WELCOME TO VPPC LIBRARY BLOG

*** WELCOME TO VPPC LIBRARY BLOG ***

NEW ARRIVAL 2025

* NEW ARRIVAL 2025-2026 * natural natural

OPAC

OPAC NEW

OPAC (Open Public Access Catalog)

📰NEWS CHANNEL NEW

NEWS CHANNEL

LIBRARY PODCAST CHANNEL ओळख ग्रंथालयाची NEW

PODCAST CHANNEL

Sunday, November 28, 2021

फॉरेस्ट बाथिंग

फॉरेस्ट बाथिंग......
(हरित वनातील स्नान)
ऊर्जा पुनः प्राप्त करण्याची *'शिनरिन-योकु'* पद्धत
 🍀🍂🍁🌿🍂🍁

  #इकिगाई  या जागतिक बेस्टसेलर पुस्तकाचे लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस यांनी लिहिलेले पुस्तक.

या पुस्तकात लेखकांनी हिरवाईचे मानवाच्या तनामनाला होणारे फायदे अगदी सहजसुंदर भाषेत सांगितले आहेत. जपानमध्ये शारीरिक आणि मानसिक ताण तणाव दूर करण्यासाठी  'वनांकडे चला' ही उपचार प्रणाली मानली गेली आहे. हे सांगताना त्यामागे असणारी शास्त्रीय कारणे, त्यासंदर्भात केले गेलेले प्रयोग आणि त्याला असणारी तत्त्वज्ञानाची बैठक या सर्व गोष्टींची मांडणी, चित्रे, आकृत्या, आलेख, पौराणिक कथा याद्वारे केली आहे.
     प्रचंड लोकसंख्येची मोठी शहरे आणि बदललेली शहरी जीवनशैली यामुळे विशेषतः मोठ्या नगरात राहणाऱ्या जनतेची निसर्गाशी झालेली फारकत लक्षात घेऊन जपानमध्ये त्यावर केलेली उपाययोजना लक्षणीय आहे. प्रत्येक व्यक्तीला रानावनात जाणे शक्य नसल्याने बागेत हिरवळीवर चालताना किंवा घरात बसून सुद्धा वनस्पती सान्निध्याचे आणि त्याचे फायदे कसे घेता येतील हे सुचवले आहे.
    #इकिगाई  आणि #फॉरेस्ट बाथिंग या पुस्तकांचे लेखक एकच असल्याने या पुस्तकाचा संदेश निसर्गाकडे चला हा आहे. एकूण काय, तर औदासीन्य घालवून, ताण-तणाव कमी करण्यासाठी, निरोगी राहण्यासाठी घराबाहेर पडण्याचा आणि वृक्षराजीशी जवळीक साधण्याचा संदेश हे पुस्तक देते.

   जागतिक कीर्तिचे प्रसिद्ध लेखक हेक्टर गार्सिया आणि फ्रान्सेस्क मिरालेस सांगतात की, भावनिक सकारात्मकता आणि सर्वसाधारण आरोग्य यामध्ये वृद्धी होण्यासाठी मानव आणि निसर्ग यांचे ऋणानुबंध महत्त्वपूर्ण आहेत. जरी तुमचे घर, परिसर अतिशय गजबजलेला असेल तरीसुद्धा तुम्ही शुद्ध चैतन्याचा अनुभव तुमच्या पुढच्या 'फॉरेस्ट बाथिंग' पर्यंत स्वतःमध्ये साठवून ठेवू शकता.

☘️ 'शिनरिन-योकु' पद्धत. 

☘️ शिनरिन-योकुचे  तत्त्वज्ञान.

☘️ शिनरिन-योकुचे फायदे .

☘️ वाबी- साबी 

☘️ चैतन्याचा साऊंडट्रॅक 

☘️ जंगलातले 'चैतन्य' घरी कसे आणाल...

फॉरेस्ट बाथिंग....
लेखक: #हेक्टर गार्सिया आणि #फ्रान्सेस्क मिरालेस. 
प्रकाशक: मायमिरर पब्लिशिंग हाऊस.
अनुवाद - नीलिमा करमरकर 
किंमत : २२५/-
संपर्क: ९८८११८६६६३(व्हाट्सअप)
Mahesh sakunde 

No comments:

Post a Comment

IF you have any doubts,please let me know