Sunday, June 20, 2021

द_5_ए_एम_क्लब भाग 5

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग पाचवा : जीवन सुधारणारी दहा जादूई सूत्रे

1️⃣ #स्वतः मध्ये_किमया_करा
जेव्हा तुमचे स्वतः बरोबर नाते सुधारता तेव्हा आपोआपच इतरांबरोबर तुमचे नाते सुधारते त्यामुळे ध्यानधारणा, शांतीद्वारे स्वतःला जाणून घ्या, स्वतःमधील महानता,प्रतिभा सृजनशीलता समजून घ्या

2️⃣ #आश्चर्यकारक_अनुभव_मिळवा
भूतकाळाच्या जुन्या जखमा कुरवाळत बसू नका, हसा खेळा नाचा आणि साधे सोपे जीवन जगून वर्तमानातील प्रत्येक क्षण जगून घ्या पण आरोग्य आयुष्याचा दर्जा खालावू देऊ नका

3️⃣ #अपयशाने_निर्भयता_वाढते
भयाच्या विचारांनी स्वतःच्या इच्छा, महत्वाकांक्षा, कल्पनाशक्ती दबून देऊ नका
स्वतःच्या मनाप्रमाणे जगा, आपल्या आतील महानता नाकारू नका.
सकारात्मक बोलायला आणि विचार करायला शिका.धैर्याने भीतीला सामोरे जा.

4️⃣ #व्यक्तिगत_रामराज्य_निर्माण_करा
      आपल्या सार्वभौम बनवणाऱ्या अंगभूत गुण आणि शक्तींकडे  तसेच इच्छांना मूर्तरूप देणारे साधन (विचार, भावना ,शब्द ,कृती) याकडे दुर्लक्ष करू नका.

5️⃣ #वाईट_माणसांना_टाळा
संगतीतून माणसाचे चरित्र्य घडते त्यामुळे इतरांचे वाईट इच्छिणार्या ,आपला उत्साह नष्ट करणाऱ्या, अडचणी आणणारया नकारात्मक ,त्रासदायक लोकांपासून दूर रहा त्याऐवजी उद्योगी,उत्साही ,नीतीवंत , प्रेमळ आणि सकारात्मक लोकांच्या संगतीत राहा.

6️⃣ #पैसा_म्हणजे_औदार्याचे_प्रतीक 
गरीबी ही मानसिक अवस्था आहे त्याचा बाहयस्थितीशी संबंध नाही.त्यामुळे पैसा फक्त साठवून ठेऊ नका त्याला वाहता ठेवा
उदारमनाने (उधळया वृत्तीने नाही) खर्च करा,
कमतरता आणि अभावाचे विचार मनातही येऊ देऊ नका.
अपेक्षित, अनपेक्षित सर्व मार्गांनी पैसे येत राहतील अशी मनोभूमिका ठेवा.
दानशूरपणा आणि समृद्धीवर पूर्ण विश्वास ठेवा.
पैसा आणि मदतीबद्दल नेहमी कृतज्ञ रहा,
अपेक्षेपेक्षा जास्त सेवा,मदत,पैसे आपल्या ग्राहकांना, मित्रांना, कुटुंबीयांना देत राहा.

7️⃣ #निरोगीपणा_कमवा
उत्तम शारिरीक आणि मानसिक आरोग्य ही खूप मोठी संपत्ती आहे ती जपा
आहार ,विहार, आचार,विचार, निद्रा,व्यायाम हयांच्या चांगल्या सवयी लावून निरोगी व्हा.

8️⃣ #जागतिक_दर्जाची_जीवनमानके
आयुष्यात जे काही कराल ते जागतिक दर्जाचे करा.
स्वतः चे भरपूर लाड ,कौतुक करा
स्वतः मध्ये गुंतवणूक करुन सर्वोत्कृष्ट माणूस बना, स्वतः ची कौशल्ये सुधारा,फुलांच्या सहवासात रहा.
आनंद देणारे उत्तम संगीत ऐका.

9️⃣ #मनपूर्वक_प्रेमातून _शाश्वत_आनंद 
सगळयांशीच शक्य तितक्या प्रेमाने वागा
माणसांना आनंदी बनवा ,त्यांच्याशी प्रेमाचे चार शब्द बोला, पाठीवर कौतुकाची थाप द्या. मदत करणाऱ्यांना धन्यवाद द्या
भेटणाऱ्या प्रत्येक माणसाचे चांगले गुण आपण आत्मसात करण्याचा प्रयत्न करा.
प्रियजनांवर प्रेम करण्याच्या आड येणाऱ्या भावनिक जखमांकडे दुर्लक्ष करा.

🔟 #पृथ्वीलाच_स्वर्ग_बनवा
स्वर्ग हे ठिकाण नाही तर उत्तम मनस्थितीचे प्रतीक आहे त्यामुळे आपले मन,बुद्धी, ह्रदय स्वच्छ ठेवा
स्वतःची आत्मिक पातळी वाढवून घडणाऱ्या घटनांचे अर्थ समजून घ्या.
स्वतःच्या अस्तित्वाची किंमत समजून शंका,भीती,संशय ,असुरक्षितता,जुन्या चुकीच्या धारणा,मर्यादा घालणारे विचार यांना दूर सारा.
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know