(Putting the power of your subconscious mind)
लेखक : जोसेफ मर्फी
अनुवाद : हेमलता अंतरकर
लेखमाला - भाग दुसरा
#इतरांचे_सहकार्य_ आणि _पाठिंबा_मिळवण्यासाठी
आपले यश हे अनेकदा इतर लोकांवर अवलंबून असतो (ग्राहक,वितरक, सहकारी, वरिष्ठ ) अवलंबून असते
त्यांच्याशी परस्पर संवाद आणि सहयोग मिळवूनच आपण यशस्वी होऊ शकतो
1️⃣ नेता बनण्यासाठी
➖ माणसांची पारख करा,मूल्यमापन करा ,त्यांच्या अक्षमतांना सक्षमतेत परावर्तित करा
➖आपल्याकडे ज्या क्षमता नाही त्या ज्याच्याकडे आहे त्यांना जवळ करून स्वतःच्या शक्तीला पूरक बल निर्माण करा
आणि त्यांना योग्य जबाबदारी द्या.
➖नेत्यांना त्याची उद्दिष्ट माहिती असते
आणि त्यासाठी जिवापाड प्रयत्न करून ते आयुष्याची लढाई जिंकतात
➖नेते वाईट काळातही धीर सोडत नाही
स्वतः वरचा विश्वास अढळ ठेवतात
आणि चिकाटीने अडचणीवर मात करतात
➖नेते जेवढी अपेक्षा आपल्या टीममधील लोकांकडून ठेवता तेवढीच स्वतः कडून ठेवा
➖नेते कठोर निर्णय घ्यायला मागेपुढे पाहत नाही
➖नेत्याकडे दूरदृष्टी आणि आत्मविश्वास असतो
➖नेते आपल्या महत्वाकांक्षेमुळे मोठी ध्येय गाठतात आणि त्यासाठी आपल्या सक्षम सहकार्यांना योग्य जबाबदारी देतात
त्यांना साधने पुरवतात नियंत्रण ठेवतात,
➖ नेते प्रभावी आत्मसंवाद करतात
दोषांवर मात करतात, आपल्या धारणांना सकारात्मक बनवतात, दुसऱ्या ची नक्कल करू नका
2️⃣ टीम मँनेजमेंट
कोणत्याही संस्थेची कुठलेही काम करणारी टीम (वर्कर ग्रुप ) असो, टीम मँनेजर तिचा प्रमुख असतो पण काम करण्याची सगळयांची जबाबदारी समान असते.
उत्तम मँनेजरने खालील जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात
1. प्रेरणाशील टीम विकसित करणे
2.सगळयांना टीमचा उद्देश समजावून सांगणे आणि प्रत्येकाला त्यांचे ध्येय साध्य करण्यास सांगणे
3. टीममधील लोकांच्या सूचना स्वीकारणे तसेच टीमला सूचना करणे.प्रेरित करणे
4.टीममधील प्रत्येकाच्या कामगिरीवर लक्ष ठेवणे, तिचे मोजमाप करणे,कामगिरीत सुधारणा हवी असल्यास ती करण्यासाठी योग्य ते प्रयत्न करणे.
5. टीममध्ये काही वाद झाल्यास तो सोडवणे
उत्तम टीममेंबरने खालील जबाबदाऱ्या पार पाडायच्या असतात
1. गटचर्चेत सहभागी होऊन सूचना, कल्पना सांगणे तसेच इतरांच्या कल्पनांना पाठिंबा देणे किंवा भाष्य करणे
2.ग्रुपची तसेच स्वतःची उद्दिष्ट पूर्ण करणे
3.संघभावना जपून इतरांना मदत करणे
4. स्वतः मध्ये आणि ग्रुपच्या कामगिरी सुधारण्यास अग्रेसर राहणे
5.मनात अढी न ठेवता सर्व टीममेंबरने एकमेकांना सांभाळून घेणे,एकमेकांच्या कामात मदत करणे, अडचणीत सहकार्य करणे
6. टीममेंबरने वाईट सवयींना बदलावे लागेल
7. जैसे थे प्रवृत्तीचा त्याग करून कामात ,तंत्रज्ञानाच्या बदलांना स्वीकारत स्वतःची आणि कंपनीची क्षमता वाढवावी लागेल. आपले योगदान द्यावे लागेल.
3️⃣ मनपूर्वक कौतुक
प्रत्येकाला आपले झालेले कौतुक आवडते
त्यामुळे कौतुकाचे महत्त्व जाणून
1.प्रत्येकाची उचित वाटेल तेव्हा प्रांजळपणे , मनपूर्वक कौतुक करा
2.कौतुकाला प्रदर्शन न समजता चांगल्या कामाची पोचपावती समजा
3. कशाबद्दल कौतुक केलं ते समोयच्याला माहिती करून द्या
4. कौतुक नेहमी जगजाहीरपणे करावे पण वाजवीपेक्षा जास्त नको.
5.कौतुकासाठी योग्य पारितोषिक असावे
आणि ते पारितोषिक मिळवण्यासाठी काही निकषही असावेत.जेणेकरुन उत्तम काम करण्याची प्रेरणा मिळत राहील.
4️⃣ परिणामकारक संवाद
उत्तम संवाद साधला तरच आपल्याला इतरांचे सहकार्य आणि पाठिंबा मिळेल
त्यामुळे परिणामकारक संवादासाठी
1.बोलताना आकर्षक शब्द
2. व्यवस्थित हावभाव आणि देहबोली
3.समोरच्याला समजेल असे बोलणे
4. समोरच्या नजरेस नजर देऊन उचित स्मितहास्य आणि आस्थेने बोलणे
5. संवादकुशल श्रोते बनणे
6.आपण संपर्कसुलभ असणे
7.आपल्या कल्पना सूचना मांडता येणे
8. मांडलेल्या कल्पना पटल्या नाही तर योग्य शब्दात त्यांना ते पटवून देणे किंवा सुधारणा करणे
5️⃣ अवघड लोकांशी व्यवहार करताना
आपल्याला कामात व्यवहारात आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या लोकांकडून काम करवून घ्यावी लागतात
1.चिडखोर माणसे असल्यास आतंरिक नैराश्याने ग्रासलेली असतात त्यामुळे त्यांना कुठलीही प्रतिक्रिया देताना सावधपणे स्वतःला त्रास करून न घेता द्यावी लागते.
2.असमाधानी माणसे स्वतःचाच तिरस्कार करत असतात आणि दुसऱ्या वर कायम टीका करतात त्यामुळे त्यांना त्यांच्या त्रासाचे मूळ ते स्वतःच आहेत याची जाणीव करून द्यावी लागते.प्रत्येकाच्या ठायी परमेश्वर समजायची भावना त्यांच्या मनात रूजवावी लागते.
3.नकारात्मक माणसे त्यांच्या नकारवादी दृष्टीकोणामुळे प्रत्येक गोष्टीला ते नकार देतात, विरोध करतात त्यांना भूतकाळातील अपयशामुळे निर्माण झालेला पूर्वग्रहदूषित दृष्टीकोन
समुपदेशनाच्या मार्फत बदलावे लागते
4. एखादी व्यक्ती आक्रस्ताळी असेल तर सगळे आँफिस आकांडतांडव करून भंडावून सोडतो अशा व्यक्तीला त्याच्या वागण्याचे दुष्परिणाम नजरेस आणून द्यायचे ,सुधारण्याची संधी देउनही जर तो तसाच वागत राहिला तर मात्र शिस्तीचा बडगा दाखवा
5.काही लोक सतत दुसऱ्याच्या चुका दाखवत त्यांना अस्वस्थ करतात
अशा लोकांना धन्यवाद देऊन हसत कामाला सुरुवात करा
6.काही लोक सदैव दुखी असतात हयाच्या घरीदारी सगळ्या गोष्टी बिघडलेल्या असतात त्यांना समजून घ्या ,त्यांच्या मनावरचा ताण हलका करा
6️⃣ वेळेचे व्यवस्थापन
रोज देव आपल्याला 86400 सेकंद देतो ते वाचवता येत नाही तर फक्त वापरायचे असतात त्यामुळे त्यांचा योग्य वापर होणे खूप महत्त्वाचे आहे त्यासाठी वेळेचे व्यवस्थापन करा
1. मास्टर लिस्ट:
आपल्याला ज्या काही गोष्टी करायच्या आहेत त्या एका वहीत नोंदवायचे
त्या उद्दिष्टांना लहान घटकात विभागा त्यांचा अमंलबजावणीचा रोज आढावा घ्यायचा.
2.उद्दिष्टांची समयबद्धता
आपल्याला साध्य करावयाच्या उद्दिष्टांना कालमर्यादा ठरवून द्यायची
त्यांच्या महत्वानुसार प्राधान्यक्रम ठरवा
आणि मग एक एक करून सर्व उद्दिष्ट साध्य करायची असतात.
काही काम सबुरीने करायची
3.उर्जापातळी :
आधिक उर्जावान असाल तेव्हाचे तास महत्त्वाच्या उद्दिष्टांना द्या
4.वेळेचे जर्नल : आपला वेळ कसा जातो हे एका वहीत नोंदवून त्याचा आढावा घ्यायचा आणि वेळ चोरणार्या कामाचे मूल्यमापन करायचे ,फोनवर मर्यादित आणि मुद्देसूद बोलायचे, व्हिजिटरसाठी दिवसातला एक तास वेगळा राखून ठेवायचा आणि स्वतः साठीही रोज काही वेळ राखून ठेवायचा. आधीच्या कामातून फुरसत नसेल तर नवी जबाबदारी शिरावर घेऊ नका.
7️⃣ कल्पनांची विक्री करताना
आपल्या कल्पना लोकांनी स्वीकाराव्यात हयासाठी काही विक्रीची तंत्रे वापरावी लागतात
प्रथम लोकांचे ध्यान आकर्षित करून त्यांच्या आवडीच्या विषयावर बोला
त्यांच्या अडचणी, समस्या जाणून घ्या
त्यांना सर्जनशीलपणे उपाय सूचवा.
त्यांच्यासमोर कल्पना अशी मांडावी की लोकांना ती आवडावी. त्याच्या हिताचा पूर्ण विचार हया कल्पनेत केलेला असावा.
कल्पना सादर करताना निरीक्षण शक्तीने माणसांचे चेहरे वाचा.त्यांची कमजोर स्थान ओळखा,त्यांच्या हरकतींना उत्तरे दया
योग्य आकडेवारी आणि विश्लेषणात्मक पुराव्यानिशी आपले म्हणणे मांडा
आणि विक्री पूर्ण करताना Feedback घ्या।
.
8️⃣करियरमध्ये प्रगती करण्यासाठी
करिअर ते असते ज्यावर तुमचे मनापासून प्रेम आहे आणि ते अर्थप्राप्ती करून देताना समाधान पण मिळवून देते
1.सर्वप्रथम आपल्या आवडीच्या गोष्टी कोणत्या ज्या आपल्याला अर्थार्जन करून देतील त्या शोधा. त्यासाठी अंतर्मनाची मदत घ्या
2.आवडीच्यात्या क्षेत्रातील जास्तीत जास्त ज्ञान मिळवण्यासाठी प्रयत्न करा
3.हयातून स्वार्थाबरोबर जगाची सेवा कशी करता येईल ते पाहा आणि आपले कर्म करता करता समाजसेवा करायचे ध्येय डोळ्यासमोर ठेवा.
4. आपल्या समोर ज्या काही अडचणी येतील त्यांचे पृथक्करण करून तत्काळ निर्णय घ्या आणि ते अमलात आणा
5.स्वतः वर अन्याय करू नका,स्वतःला कमी समजू नका
6. कामाच्या ठिकाणी फक्त बाँसच्याच नाही तर सर्व व्यवस्थापकांच्या नजरेत याल असे काम करा,
दृश्यमान होण्यासाठी वेगवेगळे मार्ग अवलंबा
- बैठकीत उपस्थित राहून व्यवस्थित अभ्यास करून कल्पना आणि सूचना मांडा
- इतरांच्या समस्या सोडवण्यासाठी मदत करा
- व्यवसाय पत्रिकेत आपल्या क्षेत्राशी निगडित लेख लिहा
- व्यावसायिक संघटनेचे सभासद व्हा
- स्वेच्छेने स्वयंसेवक व्हा
- यशासाठी स्वतःचा मार्ग बदला
संदर्भ निलेश शिंदे
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know