WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

Saturday, June 19, 2021

द_5_ए_एम_क्लब भाग 4

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग चौथा

#दिनचर्या

पहाटे उठून व्हिक्टरी अवरनंतर काय करायचे आणि एकूणच दिनचर्या कशी असावी हयाबाबत सुद्धा लेखकाने अमूल्य असे मार्गदर्शन केले आहे.
हया दिनचर्येचे नित्यनेमाने आयुष्याच्या अंतापर्यंत पालन केल्यास आयुष्य आनंददायी तर होतेच त्याबरोबरच माणूस सृजनशील बनतो आणि ध्येयवादी बनतो त्यामुळे हमखास निष्पत्ती मिळते

1️⃣ सकाळचा वेळ
कालावधी : पहाटे ६ ते ८ वाजेपर्यंत
कृती :  
▪️छंद कला आवडीनिवडी यांची जोपासना, 
▪️कुटुंबीयांना वेळ (बातम्या आणि मिडीयापासून दुरावा)
▪️मसाज (आठवड्यातून दोनदा)
▪️ प्रवासात असल्यास आँडिओबुक श्रवण
फायदे:
➡️ आनंद आणि शांततेत वाढ
➡️ वेळेचा उत्तम विनियोग
➡️ मानसिक क्षमतामध्ये वाढ
➡️ आरोग्यात सुधारणा
➡️ मसाजने शरीराची स्नायूंची लवचिकता टिकवून ठेवणे
➡️ ताणतणाव व्यवस्थापन
➡️ भीती कमी करून आनंद वाढल्यामुळे माणूस दीर्घायुषी होतो

2️⃣ दिवसभराचा वेळ
कालावधी : सकाळी ८ ते संध्या.५ वाजेपर्यंत
कृती :  
ध्येयनिश्चिती आणि कार्यपद्धती
▪️ #TBTF (संपूर्ण एकाग्रतेचा हवाबंद फुगा )
या पद्धतीने व्यत्ययरहित एकाग्रतेने जागतिक दर्जाचे काम आपल्या हातून घडेल याची दक्षता घेत आपला वेळेचा सदुपयोग करत मोहाच्या आकर्षणाच्या क्षणांना बळी न पडता,नकारात्मक व्यक्ती, मिडीया,वायफळ खर्च यापासून दूर राहण्यासाठी आपल्या प्रतिभेभोवती रूपकात्मक खंदक उभारून तिचे रक्षण करायचे

▪️ #time_९०_९०_१ 
या नियमानुसार ९० दिवस  रोज कामाची पहिली ९० मिनिटे प्राधान्याने महत्त्वाची कामे करणे
 काम आणि मोहाच्या गोष्टींमध्ये सीमारेषा आखायची.
नंतरच्या काळात बाकीची कामे

▪️ #time_६०_१० 
या पद्धतीने ६० मिनिटे काम आणि त्यानंतर १० मिनिटे विश्रांती असा कामात समतोल साधायचा

▪️  #स्वप्नसंघ : जी कामे करण्यात आपल्याला आनंद मिळत नाही, जी आपल्याला येत नाही ती कामे त्या विषयातील तज्ञांना सोपवून आपली कामगिरी सुधाराची

फायदे:
➡️ आनंद आणि शांततेत वाढ
➡️ दिवसभर स्फूर्ती टिकवून ठेवणे
➡️ मानसिक क्षमतामध्ये वाढ
➡️ आरोग्यात सुधारणा
➡️ क्षुल्लक आकर्षणापासून माणूस दूर जाऊन महानतम कार्यासाठी प्रयत्न करतो
➡️ विनागरजेच्या वस्तू, नोटिफिकेशन तसेच वेळखाऊ लोकांपासून माणूस दूर राहतो
➡️ एकाग्रता, उर्जा, वेळ, बुद्धिमत्ता, इच्छाशक्ती हयांचे रक्षण आणि योग्य वापर
➡️ आपल्या हातून जगदकल्याण होणार असल्याची सुखद भावना निर्माण होते

3️⃣ संध्याकाळचा वेळ
कालावधी : संध्याकाळी ५ ते रात्री ७ वाजेपर्यंत
कृती :  
▪️दिवसभराचा आढावा
▪️जर्नल /रोजनिशी/ध्येय लेखन
▪️समाजोपयोगी काम
▪️ एक तासाचा नेचर वाँक किंवा योगा किंवा स्विमिंग
फायदे:
➡️ स्व - सुधारणेवर भर
➡️ उत्तम व्यक्तिमत्त्व
➡️ वेळेचा सुनियोजित वापर
➡️ स्वतःच्या ध्येयावर लक्ष
➡️ मानसिक शांती
➡️ उत्तम पचनशक्ती आणि आरोग्य
➡️ सामाजिक जाणीव

 
4️⃣ रात्रीचा वेळ
कालावधी रात्री 8 ते पहाटे ५
▪️कुटुंबासाठी वेळ
▪️जेवण
▪️जर्नल /रोजनिशी/ध्येय लेखन
▪️साप्ताहिकी (दर रविवारी पुढच्या आठवड्याच्या कामाचे नियोजन )
 ▪️झोप (रोज आठ तासाची झोप)
फायदे:
➡️ उत्तम नातेसंबंध
➡️ उत्तम आहार
➡️ कामाचे उत्तम नियोजन
➡️ अपमृत्यू टाळणे
➡️ उच्च सृजनशीलता आणि उत्पादकता
➡️ हार्मोनल बँलन्स

अपूर्ण
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know