लेखक : राँबिन शर्मा
प्रकाशक : जयको पब्लिकेशन
लेखमाला : भाग तिसरा
#पहाटे_उठून_काय_करायचे
बर्याच जणांना हा प्रश्न सतावतो त्यामुळे ते झोपणेच पसंत करतात त्यामुळे लेखकाने पूर्ण टाइमटेबलच फायद्यासहित सादर केले आहे
लेखक म्हणतात की सकाळी ५ ते ६ हा कालावधी व्हिक्टरी अवर म्हणून ओळखला जातो यात माणूस स्वतःचा शारिरीक, आध्यात्मिक, मानसिक आणि कौशल्य विकास करून स्वतःला विजयी बनवता येते
1️⃣ पहिला टप्पा : शारिरीक व्यायाम🏋️
कालावधी : पहाटे 5.00 ते पहाटे 5.20
कृती :
▪️शरीरातून घाम निथळेपर्यंत व्यायाम
(वेगानं धावणे,दोरीवरच्या उड्या ,सपाट्या)
▪️दीर्घश्वसन आणि पाणी पिणे
फायदे :
➡️पचनशक्ती सुधारणा ,
➡️आनंदाचे हार्मोन्स वाढणे,
➡️तणावाच्या हार्मोन्सवर नियंत्रण
➡️ वाढलेली उर्जा आणि उत्पादकता
➡️ आयुर्मानात वाढ
2️⃣ दुसरा टप्पा : मानसिक व्यायाम 🤹
कालावधी : पहाटे 5.20 ते पहाटे 5.40
कृती :
▪️ध्यानसाधना,
▪️दिवसाचे नियोजन ,
▪️जर्नल (रोजनिशी) लेखन ,
▪️ध्येय लिहून काढणे
फायदे :
➡️ ध्यानाने मनशांती मिळते आणि स्वतः मधील शक्तिमान अस्तित्वाशी संपर्क होतो
➡️ कामाच्या नियोजनामुळे कामे उत्तम होतात
➡️ जर्नल (दैनंदिन रोजनिशी ) लिखाणामुळे आपल्या आयुष्यात काय चांगले वाईट घडतय ते कळते तसेच काय सुधारणा करून आयुष्य समृद्ध करता येईल हयावर सृजनशील विचार होतो आणि एकूणच आयुष्य सकारात्मक होते
➡️ आपल्या आयुष्यातील ध्येय लिहून काढल्याने कमिटमेंट वाढून रोजच्या प्रगतीचा आढावा घेतला जातो
➡️ स्वतः मधील गुण अवगुणांची ओळख होते
➡️ स्वतः मध्ये जे चांगले आहे त्याबाबत कृतज्ञता व्यक्त करता येते
➡️ अपेक्षाभंग, तिरस्कार, निराशा रोजनिशीत लिहिल्याने मन साफ राहते
3️⃣ तिसरा टप्पा : कौशल्य विकास 📻📚📡
कालावधी : पहाटे 5.40 ते पहाटे 6.00
कृती :
▪️पुस्तक वाचन
▪️आँडिओबुक/पाँडकास्ट श्रवण
▪️आँनलाईन लर्निंग
फायदे :
➡️ कार्यक्षेत्रातील ज्ञानात वृद्धी
➡️माणसाचा उत्पन्न ,प्रभाव दुपटीने वाढतो आणि प्रभुत्व ,क्षमता तिपटीने वाढतात
➡️ माणसाचा आत्मविश्वास शतपट वाढतो
➡️ अचूक निर्णय घेण्याची क्षमता येते
➡️ माणसाची प्रगतीच्या दिशेने जोरदार वाटचाल
अपूर्ण
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know