Thursday, January 20, 2022

पुस्तकाचे नाव Mini Habits

पुस्तकाचे नाव Mini Habits
मूळ लेखक -  Stefan Guj
मराठी अनुवाद - विद्या अंबिके

सुरुवातीलाच सांगतो , हे पुस्तक मला जाम म्हणजे अगदी तुफान म्हणजे फार बेक्कार आवडलं आहे !
फक्त दीडशे पानांचे पुस्तक पण काल आणि आज मिळून वाचून टाकलय ...
SELF HELP या प्रकारात अनेक पुस्तकं आजवर वाचली आहेत ..अगदी You can Win , Rich Dad Poor Dad , How to Win Friends &  पासून ते Seven Habits Of Highly Effective People पर्यंत ! पण हे पुस्तक म्हणजे त्या सगळ्यांचा कळस आहे कळस !
सेव्हन habits वाचले तेव्हा भाषा खूप जड वाटली होती व ते Highly Effective शब्द म्हणजे खूप जड वाटले , पण बाकीचे जण बरेच वाचत होते म्हणून मी ही ते वाचले होते , पण आता काही ,काही लक्षात नाही , शप्पथ !
पण हे पुस्तक म्हणजे स्टीफन भाऊंचे स्वतःचे प्रांजळ कथन वा अनुभव आहेत ...काय होतं ना आपण सगळेच एकदम खूप मोठ्या गोष्टी वा ध्येये वगैरे च्या मागे लागतो व होत तर काहीच नाही !
स्टीफन ने मग या गोष्टीवर स्वतःच उपाय शोधला ...तो म्हणजे Mini Habits .. तो कसा तर रोज एकाच पुश अपस( Push Up ) काढायचा , रोज दहाच मिमिटे वाचायचे , पन्नासच शब्द लिहायचे ! व हे करणे खूप कमी वेळाचे व सोप्पे आहे त्यामुळे त्यात यश मिळाले तर आपला आत्मसन्मान ( SELF IMAGE ) वाढतेच , पण अपयश आले तरी फार काही वाईट वाटत नाही ...पण हीच सवय हळूहळू मात्र हवी हवीशी वाटून रोजच्या जीवनाचा भाग बनते ! किती सोप्पे आहे हे !
स्टीफन ने पुढे फार भारी मांडलंय ! ते असे की प्रेरणेने काम होण्यापेक्षा इच्छाशक्ती ने कामे सहज होतात (Will power is more useful than inspiration ) .प्रेरणा दीर्घकाळ टिकत नाही , पण रोज दहाच मिनिटे वाचन करायची इच्छाशक्ती ठेवली तर ती मात्र नक्कीच टिकेल ...
या छोट्या सवयी निर्माण करण्यातल्या स्टेप्स ही स्टीफन ने संगतवार व सोप्या मांडल्या आहेत ...
या पुस्तकात जागोजाग व्यायाम , वाचन , रोज थोडे लेखन ज्या गोष्टी स्टीफन ला आवडतात त्या त्याने मांडल्या आहेत , ज्या मलाही आवडतात , म्हणूनही हे पुस्तक मला खूप आवडले आहे ....
अर्थात हे खूप आवडल्याने रोज दहाच मिनिटे वाचण्याऐवजी मी जवळजवळ एकाच बैठकीत वाचून संपवले आहे ..
आपणही वाचा

आभार
रावजी लुटे
ज्ञानसाधना प्रकाशन
9421605019
यांच्या नेहमी मिळणाऱ्या पुस्तक परिचयाच्या Whatsapp मुळे असे काही अद्भुत वाचायला मिळते ..
आपणही वाचा हे पुस्तक !

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know