Sunday, June 13, 2021

चिखल, घाम आणि अश्रू

चिखल, घाम आणि अश्रू

गावी दूरदर्शनच्या दुनियेतून शहरातील केबलच्या नगरीत discovery चॅनल सोबतच्या ओळखीत man vs wild मधील बेअर ग्रील्स कधी माझा आवडता नायक झाला समजलेच नाही असो, तशी मला पाश्चिमात्य देशातील पालकांची एक भूमिका खूप आवडते, ते आपल्या पाल्याला लहानपणापासून स्वतंत्र देतात त्याला काय करायचे ते करून देण्यासाठी, अगदी गरजेला वडिलांकडून उसने पैसे घेऊन वेळेत परत सुद्धा करतात.  

त्यातच हा बेअर लहानपणापासून अगदी तसाच स्वतंत्र,  कोणतीही गोष्ट साध्य करण्याची तयारी, त्यासाठी वाटेल ती जोखीम घेण्यासाठी हा बेअर तयार असायचा, परिणामाची चिंता त्याला नसायची मात्र अपयशी होताच पुन्हा जोमाने दुप्पट वेगाने हा त्या संकटांना लढायला तयार असायचा. एवढे सामर्थ्य मनाची निगरगट्टता त्यामध्ये आली कोठून ही तर Special air service (S.A.S) UNIT 21 मधून होय, इथेच बेअर सहनशीलता शिकला मानसिक आणि शारीरिक सुद्धा. SAS ला इतर स्पेशल फोर्सस युनिट्स आपला आदर्श मानतात. इथे प्रवेश घेण्यास उत्सुक असणाऱ्या दहापैकी नऊ जण अपयशी होतात यावरून समजेल याची निवड प्रक्रिया किती अवगड असेल ते. (याबद्दल सविस्तर पुस्तकातच वाचावे) 

SAS ला दुसऱ्या प्रयत्नात यश मिळाल्यानंतर बेअर असच हवाई उड्डाण करून 16 हजार फूट उंच आकाशात पोचला, red अलर्ट नंतर हिरवा सिग्नल मिळतात इतरांच्या प्रमाणे याने सुद्धा आफ्रिकेच्या वाळवंटात उडी मारली, 3 हजार फूट उंची आल्यावर त्याने आपले पॅरासूट उघडले, सुरुवातीला त्याला सर्व काही सुरळीत असल्याचे वाटले पंरतु काही वेळातच त्याचे पॅरासुट हेलकावे घेऊ लागले, काही समजायच्या आत तो पाठीवर धडकन आपटला काय उडला गेला, त्याला पाठीला काहीतरी होत असल्याचे त्याला जाणवत होते तो एका कुशीवर झाला, एवढ्या मोठ्या आघाताची किंमत त्याला चुकवावी तर लागणारच होती, डॉक्टरांनी त्याच्या पाठीचे 3 मणके मोडल्याचे सांगितले त्यात तो चालेल याची शास्वती सुद्धा नसल्याचे त्यांनी सांगितले. 

असेच कित्येक दिवस, महिने लोटले गेले तो ज्या बेडवर होता, त्या बेडच्या पुढे एक एव्हरेस्टचा फोटो होता, तो पाहून तो इतरांना मी नक्कीच एव्हरेस्ट सर करणार अस सांगत होता, सर्व त्याला मूर्ख समजू लागले, त्याचा वेडेपणा समजू लागले. मात्र थांबेल तो बेअर कुठला ? तो हळू हळू मणक्याला लावलेल्या पट्ट्यांच्या साह्याने चालू लागला, तेव्हा त्याचा आत्मविश्वास वाढू लागला की, बेअर तू चालू शकतोय ! कालांतराने तेच होऊ लागले बेअर चालू लागला ...

वय वर्षे 23 अंथरुणाला खिळलेला असताना, आपण ज्याच्या प्रेरणेने चालू लागलो त्यावर सवारी करण्याची इच्छा त्याने घरच्यांना बोलून दाखवली, घरच्यांनी नकार दिला असा वेडेपणा करू नकोस, मूर्ख आहेस तू बेअर, एव्हरेस्ट म्हणजे मृत्य हे घरच्यांना माहिती होत. शेवटी घरच्यांनी होकार दिलाच. आता बाकी होती स्पॉन्सरची शेकडो नकार पचवल्यावर एका कंपनीने स्वतःचा झेंडा एव्हरेस्टवर फडकवण्यासाठी बेअरला स्पॉन्सरशिप देऊ केली. 

मित्रांच्या तसेच अनोख्या व्यक्तींच्या समवेत एव्हरेस्ट सर करण्यासाठी बेस कॅम्पवर दाखल झाला, हे गिर्यारोहक रेडियोवर अचूक वातावरण बघून, वाऱ्यांचा अंदाज घेऊन बेस कॅम्प ते कॅम्प क्रमांक 1, कधी 2 तर कधी 3 कडे जात व परत बेस कॅम्पवर परत येत असत, याचे कारण एकमेव हेच की, आपल्याला ह्या हिमालयाच्या वातावरणासोबत जुळवून घेणे व आपण किती प्रमाणात जुळवून घेतो हे पाहणे, तसा हिमालय अजिंक्य आहे याचे कारण की येथे जाणाऱ्या पैकी फार लोक परत जिवंत येतात म्हणून यास अजिंक्य म्हंटले आहे. अनेक गिर्यारोहक यावर पोचले सुद्धा परत येताना त्यांचे मृत्यु झाले आहेत काहींचे ऑक्सिजनच्या तुटवड्याने तर काहींचे जेट स्ट्रीमच्या तडाख्याने, कारण एका क्षणात हिमालय रंग बदलतो त्यामुळे त्याला मुठीत घेणे अशक्य आहे.  म्हणून तर यास नेपाळमध्ये "आकाशाची देवता"  म्हंटल जात.

हिमालयाच्या उंचीच्या प्रदेशानंतर येतो तो डेथ झोन एवढ्या उंचीवर अन्न पचत नाही, हवा विरळ असते, दुपटी-तिपटीने शरीर दुबळे पडते, हवेत ऑक्सिजन नसतो, गिर्यारोहण म्हणजे हवामानसोबत आपले शरीर जुळवण आणि चैतन्य कायम ठेवणे, एव्हरेस्टच्या बाबतीत नशिबाची साथ असणे महत्त्वाचे. सहापैकी एक मृत्यू अशी आकडेवारी याची. इथे एक म्हणजे कमी ऑक्सिजनशी शरीर जुळवून घेणे. चढण्याच्या वेगावर ताबा असणे ही गुरुकिल्ली. उंचावरच्या हवामानाचा वाईट परिणाम होऊ शकतो, कदाचित मृत्यू होऊ शकतो. चुकीच्या पद्धतीने पर्वत चढल्याने मेंदूला सूज येणं, शुध्द हरपणे, डोळ्यात रक्त साकळने यासारखे आजार होऊ शकतात.

बेअर, त्याचा मित्र व एक शेर्पा कॅम्प 3 कडे जात असताना अचानक बेअर बर्फाच्या फटीत पडला, त्याच्या अंगावर मोठं मोठाले बर्फाचे तुकडे पडले, तो एका दोरखंडाला लटकला होता आणि हा दोरखंड केव्हा तुटेल याचा भरोसा नव्हता, त्याच्या हातातील कुर्हाडीने तो बर्फावर मारण्याचा प्रयत्न करत होता, सर्व पण व्यर्थ, पायातील हुक असलेल्या बुटाने (क्रेम्पोन्स) व्यर्थ प्रयत्न करीत होता, तो जिवाच्या आकांताने ओरडत होता, मात्र परिणाम शून्य,  आता सर्व संपले त्याला आपला मृत्यू समोर दिसत होता, त्याला अचानक कोणीतरी वर ओढतय अस जाणवत होत, वर गेल्यावर समजल तर तो शेर्पा होता, पुन्हा बेस कॅम्पवर कसा बसा गेलेल्या बेअर जवळ आता काहीच नव्हते, त्याचा आत्मविश्वास, ताकद, एव्हरेस्ट सर करण्याची उमेद सर्व हरवून बसला होता कारण दुसऱ्यांदा मरणापासून तो वाचला होता, असे वेगवेगळे अजुबे येथे क्षणा क्षणाला घडतात म्हणून तो नेहमी हिमालयाला अजिंक्य मानतो. 

बेअर आता हळूहळू पूर्ववत होऊ लागला, इकडे आपण का आलो ? याची त्याला जाणीव होऊन तो बराच तयार झाला होता, मनाने व शरीराने सुद्धा. तो त्याच्या टीम सोबत कॅम्प 4 वर पोचला बरीच लोकांनी स्वतःची हालत समजून माघार घेतली, राहिल्याचा आता शेवट जवळ आला होता, म्हणजे हिमालयाचा शेवट नजरेत दिसताना, सर्वकाही त्यांच्या मर्जीने सुरू होत, नाही नाही सर्व काही ह्या पर्वताच्या मर्जीने होत आहे हे सर्वांना समजले, हिमालय आपल्याला जवळ कोणाला बोलावयाचे व कोणाला नाकारायचे हे स्वतः ठरवतो. आज तो बेयर खुश होता सहा महिने तळ ठोकून तो हिमालय सर करणारा सर्वात तरुण व्यक्ती होणार होता सर्वात प्रथम 9 मे 1953 मध्ये एडमंड हिलरी व शेर्पा तेनसिंग यांनी ही कामगिरी केलेली.
सर्वात घातक डेथ झोनजवळ येताच त्यांचा 24 महिन्यापासून बर्फात मृत्युमुखी पडलेली कित्येक शरीर दिसत होतीत अगदी जशीच्या तशी, कोणी अर्धवट गाडलेली तर कोणी बर्फात पूर्णतः पडलेली. खरच हिमालय दिसताना जितका लोभसवाणा दिसतो तितकाच तो कठोर सुद्धा आहे. 
अखेरकार एका वेळी एक पाऊल टाकत बेयर एव्हरेस्टवीर झाला व त्याने तेथे त्याला स्पॉन्सर केलेल्या कंपनीचा व SAS चा झेंडा फडकवून डोळ्याच्या कडा नकळत ओळ्या केल्या.  

खूप मोठ्या पुस्तकातून भरपूर असे घेण्यासारखे आहे, त्यातील दोनच गोष्टी इथे मांडल्या, लेख लिहताना काही गोष्टी सुटल्या असतील तर क्षमस्व... 
@ शैलेश कदम

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know