Friday, November 19, 2021

शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट

शिवाजी महाराज द ग्रेटेस्ट

ले.डॉ हेमंतराजे गायकवाड

छत्रपती शिवाजी महाराजांच्या कर्तुत्वाचा जागतिक कीर्तीच्या राजांसोबत केलेले तुलनात्मक अवलोकन!

वक्ते लेखक,व्याख्याते यांच्या दृष्टीने अतिशय मौलिक आणि उपयोगी संदर्भ ग्रंथ!

अलेक्झांडर, सीझर, नेपोलियन, रिचर्ड द लायन, विलियम वॉलेस, हनीबल, गस्टावस, अकबर, औरंगजेब अशा जगातील कसलेल्या सेनानी आणि सम्राटांशी तुलना केलेलं हे पुस्तक अतिशय महत्वाचे ठरते.

चौथी आवृत्ती नोव्हेंबर 2021

पृष्ठ संख्या:३१८

मूल्य:३५०/

सवलत मूल्य:३१५/ टपाल:३५/ एकूण:३४०/

खरेदीसाठी व्हॉट्सॲप करून नाव, पत्ता , पिनकोड आणि मोबाईल नंबर द्यावा.

मो:9421605019

रावजी लुटे यांचे ज्ञानसाधना पुस्तकालय परभणी

पार्श्वभूमी
इस्लामी आक्रमणे! अनन्वित अत्याचार आणि पाशवी नरसंहार!आत्यंतिक धर्मांधता आणि टोकाचा रानटीपणा! बाटलेल्या हिंदूंना स्वधर्मात येणारा बंद केलेला मार्ग आणि त्यांच्या द्वारे झालेला सत्तेचा विस्तार! स्त्री विषयक परस्पर विरुध्द धोरण!युद्ध संदर्भात भारतीयांचे पवित्र नीतिमूल्ये, शरणागताला मिळणारे अभय!भारतीयांच्या स्वभावात असलेला राष्ट्रीयत्वाचा अभाव! व्यक्तिगत पातळीवर उच्च चरित्र असलेल्या विद्वानांचे शून्य असलेले राष्ट्रीय कर्तुत्व! या सगळ्या पार्श्वूभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेल्या स्वराज्याचे महत्व लक्ष्यात घेतले पाहिजे. या पार्श्वभूमीवर महाराजांचे चरित्र अभ्यासले पाहिजे.या पहिल्याच प्रकरणात लेखक वाचकांची पकड घेतात!

•ग्रंथातील प्रत्येक वाक्य पाठ करावे,नोंदवून ठेवावे इतक्या उच्च दर्जाचे आहे.

•कोणतीही भिड भाड न ठेवता लिहिलेले!

•पानोपानी उच्च मूल्य असलेले जगभरातील अस्सल संदर्भ ग्रंथातून घेतलेले संदर्भ!

चीनची भिंत जी बांधण्यासाठी शेकडो वर्षे लागली.तिच्या निर्मितीसाठी कोट्यवधी लोकांना गुलाम केले गेलं आणि लाखो लोकांना त्याच भिंतीचा भाग बनवले...ते एक जगातील सर्वात लांब स्मशान बनले....या उलट शिवरायांनी निर्मिलेली गड किल्ले! या एका तुलनेत आपल्याला कार्यकर्तृत्वाचा अंदाज यावा!
प्रत्येक प्रकरण कोणत्या तरी मोठ्या संदर्भाने तुलना करून लिहिलेले आहे.त्याद्वारे शिवरायांचे विचार, त्यांचे धोरण अधोरेखित केलं आहे.जसे पिता शहाजी राजांनी स्वतःची मुद्रा फारशी मध्ये केली होती; पण शिवाजी महाराजांनी स्वतःची राजमुद्रा मात्र संस्कृत मध्ये केलेली होती..ती ही वयाच्या १७ व्या वर्षी! बालपणी विजापूर दरबारातून दिसलेली शिवरायांची स्वातंत्र्याची आणि स्वाभिमानाची तडफ ती पुढे स्वराज्याच्या निर्मितीत बदलली!

शिवाजी महाराजांनी अफजलखानचा कोथळा बाहेर काढला.हा प्रसंग लेखकाने डेव्हिड आणि गोलियत या इस्राएल आणि फिलिस्तिन युद्धातील प्रसंगाला आधी लिहून पुढे विस्तारला आहे.असे असले तरीही स्वतःच्या बायका पाण्यात बुडवून मारलेला हा अफजलखान धास्तावलेल्याचा ही लेखक संदर्भ देतो.त्याच्या शिक्यावर असलेला मजकूर हा मूर्तीभंजक असा होता हे लेखक मुद्दाम उल्लेख करतात. अशा अफजलखानाला शिवाजी महाराजांनी लोळवळे...पण त्यानंतर त्यांनी दाखवलेला मानवी मूल्यांचा आदर्श दाखवलेला!

जिंकणाऱ्या राजाने पराभूत प्रजेवर मनाला येतील तसे अत्याचार करण्याचा कालावधी असलेला तो काळ होता.जगभर असेच चित्र होते...पण हे हिंदू राजांच्या स्वभावातील गोष्ट नव्हती.मेगॅस्थेनीस याच्या ग्रंथाचा हवाला देतो आणि पुढे म्हणतो,"वंचक कौर्य व राक्षसी विध्वंसाच्या तांडवाने येथील हिंदु सत्ता पार कोलमडून पडली . ते शौर्यात कमी पडले नसून पशु वृत्तीत व राक्षसीपणात कमी पडले होते." उदा  घोरीला दिलेले जीवनदान!पण शिवाजी महाराजांनी अफजलखान ठरवून ठार मारला.

३०० वॉरियर्स नावाचा नावाचा सिनेमा अनेकांनी पहिला असेल.३०० सैन्याच्या मदतीने १ लाख सैन्यासह आलेल्या ग्रीकांना थोपवून धरणारे हे युद्ध! लियोनिडास राजाने थर्मोपिली येथील खिंडीत लढताना शत्रूचे २० हजार सैनिक कापून काढले...अफजलखानचा मुलगा फाजलखान आणि सिद्दी जौहर,त्याचा जावई सिद्दी मसूद चे आक्रमण ही गजापुर खिंडीत असेच मोडून काढले होते.तीनशे शिलेदारांनी पाच हजार शत्रू कापून काढला होता.

अशा विविध जगभरातील प्रसिद्ध लढाया आपण थोडा विचार केला तर लक्ष्यात येईल ह्या आपल्याकडे किती ही लढल्या आहेत...अशा सर्व प्रकारची तुलना या पुस्तकातून वाचताना स्वाभाविकपणे अधिक माहिती मिळते.आणि महत्व समजते.

एकूण: ३३ प्रकरणे आहेत. यातील प्रत्येक प्रकरण चिकित्सक वाचकाला,अभ्यासकाला आणि इतिहास प्रेमी साठी अधिक माहिती देणारे  ठरते.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know