WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Friday, June 4, 2021

जगातील सर्वात महान विक्रेता ~~ऑग मॅनडीनो

The greatest salesman in the world by                      Og Mandino 

जगातील सर्वात महान विक्रेता  ~~ऑग मॅनडीनो

हे पुस्तक फक्त विक्रीचे (sales) कौशल्य शिकवणारे नसून जीवनाचे तत्वज्ञान यात सांगितले आहे.
तुम्ही कोणतेही काम करत असलात तरी तुम्ही एक विक्रेताच (सेल्समन)असता.
कुणी बुद्धि विकतो, कुणी श्रम, कोणी ज्ञान तर कुणी कौशल्य.
ह्या पुस्तकात १० सूत्रे सांगितली आहेत ती वापरून तुम्ही निवडलेल्या क्षेत्रात प्रगती करता येईलच त्याचबरोबर एक परिपूर्ण , समाजोपयोगी आणि मनाने  समृद्ध जीवन जगता येईल.
अफाट संपत्ती मिळवण्याबरोबरच नातेसंबंध कसे जपावे , समाजहिताची जाणीव आणि  जीवनाच्या प्रत्येक क्षणाचा उगयोग कसा करावा हे शिकवण्याचे काम हे पुस्तक करते.
यश प्राप्तीची १० सूत्रे 
१. स्वतःला चांगल्या सवयी लावून घेइन आणि त्यांचा गुलाम बनून जाईन.
I will form good habits and become their slave.
२. आजच्या दिवसाचे मी प्रेमपूर्वक, हृदयपूर्वक अभिवादन करिन.Greet each day with love in your heart.
शत्रूची तारीफ करिन. मित्रांना प्रोत्साहन देईन. इतरांची निंदा करायचा मोह झाला तर स्वतःची जीभ चावून धरीन. इतरांची प्रशंसा मी मुक्तकंठाने करिन.
३. मी तोपर्यंत चिकाटी बाळगिन जोपर्यंत मी यशस्वी होत नाही.I will persist until I succeed.
आलेलं प्रत्येक अपयश पुढच्या प्रयत्नात माझ्यासाठी यशाची शक्यता वाढविते.
४.मी निसर्गाचा सर्वात महान चमत्कार आहे.I am Nature's greatest miracle.
माझ्यासारखा पूर्वीही कोणी नव्हता आजही नाही आणि उद्याही नसेल. मी मार्गाची एकमेव अद्वितीय रचना आहे.
माझे इतरांपेक्षा असलेले वेगळेपण मी सिद्ध करिन.
५.हा दिवस मी अश्या रीतीने जगेन जणू तो माझा शेवटचा दिवस आहे. Live each day as if it were your last.
मी भूतकाळाला विसरून जाईन आणि उद्याचा विचार करणारं नाही.
कालच्या दुर्दैवाबद्दल विव्हळत एकही क्षण वाया घालवणार नाही. आजची कामे कर्तव्ये मी आजच पूर्ण करिन. आज मी माझ्या एखाद्या गरजू मित्राला मदत करिन. 
रिकामटेकडेपणाच्या गप्पा मी ऐकणार नाही. मी प्रत्येक तसाचा हिशेब ठेवीन आणि प्रत्येक मिनिटाला काहीतरी मूल्यवान व्यवहार करेन. या दिवसाला मी माझा सर्वोत्तम दिवस बनवेन.
६. आज मी माझ्या भावनांना नियंत्रित करीन. Master your emotions.
जर मी ग्राहकांशी उदासीनतेने निराशावादी वृत्तीने वागलो तर प्रतिसादही तसाच मिळेल. याउलट मी आनंदाने प्रसन्नतेने वागलो तर माझे ग्राहकही मला आनंदात प्रसन्नतेने प्रतिसाद देतील.
७. मी जगावर हसेन. The power of laughter.
मी सर्वात जास्त स्वतःवर हसेन करण माणूस जेव्हा स्वतःला जास्तच गंभीरतेने घेतो तेव्हा तो अत्याधिक हास्यास्पद बनतो.
जेव्हा माझ्या मनस्थिती ला धोकादायक परिस्थिती निर्माण होईल तेव्हा मी एवढंच म्हणेन .....हेपन निघून जाईल.
जेव्हा माझ्या हसण्याने इतरांच्या चेहऱ्यावर हास्य फुलेलं तेव्हाच माझा प्रत्येक दिवस विजयचा दिवस ठरेल.आणि मी हे माझ्या स्वार्थासाठी कारेन कारण मी ज्यांच्यासमोर कपाळावर आठ्या चढविन ते माझा माल कसा खरेदी करतील.
८.आज मी माझे मूल्य शेकडो पटींनी वाढावेन.Multiply your value every day.
सर्वात आधी मी माझ्या आजच्या दिवसासाठी, आठवड्यासाठी, महिन्यासाठी, वर्षासाठी आणि माझ्या पूर्ण जीवनासाठी उद्धिष्ट ठरविन.
काल केलेल्या माझ्या प्रत्येक कृतीपेक्षा माझी आजची कृती सरस असेल.
स्वतःची बढाई मारणार नाही आणि प्रशंसेला नम्रपणे स्वीकारीन.
९.मी आताच कामाला लागेन.All is worthless without Action.
माझी स्वप्ने, माझ्या योजना, माझी उद्दिष्टे व्यर्थ/निरर्थक आहेत जोपर्यंत मी त्यांना अनुसुरुन कृती करणार नाही.
माझा आळस आजचे काम उद्यावर ढकलण्याची वृत्ती माझ्या भीतीतून येते. माझ्या भीतीवर मात करण्यासाठी मी नेहमी क्षणभरही न रेंगाळता, कृती केली पाहिजे ,काम केले पाहिजे.
मी आजचे काम उद्यावर टाकणार नाही कारण Tomorrow never comes.
१०. मी देवाकडे मार्गदर्शन मागेन. Pray to God for Guidance.
मी देवाकडे प्रार्थना करिन त्या  भौतिक गोष्टीसाठी नाही तर  फक्त मार्गदर्शनासाठी.
अडचणीत आणि अपयशाच्या मला विनम्र बनायला मदत कर. पुन्हा पुन्हा प्रयत्न करण्याची मला सवय लागावी म्हणून मला शिस्त लाव.
संधीला जाणून घेण्याची जागरूकता मला दे. तरीही मला धिर धरायला शिकव.

वरील दहा सूत्रे पुस्तकात एका गोष्टीच्या स्वरूपात सांगितली आहेत. ११२ पानांचं हे पुस्तक कधी वाचून झालं समाजनारही नाही. पण ह्यात दिलेली सूत्र अमूल्य आहेत.
संदर्भ  विजयकुमार चोघुले

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know