
केलेलं आहे..

    इंडीयन सोल, मदर्स सोल  ही पुस्तके अजून वाचनीय
आहेत.

                        .......ममता मुनगीलवार

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know