लेखक - डॉ. डेव्हिड जोसेफ श्वार्त्झ
अनुवाद - प्रशांत तळणीकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस
लेखमाला -भाग तिसरा
आधीच्या भागात आपण भव्य विचार कसा करायचा ते बोलत होतो हया भागात त्या विषयालाच पुढे नेऊयात
भव्य विचार कसा करायचा
#ध्येयनिश्चिती
ध्येय म्हणजे काय साध्य करायचयं याचा ठाम सुस्पष्ट पवित्रा.
ध्येयाविना माणूस भरकटतो आणि यशापासून दुरावतो त्यासाठी
➖ आपली पाच- दहा वर्षानंतरची प्रतिमा आपल्या डोळयासमोर स्पष्ट हवी
➖ काम,घर,कुटुंब हया तिन्ही विभागातली पुढील पाच किंवा दहा वर्षांची ध्येय निश्चित आखलेली असावी
➖नोकरी/व्यवसायातील आपले अपेक्षित उत्पन्न, जबाबदारी, अधिकार, प्रतिष्ठा याबाबत ध्येय ठरवावीत
➖ कुटुंबाबाबत आपले राहणीमान, आपले घर, आर्थिक पाठबळ ,
Holiday & Vacation Plan हयाबाबत
आपली ध्येय ठरवावी
➖सामाजिक ध्येय ठरवताना आपण कुठले सामाजिक कार्य करणार,कुठल्या समाजघटकांसाठी , कुठली जबाबदारी,
आपले सोबती मित्र आणि सहकारी ही ध्येय निश्चित करावी.
➖आपल्या स्वप्नांना चिरडून टाकणार्या स्व-अवमूल्यन, comfort zone,स्पर्धा, पालकांचा दबाव,कौटुंबिक जबाबदारी
हया सा-यांना टाळून आपल्या इच्छांसाठी जगा
➖आपल्या इच्छांना उर्जा, उत्साहाचे पाठबळ द्या ,त्यासाठी कष्ट उपसण्याची तयारी ठेवा,त्यासाठी सुप्त मनाची मदत घ्या
➖प्रत्येक ध्येयाला अंतिम तारीख निश्चित करावी पण दुर्दैवाने समजा त्या तारखेला पूर्ण नाही झाली तर पुन्हा वेळ वाढवून द्यावा पण ध्येय सोडून देऊ नये
➖आपण जे करतोय ते यशाच्या दिशेने पडणारी पाऊले आहेत का याचे मूल्यमापन करा
➖ध्येयांचे रूपांतर छोट्या छोट्या टप्प्यांमध्ये करून पुढे जात रहा
➖ स्वतःच्या नकारात्मक सवयींना ध्येयाच्या वाटेत अडसर बनू देऊ नका
➖ध्येयाच्या वाटेवर असंख्य वळण,अडथळे येतील पण तुम्ही न डगमगता चालत राहा, माघारी परतण्याचा पर्यायच ठेवू नका.
➖ पर्यायी योजना तयार ठेवा
➖सतत स्वतः मध्ये गुंतवणूक करत रहा
नवनवीन गोष्टी शिकत राहा
कार्यक्षेत्रातील नवनवे कोर्स ,वेबिनार, चर्चासत्रे यांना जात रहा
➖वेळ मिळेल तसे प्रेरणादायी पुस्तक आणि महापुरुषांची चरित्रे वाचत रहा
➖नियतकालिकांच्या साहाय्याने उत्तम विचारवंताचे लेख वाचून स्वतःला कायम प्रेरित करत रहा
➖टंगळमंगळ, चकाट्या पिटणे , टाईमपास ही ध्येयरहित माणसाची लक्षणे समजा
#कृतीशीलता
योग्यता, बुद्धिमत्ता, वैचारिक पात्रता असूनही माणसे यशस्वी होत नाही कारण ती कृतीशील नसतात
➖चांगल्या कल्पना त्यांच्याकडे असतात पण गोष्टी अमलात आणण्याऐवजी लांबणीवर टाकतात (Procrastinate)
परिस्थिती 100% अनुकूल व्हायची वाट पाहत राहतात. विनाकारण भीती बाळगून कृतीच करत नाही त्यामुळे
➖कल्पना योग्य वाटली की लगेचच अंमलात आणा... शुभस्य शीघ्रम
➖अतिपूर्वतयारीची विषारी सवय सोडा
➖ मनात प्रेरणा नाही म्हणून चालढकल करू नका
➖ त्यागाची तयारी ठेवा
➖ लोक काय म्हणतील ,आपल्याला जमेल का याचा विचारच करू नका
➖ ज्याला आपण काय करतोय हे पक्के ठाऊक असते त्याच्यावरच लोक विश्वास ठेवतात
➖ भविष्यात येणारे अडथळे गृहीत धरून नियोजन करा,समस्या जशा सामो-या येतील तसे त्यांचे निराकरण करण्याची क्षमता विकसित करा
➖ कल्पना आपल्या कार्यक्षेत्रातील जाणकारांसमोर मांडा, त्यांचे सल्ले मागा
➖ पुढाकार घ्या
➖जर एखादे काम त्यात नावडते असेल तर ते यांत्रिकपणे करा
➖अपयश फक्त मनाची अवस्था आहे तिचा स्वीकार करा,चुकांचे योग्य विश्लेषण करा, त्यांना दुरूस्त करून पुन्हा प्रयत्न करा
➖नशीबाला बोल लावणे आणि अपयशाचे खापर दुस-याच्या माथी फोडणं
असले प्रकार टाळा
➖यशस्वी लोक अपयश आले तरी नाउमेद न होता उसळून पुन्हा उभे राहतात, परिस्थितीशी लढा देऊन कष्ट,जिद्द आणि चिकाटीने साम्राज्य उभे करतात
➖सदैव प्रयत्नशील आणि प्रयोगशील राहा..मार्ग शोधला की सापडतोच यावर ठाम विश्वास ठेवा
➖ मंदीत संधी आणि अडचणीत आव्हान शोधायचा प्रयत्न करा.
जे होते ते चांगल्यासाठीच असा स्वच्छ दृष्टिकोन ठेवा.
➖स्वतःला अधूनमधून रिफ्रेश करत राहा आणि पुन्हा कामाला सुरुवात करा
Source :- Nilesh Shinde
No comments:
Post a Comment
IF you have any doubts,please let me know