लेखिका - जसविंदर संघेरा
अनुवाद - सुनंदा अमरापूरकर
प्रकाशन- मेहता पब्लिशिंग हाउस
किंमत- २५० रुपये/-
"शेम” या पुस्तकामध्ये इंग्लंडमध्ये जन्मलेल्या आणि वाढवलेल्या जसविंदर संघेरा या भारतीय मुलीचे आत्मचरित्र आहे. ही कथा सत्य असून याच्या मुळ लेखिका जसविंदर संघेरा असून त्याचा मराठी मध्ये अनुवाद सुनंदा अमरापूरकर यांनी केला आहे हि कहाणी भारतीय आणि पाश्चात्य संस्कृतींच्या संघर्षावर आधारित आहे.ब्रिटीश आशियाई महिलांवरील गुन्हेगारीसाठी सांस्कृतिक पद्धतींचा कसा वापर करतात हे जगाला सांगणे हा या पुस्तकाचा उद्देश आहे.
जसविंदरचा जन्म डर्बीमधील शीखच्या पारंपारिक घरात झाला होता. तिचे पालक पंजाबमधील परप्रवासी आहेत. त्यांच्या संस्कृतीनुसार पुरुष मुलांना प्रथम प्राधान्य दिले आहे तर महिलांना कुटुंबातील दुय्यम सदस्य मानले गेले. तिच्या घरच्यांना घराण्याची प्रतिष्ठा या गोष्टीचं मोल इतर कुठल्याही गोष्टी पेक्षा अगदी मुलींच्या जिवापेक्षाहि अधिक वाटत होत .
इंग्लंडमध्ये जेथे ती मोठी झाली, जसविंदरने तिच्या शाळेतून परदेशी कल्पना आणि वैशिष्ट्ये शिकली. वयाच्या १४ व्या वर्षी जस्सीला तिच्यासाठी निवडलेल्या नवऱ्याचा फोटो दाखवला ती घाबरली.आपल्या थोरल्या बहिणीचे लग्न करून झालेला छळ तिने पाहिलं होत .
जस्सीला लग्न न्हवत करायचं म्हणून ती घरातून पळून जाते इथून पुढे तिच्या आयुष्यातला प्रवास खूप कठीण होतो खूप वाईट परिस्थिती येते त्याला ती कशी सामोरी जाते , आत्मसन्मानासाठी , एक चांगल मनासारखं जीवन जगण्यासाठीची संघर्ष करणारी कहाणी आहे.
या पुस्तकामधला एक परिच्छेद -
" या डर्बीच्या रस्त्यावरून आम्ही चालू शकत नाही. तु पळून गेल्यामुळे, हे होत आहे. गुरूद्वारात जाणं तर बंदच झालय. लोक उघड बोलतात. तुझ्यामुळे लोक थूंकतात माझ्या तोंडावर !"काही सेकंद आईचा आवाज थांबला. मला वाटल .झाल वाटत हीच बोलून, पण ती केवळ आवंढा गिळन्यासाठी थांबलेली होती." मेले घराण्याचा नाश केलास... भोगशिल आपल्या कर्माची फळं! बघत रहा.तु आणि तो तुझा चांभांरडा यार, गटारात लोळाल.. तीच लायकी आहे तुमची...!! आयुष्यात काही काही मिळणार नाही तुम्हाला. ऐकतीयेस ना? जेव्हा तुला मुलगी होइल आणि ती अस छिनालपणाने वागेल तेव्हा कळले तुला, की असल्या वेश्येला जन्म देऊन वाढवल्यावर काय वाटतं ते!!!"
नक्की वाचा..
Gaytri Jadhav
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know