#द_पाँवर_आँफ_युअर_सबकाँन्शस_माइंड
(अंतर्मनाची शक्ती)
लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
अनुवाद : संकेत कोरडे
प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन
लेखमाला भाग १
लेखकाविषयी
जोसेफ मर्फी हे मूळचे आयरिश ,वडील कँथाँलिक विचारांचे
लहानपणापासून जोसेफ स्वतंत्र विचारांचे त्यामुळे जुनाट विचारांचा त्याग करण्यासाठी आयर्लंड मधून अमेरिकेत गेले.
काही काळ फार्मासिस्टचे काम केल्यानंतर दुसऱ्या महायुद्धात अमेरिकन सैन्यात त्यांनी फार्मासिस्ट म्हणून भाग घेतला.
त्यानंतर त्यांचा धार्मिकतेकडे ओढा आणखीनच वाढला
दैवी शक्तीचा आणि धर्माचा अभ्यास करण्यासाठी ते भारतात काही वर्षे राहिले.हिंदू धर्माच्या महान शिकवणीचा त्यांच्यावर पगडा राहिला. बरेच वर्षे त्यांनी चर्चसाठी काम केले. मानसशास्त्रात पीएचडी घेतली. हिलींग द्वारे कित्येक लोकांच्या आयुष्यात आमूलाग्र बदल केला . त्यांच्या नव्या विचारांची वादळे जगभर पसरली. त्यांचे द पाँवर आँफ युअर सबकाँन्शस माइंड
हे 1963 साली लिहिलेले बेस्ट सेलर पुस्तक ठरले.
आजही आणि अजूनही कित्येकांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश
पसरवणारे ते ज्ञानदीप ठरते आहे.
मानवी मनाचे कंगोरे हया पुस्तकातून आपल्याला पाहायला मिळतात. कितीतरी स्वानुभवांनी सजलेले हे वाचनीय पुस्तक आपल्यापर्यंत सारांशरूपाने लेखमालेत सादर करण्याचा मानस
माणसाच्या मनाचे दोन भाग असतात
1.बाहयमन
( याला वस्तुनिष्ठ मन, जागृत मन, स्वैच्छिक मन, संज्ञ मन
असेही म्हटले जाते )
2.अंतर्मन
(याला व्यक्तीनिष्ठ मन, सुप्त मन, अनैच्छिक मन , अर्धसंज्ञ मन असेही म्हटले जाते )
#बाहयमन
एखाद्या जहाजाच्या कप्तानाप्रमाणे असते जे
पंचेद्रियाच्या आधारे निरीक्षण करते.
त्यावर विचार करते, तर्काच्या आधारावर निर्णय घेते,
आपला मार्ग ठरवते. आणि त्यानंतर आपले विचार अंतर्मनाला पाठवते आणि तिथून आपल्या धारणा (Belief) , संस्कार ,वागणे ,सवयी बनतात
#अंतर्मन
ते एखाद्या आज्ञाधारी मुलासारखे असते जे बाहयमनातून आलेला विचार ,आदेश जशाच्या तसा स्वीकारते
ते स्वतः ज्ञानाचा भांडार असते
पण तरीही ते कुठलाही वाद न घालता,कुठलाही तर्क न लढवता
बाहयमनाचे ऐकत असते.
जणू ते बाहयमनाचे गुलाम असते
अंतर्मनाला सभोवतालच्या परिस्थितीची सहसा जाणीव नसते.
अंतर्मनाला काही जण माणसाचा आत्मा देखील संबोधतात कारण सा-या अनैच्छिक क्रिया जसे की पचनक्रिया, ह्रदय क्रिया, श्वासोच्छ्वास बिनबोभाट 24×7 ते घडवून आणतं असते.
अंतर्मन भावना,विचार, स्मृती यांच्या सहाय्याने अंतस्फूर्तीने सगळ्या घटना विचारांचा अर्थ लावते.
अंतर्मन अर्थात आत्मा हा परमात्म्याचाच अंश आहे त्यामुळे तो प्रचंड शक्तीचा स्त्रोत आहे.
जसे आपले बाहयमन...तसेच आपले अंतर्मन असते
जर बाहयमन सुसंस्कृत, सर्जनशील, विकासाचे विचार करणारे असेल तर अंतर्मन ही तसेच होते
#सूचनांचा_स्वीकार
सूचनांमध्ये प्रचंड ताकद असते त्या एखाद्याला आजारातून बरे करू शकतात, प्रेरित करू शकतात, उत्थान करू शकतात, आशीर्वाद देऊ शकतात
1️⃣स्वयंसूचना
🔰 ऐच्छिक स्वयंसूचना
स्वतः ला निश्चित आणि विशिष्ट गोष्टी ठामपणे सांगणे म्हणजे स्वयंसूचना.
बाहयमनाला आपण स्वतः केलेली सूचना त्याने स्वीकारली की ते अंतर्मनात पाठवते
आणि मग अंतर्मन त्यानुसार कार्य करते.
📛 अनैच्छिक स्वयंसूचना:
माणसाच्या मनातील भीतीची तीव्रता वाढली की अंतर्मनावर त्या प्रकारच्या विचारांचे संस्कार अजाणतेपणी होतात
यालाच अनैच्छिक स्वयंसूचना म्हणतात.
अशा प्रकारच्या नकारात्मक सूचनांमुळे माणूस स्वतः चे नुकसान करून घेतो
ही प्रक्रिया उलटवण्यासाठी दिवसातून तीनदा (झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर,ध्यान करताना ) सकारात्मक स्वयंसूचना मन स्थिर करून द्याव्यात.
2️⃣ बाहयसूचना
धार्मिक, राजकीय लोकांनी तसेच आपल्या संस्कृती ,परंपरेने चालत आलेल्या प्रथा,
तसेच आईवडिलांनी शिक्षकांनी, संस्काराच्या नावाखाली केलेल्या सूचनांना आपण बाहय सूचना म्हणू शकतो.
हया सूचना बर्याचदा सांगणारा ज्येष्ठ ज्ञानी आहे असा विचार करून बाहयमन त्यावर कुठलाही विचार न करता आपल्या अंतर्मनाकडे पाठवलेल्या असतात. हयातून अनेकदा नकारात्मक धारणा निर्माण होतात.
अपूर्ण
Source :- Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know