WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Sunday, June 13, 2021

हॅनाची सुटकेस

हॅनाची सुटकेस: 
नरसंहाराच्या ७० वर्षांनी उलगडले चिमुकलीचे भावविश्व

२००० साली जपानच्या एका हॉलोकास्ट (holocaust) संग्रहालयात एका मुलीची एक सुटकेस साढळली. त्यावर लिहिले होते ''हॅना ब्रॅंड 1931. अनाथ.'' 
हिटरच्या नाझींनी ज्यू लोकांच्या कत्तली करण्यासाठी छळछावण्या (Concetration Camp) उभारल्या होत्या. त्यात मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वस्तू विविध हॉलोकास्ट संग्रहालयात जतन करण्यात आल्या आहेत. या सुटकेसने संग्रहालयाला भेट देणाऱ्या जपानी मुलांची आणि संचालिका फ्युमिको इशिकोया उत्सुकता चाळवायची. कोण असेल ही हॅना?, काय झालं असेल तिचं.? ती जिवंत असेल का? ती छळछावणीत कशी आली? ती अनाथ कशी? असे अनेक प्रश्न होते. या प्रश्नांचा म्युझियमच्या संचालिका फ्युमिको इशिकोया (Fumiko Ishioka) यांनी अशक्यप्राय वाटणारा तिचा शोध सुरू केला. हॅनाच्या सुटकेस मध्ये तिने छळछावणीत (Concentration Camp) असताना काढलेली चित्रे आढळली. त्यातून त्या निरागस मुलीचं भावविश्व, तिचा मानसिक कोंडमारा अधोरेखित होत होता. त्यामुळे फ्युमिको अधिक बैचेन झाल्या आणि हॅनाचा शोध घेण्याचा इच्छा अधिक तीव्र झाली. 

फ्युमिको यांनी जगभरातील हॉलोकास्ट संग्रहालय, ज्यू लोकांच्या संस्था आदी ठिकाणी शोध सुरू केला. इस्त्रायलच्या 'याद वाशेम' या संग्रहालायत विचारणा केली. पण पदरी निराशा पडत होती. तरी फ्युमिको या स्वस्थ बसल्या नाही. सुटकेसवरून त्यांना  हॅनाचा शोध लावायचा होता. त्या ७० वर्षे मागे केल्या. दुसरं महायुध्द, त्यापुर्वीची परिस्थिती आदी जाणून घेऊन जगभर विखुरलेल्या ज्यू लोकांकडून शोध सुरू केला. जपान पासून सुरू झालेला त्यांचा शोध युरोप, कॅनडा पर्यंत पोहोचला. या प्रवासात उलगडत गेल्या मन हेलावून टाकणाऱ्या हृदयद्रावक घटना. 
  मुलांच्या दृष्टीकोनातून लिहिलेलं हे पुस्तक आहे. त्यामुळे सोपे आहे. मी हे पुस्तक एका दिवसात वाचून काढलं. पुस्तकात २००० चा काळ आणि दुसऱ्या महायुध्दाचा काळ अनोख्या फ्लॅशबॅक पध्दतीने लिहिला आहे. जगभरातील ३८ भाषांमधून हे पुस्तक प्रकाशित झाले आहे. ज्या प्रकारे अॅन फ्रॅंकची डायरी वाचतांना डोळे पाणावतात तसंच हॅना वाचतना आपल्या डोळ्यांच्या कडा ओलावतात. नाझींचा क्रूरपणा, ज्यू लोकांना सहन कराव्या लागलेल्या यातना आदी पुस्तकातून दिसतात. फ्युमिको यांच्या शोध मोहिमेत शेवटी सुखद धक्का मिळतो... हे पुस्तक वाचकांना सहज खिळवून ठेवतं.
कॅरन लिवाईन यांनी हे पुस्तक लिहिले असून त्याचा मराठी अनुवाद ज्योत्सना प्रकाशनने केला आहे.
- सुहास बिऱ्हाडे
हॅनाची सुटकेस (hana's suitcase) 
लेखक- कॅरन लीवाईन
मराठी अनुवाद- माधुरी पुरंदरे
प्रकाशक- ज्योत्सना, पुणे


No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know