Friday, November 19, 2021

पुस्तक*आपण जिंकू शकता

🙏नमस्कार ....🌹
✍️वाचन साखळी समूह...
✍️ पुस्तक*आपण जिंकू शकता*
✍️वैचारिक लेख संग्रह
✍️लेखक * शीव खेडा*
✍️परिचय कर्ता *संगीता वाईकर*
      कधी कधी असं होतं...आपण एखाद्या लेखन स्पर्धेत सहभागी होतो आणि त्यात एखादं बक्षीस म्हणून एखादं पुस्तक आपल्याला मिळतंआणि मग लक्षात येतं या पुस्तकात त्यातील शब्दात जबरदस्त ताकद आहे.जीवन अमुलाग्र बदलून टाकण्याची क्षमता आहे.
    शीव खेडा यांचे * आपण जिंकू शकता * हे पुस्तक असेच अगदी दमदार.नावातच सारं काही सामावलेले आहे. जिंकणे कोणाला आवडत नाही ? तसचं हे पुस्तक अगदी प्रत्येक जिंकण्याची इच्छा असलेल्या प्रत्येक व्यक्तीसाठी आहे .वाचा आणि जग जिंका.
      *आपण जिंकू शकता* या पुस्तकातील प्रत्येक वाक्य आणि वाक्य अतिशय महत्वाचे आहे.वाचा ,विचार करा आणि कृती करा .यश तुमच्याच हातात आहे एवढी खात्री यात आहे.
    या पुस्तकात एकूण आठ प्रकरणे आहेत.
१..महत्व दृष्टिकोनाचे
२...यश
३...प्रेरणा
४... आत्मप्रतिष्ठा
५... परस्पर संवाद
६...सुप्त मन आणि सवयी
७...ध्येय ठरवणे
८...नीतिमूल्ये आणि दूरदृष्टी
       या एकूण आठ प्रकरणात आहे जिंकण्याची क्षमता.वाचायचं आणि त्याप्रमाणे कृती करायची .
काही विचार .....
*आपल्या दृष्टिकोनात बदल केला की आपले आयुष्य बदलून जाते हे वास्तव आहे. 
*योग्य वेळी निर्णय घेणं याला  अत्यंत  महत्व आहे.
*सकारात्मक विचार हीच यशाची पायरी आहे.
*शिक्षणाने जीवन जगण्याची कला साध्य व्हायला पाहिजे.
*मनाने इतके कणखर व्हा,की कोणताही आघात झाला तरी मन : शांती ढळणार नाही.
*जीवनातला आनंद शोधा तो नक्की सापडेल 
*सतत शिकत रहा .थांबू नका .
*शरीराला चांगल्या अन्नाची तर मनाला चांगल्या विचारांची गरज असते.
*यश आणि सुख हे जोडीनं येतात.
* संघर्षाशिवाय काहीच चांगलं निर्माण होत नाही.
*निसर्ग खरोखरच संपन्न आहे त्याचा सन्मान करा.
*आत्यंतिक तळमळ हीच कार्यसिद्धी ची सुरवात असते.
*आपल्या सर्वांमध्ये सुप्त गुणांचा आणि क्षमतांचा खजिना दडलेला आहे.तो शोधायला हवा.
*कोणत्याही कामाचं नियोजन केल्यास त्यात यश मिळतंच.
*स्वतःच्या अज्ञानाची जाणिव होणं ही ज्ञानाकडे जाण्याची पहिली पायरी आहे.
*यशस्वी माणसं चमत्कारांची  किंवा सोप्या जबाबदाऱ्या ची ,कामाची अपेक्षा करत नाही.
*आपणच आपल्याला प्रेरणा द्यायला शिकलं पाहिजे.
*स्वभिमान ही एक जाणीव आहे.
* स्वातंत्र्य म्हणजे मनाला येईल ते करायचं ही कल्पना चुकीची आहे.
*जग जसं आहे तसं आपल्याला दिसत नाही तर ते आपण जसे आहोत तस दिसतं.
*आपल्या विचारातून कृती होते ,कृतीतून सवयी जडतात आणि सवयीतून चारित्र्य घडतं . चारित्र्यातून भवितव्य ठरतं.
* मुख पृष्ठlवरील एक विचार * विजेते वेगळ्या गोष्टी करत नाहीत तर ते गोष्टी वेगळ्या प्रकारे करतात. 
अगदी शंभर टक्के बरोबर आहे.
     असे असंख्य असंख्य अप्रतिम विचार प्रत्येक पानोपानी लेखकाने पेरले आहेत ते वाचायचे, आपल्या मनात रुजवायचे आणि सगळं जग जिंकून घ्यायचं ...अजून काय हवं माणसाला ...याच साठी तर आयुष्यभर त्याची अव्याहतपणे धडपड सुरू असते.एक अत्यंत सुंदर ,संग्रही ठेवण्यासारखे पुस्तकं ...वाचा आणि जिंका ...
संगीता वाईकर.नागपूर.
🙏 धन्यवाद.

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know