WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

NEW ARRIVAL 2024-2025

* NEW ARRIVAL 2024-2025 * natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural
natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

Monday, May 17, 2021

लेखमाला -भाग दुसरा

#द_मँजिक_आँफ_थिंकीग_बिग
लेखक - डॉ. डेव्हिड जोसेफ श्‍वार्त्झ
अनुवाद - प्रशांत तळणीकर
प्रकाशन-मेहता पब्लिशिंग हाऊस

लेखमाला -भाग दुसरा

आधीच्या भागात आपण भव्य विचार करताना येणाऱ्या अडचणींबद्दल सविस्तर चर्चा केली हया भागात आपण भव्य विचार कसा करायचा हयावर बोलूयात.
जगात संकुचित विचार करणा-या लोकांची संख्या खूप जास्त आहे त्यामुळे भव्य विचार करून उत्तम कारकीर्द घडवायला खूप वाव आहे
आपल्या व्यक्तिमत्त्वात चांगल्या गोष्टी आहेत (शैक्षणिक पात्रता, कार्यानुभव, कौशल्य, कुटुंब, मानसिकता, नेतृत्व इ..) पण त्या असूनही आपण मागे राहिलो याचे कारण आहे भव्य विचारांचा अभाव

भव्य विचार करण्यासाठी
➖भव्य सकारात्मक मानसचित्र निर्माण करणार्या शब्दांचा वापर करून भव्य स्वप्ने पाहा 

➖आपले मित्र असो वा स्पर्धक, कुणाबद्दलही बोलताना प्रशंसा आणि चांगले सकारात्मक  बोलायचे (पाठीमागे कुचाळक्या नको)

➖उच्च ध्येय
आपल्याला काय करणं शक्य आहे आणि त्यासंबंधात भविष्यात काय करता येईल याचा विचार करून त्यासाठी कल्पनाशक्तीचा सुयोग्य वापर करून योजना तयार करा..

➖साहचर्य
भव्य आणि प्रगतीचा विचार करणार्या लोकांच्या सहवासात राहा 

➖उत्तम वक्तृत्व
चांगले भाषण देणारा वक्ता आणि चांगले संभाषण करणारे व्यक्ती व्हा ...त्यासाठी विषयावरील आपले ज्ञान आणि त्याची मांडणी याकडे लक्ष द्या... इतर गोष्टी जसे की वेशभूषा हातवारे, व्याकरण, आवाज हया दुय्यम गोष्टींचे दडपण घेऊ नका.

➖ सादरीकरण आणि दूरदृष्टी
कुठलीही योजना सहकारी कर्मचारी, गुंतवणूकदार हयाशिवाय यशस्वी होऊ शकत नाही त्यामुळे त्यांना ही कल्पना किंवा योजना सादर करताना त्यांना ती आवडेल आणि त्यांच्या डोळयासमोर चांगली प्रतिमा बनेल असे सकारात्मक शब्द वापरा आणि त्यांचे सहकार्य मिळवा

➖ सतत प्रगतीचा विचार
काम सोप्या पद्धतीने आणि मनपूर्वक करून सातत्याने प्रगतीपथावर रहा

➖ व्हँल्यू ग्रोथ
आपले प्राँडक्ट ,सहकारी, कर्मचारी आणि स्वतः मधील सर्वोत्तम क्षमतांचा विकास करून नवनव्या कल्पना राबवून त्यांची
किंमत कशी वाढेल याकडे लक्ष दया

➖ वादविवाद टाळा
कुठलाही वाद घालण्यापूर्वी वादाचे कारण इतके महत्त्वाचे आहे का असा प्रश्न आधी स्वतःला विचारा 
लोकांच्या किरकोळ चुकांकडे दुर्लक्ष करा
संकुचित विचार आणि वृथा अभिमान सोडा आणि परस्पर आदर आणि शांती आनंद समाधान वाढवा.

➖ सृजनशीलता
कुठलीही गोष्ट करण्याची नवनवीन आणि सुधारित पद्धत शोधून काढणे हयाला सृजनात्मक विचार म्हणतात आणि तो विचार जो करतो तो सर्जनशील असतो
आपली सृजनात्मकता वाढवण्यासाठी
1. आपल्या डायरीतून अशक्य हा शब्दच काढून टाका
2.एखादी गोष्ट आपण कमी पैशात, कमी श्रमात आणि आधिक चांगल्या पद्धतीने कशी करू शकतो हयावर विचार करा
3.नवनवीन ज्ञान घेत राहण्यासाठी  आपल्या कार्यक्षेत्रातील वेबिनार,चर्चासत्र, संमेलन यात भाग घ्या
3.कार्यक्षेत्रातील एखाद्या व्यावसायिक संस्थेचे सभासद व्हा 
4. विविध विषयात रस आणि गती असणाऱ्या माणसांची संगत ठेवा
5.मनाची क्षमता ताणून नवनवे पर्याय शोधा
सुचलेल्या कल्पना लिहून काढा त्यांची व्यवहार्यता तपासा
तिला उपयोगात आणण्यासाठी सुसंगत वाचन आणि अभ्यास करा
तरीही अडचणी येत असतील तर बुद्धिमान तज्ञ लोकांचा सल्ला घ्या.

➖ आत्मसन्मान
तुम्ही जे स्वतःला समजता तेच तुम्ही असता त्यामुळे आधी स्वतःच्या नजरेत स्वतःला उंचवा
स्वतःचा आत्मसन्मान वाढवण्यासाठी 
1.चांगली वेशभूषा माणसाबद्दल आदर विश्वास वाढवते 
त्यामुळे अद्ययावत फँशनचे शोभून दिसणारे कपडे घाला
2. स्वतःच्या कामाबद्दल चांगले विचार करा
3.उत्साही सकारात्मक विचार करा
4.स्वतःची जबाबदारी व्यवस्थित पार पाडणे
5.कंपनीच्या प्रगतीसाठी नवनवीन सूचना मांडणे
6.सकारात्मक स्वसंवाद
7.स्वतःच्या सर्वोत्तम गुणांची जाहिरात

➖ सभोवतालच्या वातावरणाचे व्यवस्थापन
आपल्या सभोवताली जसे लोक असतात तसेच आपले अनुकरण आणि तशाच आपल्या सवयी असतात
त्यामुळे आपले वातावरण बदलण्यासाठी
1.नवनव्या गटांमध्ये वावरा
विविध जात धर्म पक्ष आणि विचारसरणीच्या लोकांशी मैत्री करून सामाजिक वर्तुळ वाढवा ,नाण्याच्या दोन्ही बाजू समजून घ्या
अनुभवाच्या कक्षा रूंद करा.
2.विचारांच्या श्रीमंतीपेक्षा दिखाऊपणाच्या श्रीमंतीला जास्त महत्त्व देणा-या क्षुल्लक लोकांना स्वतः पासून दूर ठेवा आणि तुमच्या प्रगतीचे विचार करणारे तुमच्या सकारात्मक गोष्टींकडे पाहणारेच मित्रमैत्रिणी जोडा
3.विचारविष कालवणारे ,दुसऱ्या बद्दल नकारात्मक आणि अयोग्य विचारांच्या फालतू गप्पा करण्यात वेळ घालवू नका
4.सस्ती चीजो का शौक छोडो 
प्रत्येक गोष्टीत चांगल्याची कास धरा



Source :- Nilesh Shinde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know