लेखक : राँबिन शर्मा
प्रकाशक : जयको पब्लिकेशन
लेखमाला : भाग दुसरा
#पहाटे_पाच_वाजताच_का_उठायचे ?
➡️ लवकर निजे लवकर उठे त्यासी आरोग्य संपदा लाभे हया उक्तीनुसार माणसाला निरोगी शरीर लाभते तसेच माणूस दीर्घायुषी होतो.
➡️ पहाटेच्या शांत निरामय वातावरणात मन लवकर एकाग्र होते आणि एकाग्र मनाने केलेली कामे यशस्वी होतात.
➡️ पहाटेचा एकांत शांत वातावरण मेंदूच्या लहरी परिवर्तन करण्यास उपयुक्त ठरतो.
➡️ पहाटेच्या वेळी मन निशेष आणि रिक्त असते त्यामुळे मनाच्या ग्रहणशक्तीला मर्यादा नसतात त्यामुळे नव्या गोष्टी लवकर आत्मसात केल्या जातात.
➡️ पहाट ही सृजनशील प्रतिभेसाठी नवी संधी व समृद्धता देते.
➡️ पहाटे उठल्याने मिळणारी मनशांती आपला संपूर्ण दिवस आनंदात घालवते.
➡️ पहाटे उठून कामाला लवकर केलेली सुरुवात वेळेचा सुयोग्य वापर करायला शिकवते.
➡️ पहाटे उठल्याने आपली उर्जा दुप्पट आणि उत्पादकता तिप्पट वाढते.
➡️ पहाटे उठल्याने मनशांती भेटते त्यामुळे मन-शरीर-बुद्धी यात लयबद्धता साधता येते आणि त्यातून जीवन सुंदर बनते
➡️ पहाटेची वेळ माणसाला आत्मज्ञानी बनायला मदत करते.
➡️ पहाटे उठणारी माणसे जास्त सकारात्मक ,जास्त जबाबदार, जास्त कर्तृत्ववान होतात.
➡️ पहाटेच्या वेळेचा वापर करून माणूस आपल्या आतील उर्जेला चैतन्याला मुक्त करतो आणि त्यामार्फत आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणतो.
➡️ पहाटे आपण आपल्या अंतरगातील मनोवस्था ,ह्रदयावस्था, आरोग्यावस्था, आत्मिकावस्था हया चारही अवस्थांवर विजय मिळवून लवचिक मन, सकारात्मक भावना निरोगी देहयष्टी, आत्मिकज्ञान प्राप्त करू शकतो.
#पहाटे_उठताना_येणाऱ्या_अडचणी
➡️ उशिरापर्यंत जागायची सवय
➡️ रात्रीचे उशिरा घेतलेले जड जेवण आणि कँफेनयुक्त पदार्थ
➡️ सोशल मिडीयाचा अतिवापर
➡️ उशिरापर्यंत चालणारे चँट
➡️ रात्रीची निष्फळ संभाषणे
➡️ उशिरापर्यंत बातम्या ,बाष्कळ मालिका टीव्ही पाहणे
➡️ पहाटे उठून काय करायचे याचे ध्येय नसणे.
➡️ अलार्मची सवय नसणे
➡️ बेजबाबदारपणा
➡️ क्षुद्र आणि सामान्य विचार
➡️ स्वतःच्या विकासाला प्राधान्य नसणे
Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know