Thursday, June 17, 2021

द_5_ए_एम_क्लब भाग 1

#द_5_ए_एम_क्लब

                       लेखक : राँबिन शर्मा
                   प्रकाशक : जयको पब्लिकेशन

लेखमाला : भाग पहिला

लेखकाविषयी:
राँबिन शर्मा हे मूळचे भारतीय वंशाचे आणि कँनडात सेटल झालेले मोटिव्हेशनल स्पीकर ,लीडरशीप कोच आणि अनेक कंपन्या, अब्जाधीश, खेळाडू यांचे ते मार्गदर्शक आहेत.
वयाच्या 25 व्या वर्षापर्यंत ते वकीली करत होते पण त्यात ते खुश नव्हते 
त्यानंतर त्यांनी Megaliving हे ताणतणाव व्यवस्थापन हयावर पुस्तक लिहिले आणि स्वतःच प्रकाशित केले
पण खरी प्रसिद्धी त्यांना The monk who sold his Ferrari हया पुस्तकाच्या सिरीज मुळे मिळाली. ते पुस्तक अत्यंत गाजले आणि ते बेस्टसेलर लेखक झाले तसेच जगभरात त्यांच्या पुस्तकांचे भाषांतरही झाले

पुस्तकाविषयी
पहाटेला आपलेसे करून आपल्या जीवनाला कसे समृद्ध करायचे हयाबाबत हया पुस्तकात सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले आहे.
एक नैराश्याचे अंतिम टोक गाठलेली उद्योजिका आणि आयुष्याचा सूर हरवलेला चित्रकार हया दोघांनी एक शिबीराला हजेरी लावली तिथे त्यांची भेट एक अवलिया बेफिकीर फकीराशी झाली.
पुढे तोच अजागळ फकीर अब्जाधीश रिले असल्याचे त्यांना कळले. त्याने दोघांना 5 Am क्लबचे मेंबर करून घेतले आणि त्यांना दररोज पहाटे पाच वाजता 
माँरिशस, भारत, रोम, इटली, ब्राझील, साऊथ आफ्रिका अशा विविध ठिकाणी
मार्गदर्शन केले. पुढे त्या दोघांनी लग्नही केले आणि दोघेही आपआपल्या क्षेत्रात यशस्वी झाले 
ते जीवन बदलवणारे मार्गदर्शन काय आहे हे आपल्याला  लेखमालेतून पुढील काही भागातून शिकायला मिळेल.

भाग पहिला समाप्त
Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know