Saturday, March 19, 2022

ब्राह्मोस

ब्राह्मोस

भारत रशिया मैत्रीतून निर्माण झालेलं अद्वितीय क्षेपणास्त्र...

रशिया युक्रेन ला भाजून काढत आहे.युक्रेन ची शहरं बेचिराख होताना दिसत आहेत.जगभरातून रशियावर टीकेचा भडिमार सुरू आहे.युरीपामेरिका मधून आर्थिक प्रतिबंध लावले जात आहेत...पण भारत मात्र तटस्थ आहे.भारताचा उलट रशियाशी तेल व्यवहार अधिक वाढला आहे...असे का? 

कारण भारत रशिया मैत्री!
भारतीय ब्रह्मपुत्र(Brahmaputra) आणि रशियन मोस्कोवा या नद्यांच्या नावावरून ठरवलेले हे नाव! भारतींना नद्या अतिशय पूज्य असतात .

ही मैत्री समजून घेण्यासाठी,भारताचे सामर्थ्य समजून घेण्यासाठी हे पुस्तक आपण निश्चित वाचलं पाहिजे.

ब्राह्मोस
अज्ञात वाटेवरील संशोधनाचे हे साहस म्हणजे, "आपण हे करू शकतो", असा आत्मविश्वास जागवणारा पहिलावहिला अनुभव!आत्मनिर्भर राष्ट्रनिर्मितीसाठी अन्य क्षेत्रांमध्येही उपयोगात आणता येईल असा हा प्रकल्प!या प्रकल्पाची त्याच्याच जनकाने म्हणजेच निर्माणकर्त्याने   सांगितलेली जन्म कथा! वेधक आणि तितकीच प्रेरक!

पुस्तक:ब्राह्मोस

लेखक:डॉ ए. शिवतनु पिल्लई

प्रस्तावना: डॉ APJ अब्दुल कलाम

मराठी अनुवाद: अभय सदावर्ते

प्रकाशन: राजहंस प्रकाशन

पृष्ठ:३२५ मूल्य:३७५/ सवलत मूल्य:३४०/ टपाल :४०/

एकूण:३८०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता, पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

मो:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

वरील क्रमांकावर फोन पे, गुगल पे आणि Paytm ची व्यवस्था आहे.कॅश ऑन डिलिव्हरी ची व्यवस्था नाही.बँक खात्याचे डिटेल्स व्हॉट्सअपवर मिळतील.

ब्राह्मोस
आपल्या लक्ष्यावर अचूक आघात करणारे! धोनी पेक्षा अधिक वेगाने जाणारे! जगातील सर्वात वेगवान क्रूज क्षेपणास्त्र!! या क्षेपणास्त्राचा विकास आणि निर्मितीचा भारत आणि रशिया यांच्या संयुक्त प्रयत्नातून साकारलेल्या प्रकल्प म्हणजे ब्राह्मोस!

ब्राह्मोस
जगातील सर्वोत्तम क्षेपणास्त्र! कोठूनही कोठेही दागता येईल असे! प्रचंड विध्वंसक आणि शक्तिशाली! ध्वनिपेक्षा वेगवान! स्वनातीत गती! 
मल्टी प्लेटफॉर्म:सागर,भूमी आणि आकाशातून उडवता येणारे
मल्टी टार्गेट:एकाच वेळी अनेक लक्ष्याचा वेध घेणारं
मल्टी रोल: विविध भूमिका निभावणारे
मल्टी ट्रॅजेक्टरी : एकच वेळी विविध मार्गाने प्रवास करणारे!

ब्राह्मोस म्हणजे आजच्या काळात ब्रह्मास्त्र जनु!

ब्राह्मोस
      आलेल्या अडथळ्यांवर मात करून निश्चित करण्यात आलेल्या लक्ष्याचा नाश करणारे, करोडो रुपयांचे परकीय चलन मिळून देणारे हे क्षेपणास्त्र!भारत आणि रशियाने मिळून तयार केलेलं आहे.या महाकाय संयुक्त प्रकल्पाचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) डॉ ए.शिवतनु पिल्लई यांनी लिहिलेला अतिशय समृध्द अशा माहितीचा खजिना म्हणजे हे पुस्तक!

ब्राह्मोस
या पुस्तकाचा विषय,पार्श्वभूमी, लेखक आणि त्यांच्या मागे असलेले सर्वोच्च नेतृत्व या सर्वच गोष्टींचा अवका इतका मोठा आहे, की त्यामुळे पुस्तक परिचयही मोठा होत आहे.

DRDO मध्ये क्षेपणास्त्र विकसन विभागाचे प्रमुख ए.शिवतनु पिल्लई हे या पुस्तकाचे लेखक!जे ब्रम्होस चे ही मुख्य कार्यकारी अधिकारी ! प्रखर राष्ट्रवादी!प्राचीन काळातील भारतातील वैज्ञानिक प्रगतीचा अभिमान!पण त्याच वेळी त्याचे शास्त्रीय पुरावे नसल्याची खंत! ब्रम्होस जगातील सर्वात प्रगत असे क्षेपणास्त्र! याचा ही असाच इतिहास होऊ नये म्हणून लिहिलेला ग्रंथ!हे पुस्तक म्हणजे या प्रकल्पाची तपशिलवार माहिती आहे.पुढील पिढ्यांसाठी!

४ डिसेंबर १९७१ ची रात्र!
कराची बंदरातील जहाजांवर अग्निचा वर्षाव होत होता!पाकिस्तान चे नौदल भाजून निघत होते. विमनरोधी तोफा डागल्या तरी पाकिस्तानी जहाजे ध्वस्त होत होती! कराची बंदरावर भारतीय क्षेपणास्त्र जणू दिवाळी साजरी करत होते!याचा बंदोबस्त करण्यासाठी अमेरिकेचा सातवा बेडा (आरमार) भारतच्या दिशेने निघाले होते.ज्यात जगातील सर्वात मोठी विमानवाहू नौका, अण्वस्त्र सज्ज असलेली नौका, अनेक इतर युद्ध नौका याच्या सोबत होत्या! एक लहान विमानवाहू नौका होती,जिच्यावर २० हेलिकॉप्टर आणि सैन्य होते....अनेक पाणबुड्या .भारतीय नौदलाचा पुरता खात्मा करण्याची तयारी करून निघालेला हा  सातवा बेडा भारतापर्यंत कधीच पोहचला नाही!कारण याच्या मार्गात सगरात उभा राहिला होता भारताचा मित्र रशिया!

साम्राज्यवादी चिन, इस्लामिक कट्टरवादी पाकिस्तान अशा शत्रूंच्या शेजारील आपला देश! १९६५ पर्यंत देशाच्या संरक्षण क्षेत्राकडे झालेले कमालीची दुर्लक्ष! चीनने केलेलं १९६२ चे आणि पाकिस्तान ने केलेले १९४८ आणि १९६५ चे आक्रमण! १९७१ मध्ये भारताने मिळवलेला विजय! बांगलादेश मुक्ती! रशियाचे १९९० ला झालेलं विघटन! अशा पार्श्वभूमीवर मैत्री काळाच्या आणि युद्धाच्या कसोटीवर खरी उतरली होती! त्या पुढे जाऊन नौदलाची गरज म्हणून प्रगत सुपरसाॅनिक  क्षेपणास्त्र  विकसित करण्याचा हा प्रोजेक्ट मैत्री अधिक बळकट करण्यासाठी दोन्ही देशांनी संयुक्तपणे राबवला.यशस्वीपणे विकसित केला!

१९७१ च्या युद्धात भारतीय नौदलाला भयानक रिस्क घेऊन लढावे लागले.भारतीय नौदल शत्रूच्या अगदी समीप जाऊन युद्ध करत होते.यातून नौदलासाठी आवश्यक असलेल्या क्षेपणास्त्राची गरज भासू लागली.त्यातूनच ब्रह्मोस प्रक्रिया डोक्यात आली होती...पण ती वास्तवात उतरण्यासाठी २००१ उजडावे लागले.ही अर्थातच राजकीय इच्छाशक्ती त्या काळात होती.डॉ अब्दुल कलाम हे वैज्ञानिक सल्लागार होते...आणि पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी!

हे पुस्तक मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या व्यक्तीनं लिहिलेलं असल्याने याच्यातील एकेक शब्द म्हणजे एकेक नोंद! अतिशय सुलभ मराठीत अनुवाद असलेलं हे धन समजावे,इतकी यात माहिती आहे.एकूण या प्रकल्पाच्या निर्मितीची कथा आणि कार्यक्रम वाचताना अभिमान वाटतो.या प्रकल्पाच्या सुरुवातीच्या वाटाघाटीत डॉ अब्दुल कलाम यांचे मोठे योगदान आहे.भारत आणि रशिया मध्ये झालेल्या कराराची ,त्या काळातील घटना घडामोडी यांची इत्यंभूत माहिती यातून मिळते.

ब्रह्मोस चे गुणवैशिष्टये वर लिहिलेले आहेतच...पण याच्या जन्मामुळे अनेक गोष्टी घडल्या.रशिया आणि भारत मैत्री अधिक घट्ट झाली.रशिया आयुध विक्रेता आणि भारत हा त्याचा मोठा ग्राहक होता...हे चित्र बदलले.रशिया आणि भारत या मुळे भागीदार झाले.सुरुवातीला दोन्ही देशांनी प्रत्येकी ३० हजार कोटी अमेरिकन डॉलर इतकी गुंतवणूक केलेला हा प्रकल्प आज अब्जावधी चां झाला आहे.

सुरुवातीला अतिशय मर्यादित गुंतवणूक! व्यावसायिक व्यवस्थापन, गतिशील निर्णय प्रक्रिया, अनोखी कार्य पद्धती आणि पारदर्शी प्रामाणिकता  यांच्या संयोगातून वास्तवात उतरलेले हे स्वप्न!

पाण्याखाली असलेली पाणबुडी,पाण्यावरील जहाज, जमिनीवर असलेले वाहन,आकाशातील विमान यापैकी कोणत्याही ठिकाणावरून हे दागले जावू शकते. सुपरसोनिक!हाइपर्सोनिक!! ही त्याची पुढील रूपे! Supersonic म्हणजे ध्वनी पेक्षा दुप्पट वेग! Hypersonic म्हणजे पेक्षा पाचपट वेग!

हे पुस्तक वाचत वाचत, भारत आणि रशिया यांच्या मधील मैत्री, परस्पर विश्वास आदी गोष्टींचं ही ज्ञान होत जाते.


No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know