. लेखक -केनेथ ब्लॅन्चर्ड
स्पेन्सर जाॅन्सन
अनुवाद - प्रा. विनय बोरीकर
मनुष्यबळाच व्यवस्थापन हे इतर व्यवस्थापनाचे मानाने गुंतागुंतीच असतं ;कारण त्यात माणसांच्या मानसिकतेचा ,त्यांच्या भावभावनांचा ,विविध स्थितीला मिळत असलेल्या प्रतिसादांचा प्रभाव पडत असतो. या पुस्तकात लेखकव्दयांनी याबद्दल सुलभ तंत्र सांगितले आहे.
एक युवक प्रभावी व्यवस्थापकाच्या शोधात होता. छोट्या मोठ्या अत्याधुनिक-जुनाट ,वैभवशाली -किरकोळ प्रकारच्या विविध क्षेत्रातील , कार्यालयातील व्यवस्थापकांना तो भेटला ,काहींनी गुपित सांगायला नकार दिला, काहींनी मी कसा चांगला ,, मी लोकशाहीवादी ,सर्वांचा सहभाग घेणारा,मी पाठबळ देणारा ,मी विवेकी,मी विचारी असे सांगणारेच भेटले.आपल्याला खरा प्रभावी व्यवस्थापक कसा घडतो हे कधीच कळणार नाही असे त्याला वाटत असतांनाच,एका विशेष व्यवस्थापकाबद्दल त्याला कळले. त्यांच्याबरोबर काम करणारे आनंदी ,उत्साही असतात त्यामुळे चांगले परिणाम ही मिळतात अशा व्यवस्थापकांला भेटून ,त्यांचं गुपित जाणून घ्यायचं त्यांनी ठरवलं . त्यावेळी त्याने जे सांगितले ते म्हणजे हे पुस्तक .
मी वन मिनिट मॅनेजर आहे.अशी ओळख त्याने स्वतः:ची करुन दिली . अर्थ असा की, आपल्या कर्मचाऱ्यांकडून अतिशय थोड्यावेळात आणि दर्जेदार काम करुन घेतो.
एक मिनिट हे व्यवस्थापनाचे प्रतिक आहे. या व्यवस्थापनाच्या यशाची तीन रहस्ये आहेत.
१)एका मिनिटांचे उद्दिष्ट
२)एका मिनिटांची प्रशंसा
३)एक मिनिटांचा ठपका
. आपल्या बरोबर काम करणाऱ्याला एक मिनिटात उद्दिष्ट आखून द्या;चांगलं काम केलं तेव्हाच एकाच मिनिटांची प्रशंसा करा ;चुकलं तर एकाच मिनिटांचा ठपका ठेवा.मात्र व्यक्ती म्हणून त्यांचा आदर कायम ठेवा हे या पुस्तकाचे सूत्र आहे.
एक मिनिटात उद्दिष्ट म्हणजे ठरविलेल्या उद्दिष्टांची सहमत असण ,आपली उद्दिष्ट थोडक्यात लिहून काढण ,पुन्हापुन्हा वाचणं , दिवसभरात एक मिनिटात कामाचा आढावा घेणं ,उद्दिष्टानुरुप आपलं वागणं होत किंवा नाही ते बघण .
कामावरील या लोकांची प्रशंसा करण्यास उशीर करु नका .स्पष्ट शब्दात कोणत्या कामासाठी प्रशंसा होतेय ते सांगा ,चांगल्या कामासाठी उत्तेजन द्या.यशाबद्दल हस्तांदोलन करा,पाठीवर थाप मारा.
लोकांचे दोष त्वरित दाखवा आणि ठपका ठेवला.काय चुकले हे नेमकेपणाने नि स्पष्ट सांगा. ते आपल्यासाठी किती महत्वाचे आहेत तेही त्यांना कळू द्या.एकदा ठपका ठेवण संपलं ,की,ते सगळं संपलं याची जाणीव ठेवा..
ही तीन रहस्ये अनेक उदाहरणांनी, स्वतः:जवळच्या अनुभवांनी,आपल्या सहकाऱ्यांच्या चर्चेतून पटवून दिले.सांगितले. युवकाने हे सगळं आत्मसात करुन त्याप्रमाणे काम केल्यावर त्याला वन मिनिट मॅनेजरच महत्त्व त्याला कळलं.
अनेक वर्षांनी जेव्हा युवकांनी हे सगळं आठवलं आणि स्वतः:घ्या कार्याचा आढावा घेतला तेव्हा तो वनमिनिट मॅनेजर झालाय हे लक्षात आलं. एक व्यक्ती आणि मॅनेजर म्हणून तो समाधानी होता. त्यांनी घेतलेल्या नोंदी आणि टिपण पुस्तकरुपान छापली नि अनेकांना भेट दिली.
पुस्तकाचा खास वैशिष्ट्य असं की, अमेरिका ,जपान मधील बहूतेक सर्व उद्योजकांनी आपल्या व्यवस्थापकांना हे पुस्तक वाचणं सक्तीचं केलं आहे.
हे छोटंसं १११ पानाच परिणामकारक ,यश संपत्ती आणि फायदे मिळवून देणार ,साकेत प्रकाशनाच ,१००रु. किंमतीची पुस्तक नक्की वाचू या.
कल्पना कोलारकर.
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know