(अंतर्मनाची शक्ती)
लेखक : डॉ. जोसेफ मर्फी
प्रकाशक : मंजुळ पब्लिकेशन
लेखमाला - भाग दुसरा
#आत्मशक्ती
आपले अंतर्मन हे अमाप ज्ञानाचे आणि शक्तीचे भांडार आहे,
सर्वव्यापी ईश्वराशी ते जोडलेले असते.
आपले अंतर्मन सर्व इच्छांचे उगमस्थान आहे,
आणि त्या इच्छा अपूर्ण राहिल्या की माणसाला विफलता जाणवते.
आणि त्या पूर्ण झाल्या की सफलता भेटते.
अंतर्मनाला स्थळकाळाचे कुठलेही बंधन नाही.
अंतर्मनाची दिव्य प्रज्ञाशक्ती आहे त्यामुळे ते प्रेरणास्थान आहे,
अंतर्मन मार्गदर्शकाचे काम करून माणसाला दुःख विवंचनेत मुक्त करू शकते. तसेच त्याला पडलेल्या जटिल प्रश्नांची उत्तरे देऊ शकते आणि कित्येक शोध शास्त्रज्ञांना अंतर्मनाच्या शक्तीमुळेच लागलेत.
माणसाला स्वास्थ्य, शांती,आनंद सुखाची अनुभूती अंतर्मनच देऊ शकते. पण त्यासाठी अंतर्मन आणि बाहयमन हयांचा परस्पर सुसंवाद असावा लागतो आणि तो घडवून आणण्यासाठी जीवनशाली विचारांनी अंतर्मनाचे पोषण करावे लागते.
शरीर शिथील करून अंतर्मनाशी संवाद साधावा लागतो.
आणि हेही लक्षात घ्यायला हवे की अंतर्मनाकडून इच्छित कार्य करवून घेण्यासाठी आपले विचार नेहमी सत्य, सकारात्मक, न्यायपूर्ण,सहज आणि सुसंवादी असावे लागतात.
माणसाचा ठाम विश्वास आणि अतूट श्रद्धाही हयात महत्त्वाची भूमिका पार पाडतात.
#मानसोपचार
आपल्या अंतर्मनाची उपचारशक्ती वापरून कुठलेही रोग ठीक होऊ शकतात मग तो शारीरिक असो, मानसिक असो किंवा मनोकायिक आजार असो अंतर्मन त्यातून माणसाला कुठल्याही खर्चाशिवाय ठीक करु शकते.
प्राचीन काळी लोक अंतर्मनाच्या शक्तीबद्दल अनभिज्ञ असायची पण ईश्वरावर त्यांची अतूट श्रद्धा होती.
त्यामुळे ईश्वराची मनोभावे प्रार्थना, नैवेद्य, मंतरलेले ताईत,गंडेदोरे,सिद्ध अंगठ्या, प्रतिमा, भस्म हयांच्या मार्फत रोग्याच्या अंतर्मनातील उपचारशक्ती मुक्त करून रोग बरे केले जायचे.
माणसाचा ठाम विश्वास त्याच्यात काहीतरी चमत्कार घडेल अशी
श्रद्धा निर्माण करते आणि त्या अढळ श्रद्धेमुळे अंतर्मन विश्वासाला प्रतिसाद देते आणि आपली उपचारशक्ती माणसाला बरे करते.
गावोगावी बाबाभगत हे उपचार वापरून रोग्याला वापरून नीट करत.
आधुनिक काळात बाबाभगत हयांची जागा वैद्य ,डाँक्टर यांनी घेतली आणि तेसुध्दा संमोहन, हिलींग अशा उपायांनी माणसाच्या उपचारशक्तीला प्रवाही करतो आणि रोगी ठीक होतात.
#प्रार्थनोपचार
ईश्वराची प्रार्थना करून सजगपणे रोगमुक्त झाल्याची मानसप्रतिमा निवडायची आणि ती खरी झालीय असे अंतर्मनावर बिंबवायचे.
जसजशी हया मानसिक कल्पनेवर निष्ठा वाढते तशी प्रार्थना फलद्रूप होते.
हयात मुख्यत्वेकरून सकारात्मक दृष्टिकोन
बाहयमन आणि अंतर्मन यात ताळमेळ घडवून आणतो आणि अंतर्मनाच्या उपचार शक्तीला जागृत करतो आणि रोगी बरा होतो.
#आस्थोपचार
आस्था म्हणजे बाहयमन आणि अंतर्मन यांच्या परस्पर क्रियेचे ज्ञान
हयात माणसाला संताचे फोटो, पादुका, अस्थी, ताईत देतात .ते शरीरावर लावले की रोग बरे होतात असा रोग्याचा प्रामाणिक विश्वासच त्याला भय,चिंतेकडून आशेकडे, सकारात्मकतेकडे नेतात आणि ते बरे होतात.
1️⃣वैयक्तीक आस्था (संमोहन उपचार)
हयात आजारी माणसाचे शरीर शिथिल करायला सांगून शरीराला निद्रावस्थेत नेले जाते ,बाहयमन शांत करून ठेवून डॉक्टर सूचना थेट रोग्याच्या अंतर्मनात पोहचवतो.
आणि त्याद्वारे रोगी बरा होतो.
2️⃣परस्पर उपचार (प्रार्थना उपचार)
हयात रोगी प्रत्यक्ष हजारो मैल दूरवर असला तरी रोग्याचे नातेवाईक त्याला आजारातून ठीक करू शकतात.
त्यासाठी रोग्याचा नातेवाईक ईश्वराची प्रार्थना करतो आणि स्वतःच्या मानसिकतेत स्वास्थ्य आणि सुसंवादाची आंतरिक जाणीव निर्माण करतो आणि ती अंतर्यामी जाणीव रोग्याच्या अंतर्मनात पोहचते आणि तो बरा होतो
हयात अंतर्मनाचा ईश्वरीय संबंध आणि त्याला स्थळकाळाचे नसलेले बंधन हया नियमांचा वापर केला जातो.
Source :- Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know